नुकताच स्थापन झालेला राजकीय पक्ष आणि त्याच्या पहिल्याच सभेला जवळजवळ १० लाख लोकं उपस्थित होते. हा करिश्मा फक्त राजकीय पक्षाचा नाही, तर तमिळ मूवी सुपरस्टार थलापति विजय याचा होता. फेब्रुवारी महिन्यात विजयने तमिळगा वेत्री कझगम पक्षाची स्थापना केल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात आता एक वादळ येणार, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि आता त्याच्या पहिल्या सभेनंतर अनेक जण थलापति विजय हा तमिळनाडूचा भावी मुख्यमंत्री असेल असं बोलू लागले आहेत. आता हे तर भविष्यात कळेलच. पण भूतकाळ पासूनच म्हणजे फार पूर्वी पासूनच तमिळनाडूच्या राजकारणावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव राहिला आहे. राजकारणात उतरलेल्या अशाच अभि‘नेत्यां’बद्दल जाणून घेऊया. (Vijay Thalapathy)
एखाद्या अभिनेत्याने राजकारणात येऊन नेता होणं हे ब्रम्हानंदी टाळी लागण्यासारखं आहे. अर्थात त्यासाठी त्या अभिनेत्याची तेवढी फॅन फॉलोइंग असायला हवी. या फॅन फॉलोइंगमुळेच साऊथच्या राजकारणात अनेक मूवी सेलेब्रिटी सुद्धा भाव खाऊन गेले. M.G.R म्हणजे M.G. रामचंद्रन, हे तमिळ चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार होते. ५० च्या दशकात त्यांची फॅन फोलोइंग इतकी होती की, लोकं त्यांना देवासमान मानत होते. म्हणूनच त्याकाळात अनेक राजकीय पक्ष त्यांना स्वत:च्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक होते. १९५३ मध्ये MGR यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. काही काळानंतर सी.एन. अन्नादुराई यांनी निर्माण केलेल्या द्रविड़ मुनेत्र कळगम DMK पक्षात ते सामील झाले, आणि १९६२ ला ते तमिळनाडूच्या विधानपरिषदेत आमदार झाले. त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता, पण चित्रपट सृष्टीतला प्रवास सुद्धा सुरू होताच. (Political News)
१२ जानेवारी १९६७ रोजी एका चित्रपटाच्या संदर्भात झालेल्या एका मीटिंग दरम्यान, त्या काळतील तमिळ चित्रपटातले लोकप्रिय खलनायक एम. आर. राधा यांनी MGR यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. MGR यांना गोळी लागल्याची बातमी जशी पसरली, तशी एक तासाच्या आत रुग्णालयाच्या बाहेर ५० हजार लोक जमा झाले. ते रुग्णालयात असतानाच त्यांनी मद्रास स्टेट इलेक्शन साठी उमेदवारी अर्ज भरला आणि १९६७ च्या निवडणुकीत ते २७ हजारांच्या मतधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. अन्नादुरईच्या मृत्यूनंतर, जेव्हा MGR ने DMK पक्षात वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यावर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. पक्ष सोडल्यानंतर MGR यांनी आपला पक्ष अन्ना द्रविड मुनेत्र कळगम स्थापन केला, ज्याला नंतर ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळगम नाव देण्यात आले. हा तमिळनाडूमध्ये DMK चा सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला. पक्षाने 1977 मध्ये 234 पैकी 130 जागा जिंकल्या आणि MGR तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. (Vijay Thalapathy)
MGR यांच्या सांगण्यावरून अन्ना द्रविड मुनेत्र कडगम पक्षात सामील झालेल्या अभिनेत्री जयललिता यांनी MGR यांच्या निधनानंतर स्वत:ला त्यांचा राजकीय वारसदार घोषित केलं. ज्याला M.G.R. यांच्या कुटुंबाचा विरोध होता. जयललिता यांचा राजकीय प्रवास सुद्धा यशस्वी राहीला. १९९१ साली त्या तमिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आणि त्यानंतर त्यांनी ५ वेळा तमिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. तमिळनाडूच्याच वरच्या अंगाला असलेलं आंध्रप्रदेश तिथे सुद्धा एका अभिनेत्याने राजकारणात इतिहास घडवला होता. साठ आणि सत्तरच्या दशकात साऊथ चित्रपटसृष्टीत नंदमुरी तारक रामा राव उर्फ NTR याच नावाची चर्चा होती. तर एकदा प्रोड्यूसर वी. नागी रेड्डी हे NTR यांना म्हणाले की, कितीही पैसा किंवा प्रसिद्धी मिळवली तरी खरी सत्ता राजकरण्यांचीच असते, हे ऐकून NTR यांनी राजकारणात पाऊल टाकलं. १९८२ साली त्यांनी तेलगू देसम पक्ष स्थापन केला. १९८३च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९८३ ते १९९४ या काळात NTR हे तीन वेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. (Political News)
