Home » 2025 च्या महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी

2025 च्या महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी

by Team Gajawaja
0 comment
Mahakumbh Melava
Share

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ मेळावा होत आहे.  या महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये अभूतपूर्व अशी तयारी सुरु झाली आहे.  गंगेच्या काठावर लंडन व्हिलच्या धर्तीवर भव्य चक्र, मेट्रो लाईन, रोप-वे,  भाविकांसाठी पंचचारांकीत हॉटेल्स आदी सुविधा करण्यात येणार आहेत. या कामांची पायाभरणी झाली असून यासोबतच या महाकुंभ मेळाव्यात (Mahakumbh Melava)देशभरातून नाही तर विदेशातूनही भाविक येतात. त्यांच्यासाठी पंचतारांकीत सुविधांसह सुरक्षाही आधुनिक स्वरुपात देण्यात येणार आहे. या सर्व कामांची सुरुवात झाली असून कोट्यवधी भाविक गंगास्नान करतील त्यांच्यासाठी रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे.  2025 मध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात(Mahakumbh Melava) ‘न्यू यूपी’ ही थीम पाहायला मिळणार आहे.

देशातील हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभ मेळावा (Mahakumbh Melava) भरतो. प्रत्येक 12 वर्षांत या चार ठिकाणी कुंभ मेळाव्याचे आयोजन होते.  त्यामुळे दर तीन वर्षांनी देशातील एका स्थानावर कुंभ मेळावा आयोजित होतो. यापैकी नाशिक आणि उज्जैनमध्ये एका वर्षांच्या अंतराने कुंभमेळा आयोजित केला जातो. आता 2025 मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होत आहे. हा कुंभमेळा अभूतपूर्व व्हावा यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं आत्तापासूनच योजना केली असून त्याच्यावर कामही सुरु झाले आहे.  

या कुंभमेळाव्यासाठी(Mahakumbh Melava) प्रयागराजमध्ये मेट्रो लाइन, रोप-वे तयार होणार आहे.  उत्तर प्रदेशमध्ये सध्या विकास कामांचा जोर आहे. अयोध्या आणि काशी नगरीचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे.  या शहरांना भेट देणा-या भाविकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  त्यामुळेच 2025 मध्ये प्रयागराजमध्ये होणा-या महाकुंभ मेळाव्यामुळे प्रयागराजचेही रुपडे बदलण्याचा संकल्प उत्तरप्रदेश सरकारने केला आहे.  या महाकुंभ मेळाव्यासाठी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत.  

लंडन व्हील हे थेम्स नदीवर बांधलेले स्विंगिंग व्हील आहे. तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजन आणि आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र आहे. त्याच धर्तीवर महाकुंभ 2025 साठी येणाऱ्या पर्यटकांसाठी संगम परिसरात संगम व्हील बांधण्यात येणार आहे. 2019 मध्ये 24 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले होते.  2025 मध्ये होणा-या या महाकुंभामध्ये (Mahakumbh Melava)सुमारे 40 कोटी भाविक येथे स्नान करतील अशी माहिती आहे.  येवढ्या मोठ्या संख्येनं येणा-या भाविकांना एकाचवेळी स्नान करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.  येणा-या भाविकांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असेल.  त्यांच्यासाठी शहरात नवीन 3 पंचतारांकित हॉटेल्सची उभारणी सुरु झाली आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येणार आहेत. तसेच संगमावरील काठांना सजवण्यात येणार आहेत.  रामायण आणि महाभारतामधील प्रसंग त्यावर काढण्यात येणार आहेत.  हे संगम विद्युत रोषणाईनंही सजवले जाणार आहेत.  ही सर्व रोषणाई भाविकांना रोपवेतूनही बघता येणार आहे. 

==========

हे देखील वाचा : ‘जॅक मा’ जपानमध्ये राहत असल्याचे उघड?

=========

प्रयागराज शहराला यानिमित्त अनेक सुविधांनी युक्त करण्यात येणार असले तरी शहराचे वातावरण शुद्ध राहिल याची खात्री करण्यात येणार आहे.  त्यासाठी शहरभर मोठ्याप्रमाणात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.   हा महाकुंभ हिरव्यागार वातावरणात होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.  याशिवाय येवढ्या मोठ्या संख्येने येणारे भाविक पहाता स्वच्छतेची काळजी घेण्यासाठीही आतापासूनच भव्य अशा स्वच्छतागृहांची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास 2 लाख शौचालये बांधण्यात येणार आहेत.  प्रयागराजमध्ये मेट्रोलाइन आणि संगम येथील रोपवेही महाकुंभपूर्वी(Mahakumbh Melava) पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांना संगमाची भव्यता आणि शहरातील वाहतूक व्यवस्था एकाचवेळी बघण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.  याशिवाय नदीतून क्रूझही चालवण्यात येणार आहे.  कुंभ परिसरातील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी क्रूझ वाहतूकीचा पर्याय राबवण्यात येणार आहे.  तसेच महाकुंभात मेट्रो मार्ग टाकणे शक्य नसेल, तर पॉड सिस्टीम वापरण्याचाही विचार करण्यात येत आहे.  

उत्तरप्रदेशमधील महाकुंभ 2019 ची जगभरात चर्चा झाली होती.  या महाकुंभासाठी 113 देशांतून भाविक आले होते.  2025 मध्ये ही संख्या दुप्पटीनं वाढणार आहे.  या महाकुंभला 400 दशलक्ष लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे तंबूनगरीचे क्षेत्रफळही दुप्पट करण्यात आले आहे.  भाविकांना शहरभरातील मंदिरांमध्ये जाण्यासाठी  शहरात 300 हून अधिक रस्ते तयार होणार आहेत.  याशिवाय 9 उड्डाणपूल तयार होत आहेत.  महाकुंभापूर्वी गंगा नदीची पुन्हा एकदा सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे,  त्यातून  गंगेत जाणारे सर्व नाले पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.  

या सर्व विकासकामांसाठी हजारो कामगार परिश्रम घेत आहेत.  कुंभमेळ्यादरम्यान 10 हजार स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.  शिवाय एक हजार इलेक्ट्रॉनिक बसेस चालवल्या जाणार आहेत. डिजिटल कुंभ, म्युझियम ही सुद्धा आकर्षणाची केंद्र असणार आहेत.  या सर्वात सुरक्षा व्यवस्थाही तेवढ्यात सक्षमपणे असणार आहे  ड्रोन, ट्रॅकिंग सिस्टीम, हायटेक उपकरणे आदींचा वापर करण्यात येणार आहे.  सर्वत्र शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.  महाकुंभमेळाव्याच्या प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.