Home » बारामतीत पुन्हा पुतण्याच पडणार ?

बारामतीत पुन्हा पुतण्याच पडणार ?

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election
Share

राज्यात विधानसभेची लढाई अंतिम टप्यात आली आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अनेक महत्वाच्या जागांवर मोठी लढत पाहायला मिळणार आहे. यातील अनेक जागा हाय प्रोफाइल ठरत आहेत ज्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. अशीच एक जागा म्हणजे बारामतीची. बारामतीमध्ये पुन्हा पवार घरण्यातच संघर्ष असणार आहे. अजित पवार यांनी अनेकदा हाय न्हाई म्हणत पुन्हा बारामतीमधूनच लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार गटातून यावेळी युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत फूट पडल्याने बारामतीत या आधीच काका पुतण्या संघर्ष झाला होता आणि त्यात काकांनी पुतण्याचा पराभव केला होता. या वेळीही पुन्हा एका पुतण्यालाच पराभवाचा सामना करावा लागणार आहे? नेमका कसा? जाणून घेऊया. (Vidhansabha Election)

तर बारामतीमध्ये सध्या काका पुतण्या असा संघर्ष सुरु आहे. लोकसभेत शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पावर यांना उभं करत आपली संपूर्ण ताकद लावली होती. तर अजित पवारांचे काका शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावली होती. यामध्ये शरद पवार यांचा स्पष्ट विजय झाला होता. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला सोडून सर्वच मतदारसंघात आघाडी घेतली होती. विशेषतः बारामतीत त्यांना लक्षणीय आघाडी मिळाली होती. बारामतीत सुळेंनी सर्वाधिक 48,168 मतांची लीड घेतली होती. त्यामुळे बारामतीत लोकसभेत तरी शरद पवारांनी बाजी मारल्याचं स्पष्ट झालं. (Latest Political Updates)

आणि आता विधानसभेत पुन्हा काका पुतण्याचा संघर्ष होणार आहे. बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनीच तशी वक्तव्य केली आहेत. मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता अजित पवार बारामतीतून विधानसभा लढताहेत. त्यामुळे अजित पवार आता स्वतः घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. १९९१ पासून सलग सातवेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार आहेत. आता ते आठव्यानंदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. (Vidhansabha Election)

अजित दादांच्या विरोधात शरद पवारांनीही इंटरेस्टिंग उमेदवार दिला आहे. युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकिट दिलं आहे. अजित पवार यांचे ते सख्खे पुतणे आहेत. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत आणि श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत. श्रीनिवास पवार सामान्यतः राजकारणापासून बाहेर राहतात. पण कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते दिसतात. त्यांचा शरयू ग्रुप अनेक कंपन्या चालवते. यात कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेसमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीतच अजित दादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि मुलगा युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडीवर होते. तेव्हाच युगेंद्र पवार हे बारामतीमधून लढतील असे अंदाज बांधले जात होते. (Latest Political Updates)

त्यामुळे थोडक्यात काय तर अजित दादा विरुद्ध युगेंद्र पवार असा पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बारामतीत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांची राजकारणात येण्याच्या आधीची कारकीर्द पाहायची झाल्यास ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्षही आहेत. मात्र या विधानसभेत त्यांची संपूर्ण कामं असणार आहे शरद पवार यांच्या करिष्म्यावर. (Vidhansabha Election)

मात्र अजित दादांचं तसं नाहीये. शरद पावर हे केंद्रात गेल्यानंतर अजित दादा बारामतीच्या राजकारणात आले. बारामतीमधून आमदार झाले. त्यामुळे बारामतीच्या कोपरा ना कोपरा अजित दादांना माहित आहे. विशेषतः ३५ वर्षे आमदारकी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त मंत्रिपदाच्या माध्यमातून अजित दादांनी स्वतःची अशी वेगळी ताकद बारामतीत उभी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही बारामतीमधील अनेक अनेक मतदारांचा लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा सूर होता. (Latest Political Updates)

महत्वाची गोष्ट म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामतीत ताकद लावत अटीतटीची निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झाला होता. मग विधानसभेलाही भाजपने गोपीचंद पडळकर यांना बारामतीत उतरवून अजितदादांना आव्हान दिलं होतं. मात्र अजित दादांचा झंझावात एवढा होता कि गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. थोडक्यात बारामतीत अजित दादांची ताकदीची बरोबरी करणं अजूनही अवघड आहे. अशावेळी अजितदादा आणि युगेंद्र पावर यांची तुलना करता अजित दादांचं पारडं जड आहे. मात्र युगेंद्र पवारांकडे त्याचवेळी शरद पवार आणि पक्षंफुटीचं इमोशनल कार्डही आहे. अशावेळी मग शरद पवारांनी हीही निवडणूक भावनिकतेवर नेल्यास अजित दादांना निवडणूक जड जाऊ शकते. (Vidhansabha Election)

======

हे देखील वाचा :  प्रगत देशात मतदान कसे होते ?

======

मात्र पराभव हा कोणत्याही एका पुतण्याचा होणार आहे. निकालादिवशीच हे स्पष्ट होईल अजित दादा त्यांच्या पुतण्याच्या पराभव करतात कि शरद पवार त्यांच्या पुतण्याचा पराभव करतात. जाता जाता अजून एक गोष्ट महाराष्ट्र जरी या काका पुतण्याच्या लढाईकडे लक्ष देऊन असला तरी युगेंद्र पवारांना तिकीट देऊन शरद पवारांनी बारामतीत सत्ता हि पवार घरण्यातच राहील याची सोय केल्याचंही बोललं जातंय. तुम्हाला या बारामतीच्या लढतीबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. (Latest Political Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.