NTR नंतर त्यांचे जावई यांनी चंद्राबाबू नायडू जे सध्याचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी १९९५ साली NTR यांच्या विरोधात बंड करून स्वत: सत्ता स्थापन केली. त्यानंतर साऊथचे आणखी एक अभिनेते पवन कल्याण यांनी एका रात्रीत आंध्रप्रदेशच राजकारण बदललं. सुपरस्टार चिरंजीवी यांनी २००८ मध्ये ‘प्रजा राज्यम पार्टी’ या पक्षाची स्थापना केली, पण २०११ मध्ये त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. त्यांचेच धाकटे बंधू म्हणजे पवन कल्याण ज्यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. २०१४ ला विधानसभा निवडणूक न लढता पवन कल्याण यांच्या जनसेना ने चंद्राबाबू नायडू आणि भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर पवन कल्याण यांनी २०१९ मध्ये २ जागांवर निवडणूक लढवली होती. पण या दोन्ही जागांवर ते जिंकू शकले नाही. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २१ जागांवर निवडणूक लढवली आणि २१ च्या २१ जागा त्यांनी जिंकल्या. (Vijay Thalapathy)
मधल्या काळात वरस्टाईल अॅक्टर आणि साऊथचे पहिले पॅन इंडिया स्टार कमल हसन यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला होता. पण अजूनही त्यांचा हा प्रवेश म्हणजे फ्लॉप शो आहे असं बोललं जातं. अशी हिस्टरी आहे. साऊथच्या फिल्मइंडस्ट्रीतून पॉलिटिक्समध्ये आलेल्या नेत्यांची. त्यात आता आणखी एक नाव अॅड झालं आहे, थलापती विजय. करियरच्या पीकवर असताना, प्रत्येक मूवीची १०० ते २०० कोटींची फीज मिळत असताना त्याने फिल्मी करियर सोडून राजकारणात धमकेदार एंट्री केली आहे. (Political News)
थलापति विजयचे वडील एस ए चंद्रशेखर यांनी याआधी विजयाच्या नावाने एका पक्षाची स्थापना केली होती ज्याचं नाव होतं. ‘ऑल इंडिया थलपति विजय मक्कल इयक्कम’. विजयचं नाव राजकीय पक्षासाठी वापरलं म्हणून विजयाचा त्यांच्या वाडिलांसोबत वाद सुद्धा झाला होता. विजयने मागणी केली होती की त्यांच्या नावाचा वापर गर्दी जमवण्यासाठी केला जाऊ नये, आणि आता स्वत:च्या स्थापन केलेल्या पक्षाच्या पहिल्याच सभेत त्याचच नावावर १० लाख लोकांची गर्दी जमली. पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आपल्या पक्षाची विचारधारा चालेलं हे विजयने स्पष्ट केलं आहे. थलापति विजयने गर्दी जमवली आहे. पण निवडणूकीसाठी त्यासमोर तगड आव्हान असेल. कारण तमिळनाडूमध्ये ७०-८० टक्के मतं डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांच्या हातात आहेत. २०-३० टक्के मतांवर इतर पक्षांची नजर असते. (Vijay Thalapathy)
======
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
====
त्यात आता भाजपासुद्धा तमिळनाडूमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.भाजपाने डीएमके किंवा एआयडीएमकेचा पाठिंबा न घेता पहिल्यांदाच १० टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. त्यामुळे, विजयच्या टीव्हीके पक्षाची डीएमके, एआयडीएमकेसह भाजपासोबतही स्पर्धा असेल.आता राहिला प्रश्न थलापति विजय भावी मुख्यमंत्री होणार या चर्चेचा तर यासाठी विजयला इतर पक्षांची सुद्धा मदत लागेल. फक्त फॅन फॉलोइंग फॅक्टर निवडणुकीत कामी येणार नाही. पण युतीसाठी सुद्धा विजयचा पक्ष तयार असल्याचं त्याने स्पष्ट केलय. भविष्यात काय होईल याची खात्री देता येणार नाही पण सध्या तरी तमिळनाडूमध्ये थलपति विजयचीच हवा आहे. तमिळनाडूच्या राजकारणात विजयच्या एंट्रीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका साऊथ मूवी सारख्याचं granger होणार एवढ नक्की. (Political News)