नवरात्राच्या एका आख्यायिकांपैकी एक आख्ययिका सांगितली जाते की, प्रभू श्रीरामांनी रावणाशी युद्ध सुरु करण्यापूर्वी आदिमाया आदिशक्तीची उपासना केली आणि त्यानंतर युद्धाला सुरुवात केली. या युद्धामध्ये प्रभू श्रीरामांनी विजयादशमीच्या दिवशी रावणाला मारले आणि विजयोत्सव साजरा केला. सध्या हेच शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहाने सुरु आहे. लवकरच आपण दसरा अर्थात विजयदशमीचा सण साजरा करणार आहोत. त्याच निमित्ताने आज आम्ही तुम्हाला प्रभू श्रीरामांशी संबंधित एक गोष्ट सांगणार आहोत.(Navratri 2025)
जेव्हा जेव्हा रामाचा, रामायणाचा विषय निघतो तेव्हा या चारही भावंडांची चर्चा होणार नाही असे होत नाही. राम , लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चारही भावांचे प्रेम, त्याग यांचे उदाहरण आजही दिले जाते. या चारही भावांमध्ये असलेली एकी, प्रेम आजच्या काळात खरंच बंधूप्रेमाचे प्रतीक मानले जाते. आपण संपूर्ण रामायणामध्ये याच चार भावंडांबद्दल ऐकले, वाचले आहे. मात्र तुम्हाला ऐकून, वाचून आश्चर्य वाटेल की, या चार भावंडाना एक बहीण देखील होती. अनेकांना याबद्दल माहिती नसेल. (Dussera 2025)
वाल्मिकी रामायणामध्ये आणि तुलसीदासांच्या रामचरित मानसमध्ये कोठेही शांताविषयी काहीही लिहिलेले नाही. अनेकांच्या मते ही एक काल्पनिक गोष्ट आहे. मात्र छत्तीसगढ़ी रामायणात, आनंद रामायणात शांताचे नाव आढळते. याशिवाय इंडोनेशिया रामकीनमध्येही शांताचा उल्लेख आहे. दक्षिण भारतातील रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. आज आम्ही याच बहिणीबद्दल सांगणार आहोत. (Marathi Headline)

राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची ही मुलगी होती. ही मुलगीच दशरथ राजाचे पहिले अपत्य होती तिचे नाव होते शांता. म्हणजे भगवान श्रीरामांना मोठी बहीण होती. पुराणानुसार ती प्रत्येक कामात पारंगत होती. बुद्धिमान असण्यासोबतच ती अनेक कामांमध्येही कुशल होती. मात्र तिचा जास्त उल्लेख कुठेच नाही. असे असले तरी तिच्याबद्दल काही पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. (Top Marathi News)
पौराणिक कथेनुसार एकदा राणी कौशल्याची बहीण वर्षानिनी तिचा पती आणि अंगदेशचा राजा रोमपादासह अयोध्येत आली होती. वर्षानिनी निपुत्रिक होती. संततीच्या आनंदापासून वंचित राहिल्यामुळे राजा रोमपद आणि वर्षानिनी खूप दुःखी होते. राजा दशरथांसमोर त्यांनी आपली व्यथा मांडली. राजा दथरथांनी त्यांना दुःखी आणि निराश पाहून सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांची आणि कौशल्य यांची मुलगी शांता त्यांना दत्तक दिली. मुलगी असल्याने शांताला रघुकुलाची गादी सांभाळण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे राजा दशरथ शांताला दत्तक देण्यास तयार झाले. याशिवाय कौशल्याला आपल्या बहिणीला निराश करून स्वतःच्या दारावरून परत पाठवायचे नव्हते म्हणून तिने देखील शांताला दत्तक देण्याचे मान्य केले. त्या मुलीला घेऊन राजा रोमपाद आणि वर्षानिनी अंगदेशात परतले. यानंतर ती मुलगी अंगदेशाची राजकुमारी बनली. (Latest Marathi News)
पुढे जाऊन श्रीरामांच्या या मोठी बहिणीचा विवाह ऋषी श्रिंग यांच्याशी झाला. यांच्या लग्नाबद्दल देखील अनेक लोकप्रिय कथा आहेत. ऋषी श्रींग यांनी राजा दशरथासाठी पुत्रयष्टी यज्ञ केला होता. त्यामुळे राजा दशरथाला पुत्र झाले. अशी मान्यता आहे की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ऋषी श्रृंग यांचं एक मंदिर आहे. जिथे ऋषी श्रृंग आणि राम यांच्या बहिणीची पूजा केली जाते. (Top Trending News)
श्रृंगी ऋषी केव्हाही कोठे प्रवासासाठी निघाले तर, माता शांता त्यांच्यासोबत छडीच्या रूपात असते आणि प्रवासात नेहमी सोबत राहते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. श्रृंगी ऋषी माता शांतेशिवाय कधीही प्रवास करत नाहीत आणि ग्रामीण लोक या परंपरेचे आजही पालन करतात. कुल्लूमध्ये असलेले माता शांता आणि श्रृंगी ऋषींचे हे मंदिर अत्यंत अद्भुत आहे. राजा दशरथ हिमाचलमधील कुलू येथूनच श्रृंगी ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी घेऊन गेले होते असे म्हटले जाते. (social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
