Home » Vesna Vulovic : पॅराशूटशिवाय ३३,३३३ फुटावरून पडली आणि…

Vesna Vulovic : पॅराशूटशिवाय ३३,३३३ फुटावरून पडली आणि…

by Team Gajawaja
0 comment
Vesna Vulovic
Share

हल्लीच जूनमध्ये झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशची घटना आठवतेय का? ज्यात विश्वास कुमार रमेश हा एकटाच प्रवासी त्या अपघातात बचावला होता. पण तो कसा बचावला ही गोष्ट एका रहस्यापेक्षा कमी नव्हती. अशीच एक रहस्यमयी घटना १९७२ मध्ये घडली होती. तर २६ जानेवारी १९७२ चा दिवस होता. व्हेस्ना व्हुल्व्हिकला फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करून नुकते आठच महिने झाले होते. व्हेस्ना तशी मुळची सर्बियाची होती. २६ तारखेला व्हेस्ना जॅट युगोस्लाव्ह एअरलाइन्सच्या फ्लाइट ३६७ मध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती.

खरं तर त्या फ्लाईटवर ती नसणारच होती. कारण तिच्या जागी दुसरीच व्हेस्ना काम करणार होती. पण नावात गोंधळ झाला आणि त्या दिवशी व्हेस्ना व्हुल्व्हिक कोपनहेगन येथे जॅट युगोस्लाव्ह एअरलाइन्सच्या फ्लाइट 367 मध्ये चढली. फ्लाईट टेक ऑफ झालं. हे स्वीडनच्या स्टॉकहोमपडून ते सर्बियाच्या बेलग्रेडला जायला निघालं. या प्रवासात मध्ये दोन स्टॉप होते. पहिला डेन्मार्कला स्टॉप घेतला आणि दुसरा स्टॉप क्रोएशियाला होता. दुपारचे ४:०१ वाजले होते. तोवर फ्लाईट चेकोस्लोव्हाकिया म्हणजे आताचं चेक रिपब्लिक इथे पोहोचलं. आता फ्लाईट जमिनीपासून ३३३३३ फुटावर होती. उड्डाणानंतर ४६ मिनिटांनी लगेजच्या भागात एक जोरात स्फोट झाला. विमानाचे ३ तुकडे झाले आणि पुढे काय झालं, हे जाणून घेऊ. (Vesna Vulovic)

Vesna Vulovic

तर विमानाचा हवेत स्फोट झाला आणि विमानाच्या केबिनमधला हवेचा दाब कमी झाल्याने प्रवासी आणि इतर फ्लाइट क्रू बाहेर फेकले गेले. तेव्हा व्हेस्ना विमानाच्या मागच्या भागात अडकली होती, कदाचित ड्रिंक्स ट्रॉली ठेवायला गेली, म्हणून ती विमानाच्या मागच्या भागात अडकली होती, त्यामुळे ती बाहेर फेकली गेली नाही. विमानाचा तो भाग बाकीच्या विमानापासून वेगळा झाला आणि घनदाट जंगलात बर्फावर जोरात आदळला. व्हेस्ना जोरात खाली येत होती. ती लो ब्लड प्रेशरमुळे लगेच बेशुद्ध झाली.(Top Stories)

आता फ्लाईटचा तो तुटलेला भाग ३३३३३ हजार फुटावरून जोरात खाली येत होता. त्या भागात ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि त्या अवस्थेत ती त्या विमानाच्या भागासकट आदळली. फ्लाईटचा अक्षरशः चुरा झाला होता. सगळ्यांचे मृतदेह सगळीकडे पसरल्यासारखे पडले होते. फ्लाईटमधले सगळे क्रू मेम्बर्स आणि प्रवासी मेले होते. सगळीकडे भयाण शांतता पसरली. वारा आणखी जोरात वाहायला लागला. फ्लाईटचे तुकडे जळत होते आणि त्यातच एक ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज होता व्हेस्नाचा. व्हेस्ना जिवंत होती आणि मदतीसाठी ओरडत होती. (Vesna Vulovic)

३३३३३ हजार फुटांवरून पडली तरी ती जिवंत होती. तिची हाडं जवळपास मोडली होती. तिथेच जवळपास काम करायला आलेल्या एकाने तिचा आवाज ऐकला. त्या व्यक्तीने पाहिलं तर ती एकटीच ती जिवंत होती. तर त्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्यावर उपचार झाले. त्यातच ती २७ दिवस कोमात होती. तिचं डोकं, स्पाईन, पेल्वीस आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. ती तात्पुरती कमरेपासून खालपर्यंत अधू झाली होती. (Top Stories)

==============

हे देखील वाचा :  Hashima Island : जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं बेट रातोरात सुनसान !

==============

जेव्हा सगळीकडे बातमी पसरली की, व्हेस्ना ३३३३३ फुटांवरून पॅराशूटशिवाय पडली तरी जिवंत होती. तेव्हा खरं तर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पण या अपघातात वाचलेली व्हेस्ना सगळ्यांच्या डोळ्यासमोर तर होतीच. तिच्या या चमत्कारिक वाचण्यामुळे तिचं नाव १९८५ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं. १० महिन्यानंतर ती पुन्हा चालू शकली. पण मणका वाकल्यामुळे तिला कधीच पूर्वीसारखं नीट चालता आलं नाही. तिला ती कशी वाचली, असं विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली, तिला त्यादिवशीचं काहीच आठवत नाही. (Vesna Vulovic)

काही लोकांनी असा दावा केला की, व्हेस्ना कदाचित इतक्या उंचीवरून पडलीच नसेल, विमान कमी उंचीवर असणार, नाही तर ती वाचलीच नसती. पण ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या फ्लाइट डेटाने हा दावा खोडून काढला गेला. त्या डेटानुसार, स्फोटाच्या वेळी विमानाची हाईट खरंच ३३३३३ फूट होती. २०१६ मध्ये व्हेस्नाचं वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं. पण व्हेस्ना इतक्या उंचीवरून वाचली खरी पण विमानात तो स्फोट कोणी आणि का केला, याचं उत्तर आजही मिळालं नाही. फक्त २०२४ मध्ये स्वीडनमधील क्रोएशियन दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला असं म्हटलं गेलं, पण या स्फोटाला नक्की कोण जबाबदार आहे, हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.