Home » Vinayak Chaturthi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीची तिथी, शुभवेळ आणि महत्त्व

Vinayak Chaturthi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीची तिथी, शुभवेळ आणि महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vinayak Chaturthi
Share

गणपती म्हणजे आपले आराध्य दैवत. प्रथमपुज्य असलेल्या गणेशच्या आराधनेशिवाय क्वचितच कोणाचा दिवस जात असेल. असा हा गणेश आपल्या सर्वांचाच लाडका बाप्पा आहे. गणपतीची पूजा, भक्ती तसे पाहिले तर आपण रोजच करत असतो. मात्र या गणेशच्या भक्तीसाठी आणि पूजेसाठी महिन्यातले दोन खास दिवस देण्यात आले आहे. एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरा दिवस म्हणजे विनायकी चतुर्थी. यासोबतच दर आठवड्याला येणार मंगळवार तर असतोच. गणेशच्या पूजेसाठी चतुर्थीचा दिवस खूपच महत्त्वाचा समजला गेला आहे. त्यामुळे लोकं संकष्टी आणि विनायकी अशा दोन्ही चतुर्थी मोठया भक्तिभावाने करतात. (Vinayak Chaturthi)

आता लवकरच मार्गशीर्ष महिन्यातील विनायकी चतुर्थी येणार आहे. विनायकी चतुर्थीला देखील मोठे महत्त्व आहे. नोव्हेंबरमधील विनायक चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. या दिवशी रवि योग देखील तयार होणार आहे. मात्र यावेळी भद्राची देखील छाया असेल. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात रविवार, २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.२४ वाजता सुरू होणार आहे. या तिथीची समाप्ती सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२२ वाजता होणार आहे. यावेळी नोव्हेंबरमध्ये विनायक चतुर्थी सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी आहे. (Ganesh puja)

मार्गशीर्ष महिन्यातील ही विनायकी चतुर्थी खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण या दिवशी रवी योग तयार होणार आहे. विनायक चतुर्थी सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी असून, यादिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ११.०४ ते दुपारी ०१.११ वाजेपर्यंत असणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये विनायक चतुर्थीला रवि योग तयार होत आहे. यावेळी रवि योग सकाळी ०६.५१ वाजता सुरु होणार असून, हा योग रात्री ०९.५३ वाजेपर्यंत राहणार आहे. रवि योग सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. रवि योगाव्यतिरिक्त, त्या दिवशी शूल योग देखील तयार होणार आहे. हा योग पहाटेपासून दुपारी १२.३७ वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर गंड योग सुद्धा याच दिवशी तयार होणार आहे. विनायकी चतुर्थीला पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी प्रभावी राहील. हे नक्षत्र रात्री ०९.५३ पर्यंत असणार आहे. त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरु होईल. विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रा सकाळी ०८.२५ वाजता सुरु होणार आहे आणि ते रात्री ०९.२२ वाजेपर्यंत राहणार आहे. (Marathi News)

विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा कशी करावी?
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा, स्नान करा आणि शक्यतो लाल कपडे घाला. पूजास्थळ स्वच्छ करा आणि व्रत करण्याचा संकल्प करा. पूजा करताना गणेशाची मूर्ती किंवा फोटो वेदीवर ठेवा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर, गणेशाला अष्टगंध, तांदळाचे दाणे, लाल फुले आणि दुर्वा अर्पण करा. तसेच, भगवान गणेशाला लाडू किंवा मोदक अर्पण करा. पूजेदरम्यान “ॐ गं गणपतये नमः” हा मंत्र शक्य तितका जप करत राहावा. त्यानंतर, विनायक चतुर्थी व्रत कथा पठण करा किंवा ऐका. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापरली जात नाहीत. पूजेनंतर, बाप्पाची एकत्रित आरती करा आणि लोकांना प्रसाद वाटा. (Todays Marathi Headline)

Vinayak Chaturthi

विनायक चतुर्थीचे महत्व
पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी गणपती बप्पा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. या तिथीला व्रत ठेवून गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आर्थिक संकटे, मानसिक तणाव आणि इतर अडचणी दूर होतात. (Marathi Trending Headline)

मान्यतेनुसार, गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. हा सण भक्तांना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो आणि त्यांच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो. तसेच, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते. याशिवाय कुटुंबात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना सुख-शांती मिळते. याशिवाय जीवनात येणाऱ्या त्रासांपासून आराम मिळतो. (Top Marathi News)

या गोष्टी लक्षात ठेवा
विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आणि सकारात्मक विचार ठेवा. मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नका आणि रागावू नका आणि शांत रहा. या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. माणसाने नेहमी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. (Latest Marathi Headline )

विनायक चतुर्थी व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीजवळ चौपारचा खेळ खेळत होते. त्याचवेळी प्रश्न निर्माण झाला की, खेळ कोण जिंकणार आणि कोणाला पराभवाला सामोरे जावे लागणार? यानंतर भगवान शिवाने गवतापासून बालक निर्माण केले आणि त्याला जीवन दिले. यानंतर महादेवने त्या मुलाला खेळाचा विजय किंवा हार ठरवण्यास सांगितले. (Top Stories)

========

Shriram : जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजऱ्या होणाऱ्या विवाह पंचमीचे महत्त्व

Sabarimala : हरिहर पुत्र असलेल्या भगवान अयप्पा यांच्या जन्माची रंजक कथा

========

चौपदाचा खेळ तीन वेळा खेळला गेला आणि तिन्ही वेळा माता पार्वती जिंकली. परंतु, मुलाने चुकून महादेवला विजेता घोषित केले. मुलाचा हा निर्णय ऐकून माता पार्वती रागावल्या, त्यामुळे तिने मुलाला अपंग होण्याचा शाप दिला. यानंतर मुलाने आई पार्वतीला आपली चूक विचारली. यावर माता पार्वतीने सांगितले की, नागकन्या येथे गणेशाची आराधना करण्यासाठी येणार आहे, तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार व्रत करा. हे व्रत केल्याने शापापासून मुक्ती मिळते. (Top Trending News)

मुलाने गणेशाची विधीवत पूजा केली. यावर गणेशजी प्रसन्न झाले. भगवान शिव-पार्वतींकडे जाण्यासाठी बाळाला आशीर्वाद दिला. यानंतर बालक कैलास पर्वतावर पोहोचला. त्याचवेळी माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पाचे २१ दिवस उपवास केले. यावर भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी बालकाला शापातून मुक्त केले. धार्मिक मान्यतेनुसार, नंतर भगवान शिवानेही हे व्रत पाळले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.