Home » सतेज पाटील यांची ‘हमें तो अपनों ने लुटा’ अशी अवस्था

सतेज पाटील यांची ‘हमें तो अपनों ने लुटा’ अशी अवस्था

by Team Gajawaja
0 comment
Satej Patil
Share

४ नोव्हेंबर २०२४ कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जे घडलं, त्याने कोल्हापूरच्या राजकारणात काही वेळेसाठी का असेना, पण भूकंप आणला. ज्याचे सर्वात जास्त हादरे बसेल ते कोल्हापूरमधील कॉंग्रेस दिग्गज नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना. त्यामुळेच, कोल्हापूरच्या राजघराण्याबद्दल सतेज पाटील यांच्या तोंडून “झक मारायला मला तोंडघशी पाडलं का? दम नव्हता तर उभं राहयचं नव्हतं ना मग,” असे उद्गार निघाले. कारण, कोल्हापुर उत्तर या मतरदारसंघातून कॉंग्रेसकडून मधूरिमाराजें छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची १० मिनिटं शिल्लक असताना त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळेच, सतेज पाटील यांना धक्का बसला. कारण मतदारसंघातून दोनदा उमेदवार देऊनही काँग्रेसकडे अधिकृत उमेदवार नाही आणि शेवटी ज्याची उमेदवारी रद्द केली त्यालाच पाठिंबा देण्याची वेळ कॉंग्रेसवर आली. या सगळ्या घटनांमध्ये दगडफेक, विरोध ते दिल्लीपर्यंत हालचाली या सगळ्यांचा समावेश आहे. एखाद्या मूवी पेक्षा ही जास्त मसाला असलेल्या घटना कोल्हापूरमध्ये घडल्या आहेत. त्याबद्दलच जाणून घेऊया. (Satej Patil)

सुरुवात होते जागावाटपांपासून. महाविकास आघाडीच्या जागा वाटप फाॅर्म्युलामध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील यांचाही समावेश करण्यात आला होता. मग, कॉंग्रेसला कोल्हापुरात जास्त जागा मिळाव्यात यासाठी कोल्हापूर ते मुंबई, आणि मुंबई ते दिल्ली अशा बैठका करत, सतेज पाटील यांनी कोल्हापुरच्या १० जागांपैकी ५ जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली. मग कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉंग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. राजेश लाटकर यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली म्हणून कॉंग्रेसच्या आताच कलह सुरू झाला. हा लादेलेला उमेदवार आहे. असं म्हणत राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. काँग्रेसच्या 26 माजी नगरसेवकांनी या उमेदवारीला विरोध करत आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहिलं. या पत्रावर 26 माजी नगरसेवकांच्या सह्या होत्या. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्या रात्रीच काँग्रेस कमिटी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. (Political Updates)

कॉंग्रेसमधल्या असंतोषामुळे राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. राजेश लाटकर याना उमेदवारी मिळण्याआधी, आमदार सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली होती. त्यावेळी, शाहू महाराज छत्रपती यांनी राजघराण्यातील कुणीही निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं, आणि मग राजेश लाटकर यांचं नाव निश्चित झालं होतं. आता, राजेश लाटकर यांना उमेवारी जाहीर झाल्याने कॉंग्रेसच्या विद्यामन आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा सतेज पाटलांसाठी पहिला धक्का होता. 2019 मध्ये, सतेज पाटील यांनी आपली स्वतःची यंत्रणा वापरून चंद्रकांत जाधव यांना उमेदवारीली दिली होती आणि निवडून सुद्धा आणलं होतं. दुर्दैवाने, 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली. पण, पोटनिवडणुकीतसुद्धा चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली गेली आणि सतेज पाटील यांनी आपली ताकद लावून त्यांना निवडून आणलं. या निवडणुकांआधी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Satej Patil)

मग राजेश लाटकर यांना कॉंग्रेस अंतर्गत विरोध झाल्यानंतर राजघराण्याच्या समर्थकांनी मधूरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली. राजेश लाटकर यांना विरोध आणि मधूरिमाराजे यांना उमेदवारीची मागणी यामुळे सतेज पाटील यांच्यावर दबाव वाढत होता. त्यामुळे पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली. यावेळी, राजेश लाटकर यांना परत कधीतरी संधी दिली जाईल, असा विचार करत, मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्याचा ठराव केला गेला. सतेज पाटील यांनी पुन्हा काँग्रेस हायकमांडला विनंती करत, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी केली. त्यांची मागणी स्वीकारून, पक्षाने उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली आणि त्यात मधुरिमा राजे यांची उमेदवारी घोषित केली. यानंतर मधुरिमाराजे यांना निवडून आणण्यासाठी आपण आपली पूर्ण ताकद पणाला लावू, असं सतेज पाटील यांनी मनाशी ठाम केलं. (Political Updates)

पण राजेश लाटकर हे उमेदवारीसाठी हट्टाला पेटले. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी जाऊन राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण राजेश लाटकर तयार झाले नाहीत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा सतेज पाटील हे राजेश लाटकर यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पण तेव्हा राजेश लाटकर घरी नव्हते. त्यांचा फोन सुद्धा नॉट रीचेबल येतं होता. दुसरीकडे, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नसल्यामुळे, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची १०- १५ मिनिट बाकी असताना, शाहू महाराज छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले. ही खबर सतेज पाटील यांना लागली. ते तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला रवाना झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि शाहू महाराजांनी त्यावर स्वाक्षरी देखील केली होती. (Satej Patil)

======

हे देखील वाचा : महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री का नाही?

====

हा सतेज पाटलांना बसलेला दूसरा धक्का होता. त्यांनी त्यांचा संताप सुद्धा व्यक्त केला, “झक मारायला मला तोंडघशी पाडलं का? दम नव्हता तर उभं राहयचं नव्हतं ना मग.” असं ते बोलून गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांसबोतच्या बैठकीत सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यकर्तेदेखील भावूक झालेले दिसले. यानंतर शाहूमहाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्यात तनाव आणखी वाढेल, अशी चर्चा रंगली होती. पण शाहूमहाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. इतकं नाट्य घडल्यानंतर, पहिल्यांदा कॉंग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली होती, त्या राजेश लाटकर यांनाच पाठिंबा देण्याचं काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं. जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश, लाटकरांनी माघारीसाठी तंगवलं आणि अचानक मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काही दिवसांतच सतेज पाटील यांना अनेक राजकीय भूकंपाचे हादरे बसले. पण आता वातावरण शांत झालं असून, कॉंग्रेस अधिकृत असेलला पण अनधिकृत उमेदवार राजेश लाटकर यांनाच पाठिंबा सर्वांना द्यावा लागणार आहे. इतकं राजकीय नाट्य बघितल्यानंतर, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कोणाला निवडून आणणार हे पाहणं महहत्वाचं ठरेल. (Political Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.