मलेशियातील वेन जान सिरीपान्योने यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. भगवी वस्त्र परिधान केलेले आणि एका भिक्षुकाचे जीवन जगणारे वेन जान सिरीपान्योने हे एका धनाढ्य कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत. मलेशियातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज आनंद कृष्णन हे त्यांचे वडिल आहे. मलेशियातील श्रीमंतांमध्ये आनंद कृष्णन यांचा नंबर वरचा आहे. वेन जान सिरीपान्योने यांनी आपल्या वडिलांचा वारसा नाकारत स्वतःचे जीवन धार्मिक कार्यासाठी समर्पित केले आहे. ग्लॅमरस जीवन नाकारून बौद्ध भिक्षू झालेले वेन जान सिरीपान्योने यांच्या वडिलांच्या एअरसेलने एकेकाळी प्रसिद्ध आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज प्रायोजित केले होते. याशिवाय वेन जॉन सिरीपान्योची आई, एम सुप्रिंदा चक्रबन यांचे थायलंडच्या राजघराण्याशी कौटुंबिक संबंध आहेत. (Ven Ajahn Siripanyo)
एवढ्या संपन्न कुटुंबातील आणि करोडो रुपयांच्या व्यवसायाचे वारसदार असलेले वेन जान सिरीपान्योने हे गेल्या 20 वर्षापासून बौद्ध भिक्षू म्हणून जीवन जगत आहेत. प्रसिद्ध मलेशियन उद्योगपती आनंद कृष्णन यांचा मुलगा वेन जान सिरीपान्योने याने वडिलांची 40 हजार कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती नाकारून आध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. वेन जान सिरीपान्योने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी अब्जावधी रुपयांचा कौटुंबिक वारसा त्याग केला आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारले. मलेशियातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत असलेले आनंद कृष्णन हे टेलिकॉम क्षेत्रातील टायकून समजले जातात. त्यांची संपत्ती सुमारे 40,000 कोटी रुपये आहे. (International News)
एवढी संपत्ती मिळाल्यानंतर वेन जान सिरीपान्योने आपल्या वडिलांच्या प्रचंड व्यापार साम्राज्याचा वारस बनतील अशी अटकळ बांधली जात होती, परंतु त्यांनी आध्यात्मिक राहून भिक्षू बनणे पसंत केले आहे. मलेशियामधील टेलिकॉम, मीडिया, तेल आणि वायू, रिअल इस्टेट आणि उपग्रह यांसारख्या विविध क्षेत्रात आनंद कृष्णन यांचा वावर आहे. अतिशय विलासात राहणा-या या कृष्णन कुटुंबातील हा तरुण अध्यात्माकडे कसा ओढला गेला, हेही जाणण्यासारखे आहे. वेन जान सिरीपान्योने हे वयाच्या 18 व्या वर्षी थायलंडला गेले होते. त्यांची आई थायलंडच्या राजघराण्यातील सदस्यांपैकी एक आहे. मात्र येथे राजघराण्यासोबत न राहता वेन जान सिरीपान्योने यांनी तेथील बौद्ध धर्माच्या शाळांना भेट दिली. तिथे काही काळ राहिल्यावर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता या घटनेला 20 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. वेन जान सिरीपान्योने हे थायलंड-म्यानमार सीमेवर दाताओ डॅम मठाचे मठाधिपती म्हणून काम सांभाळत आहेत. वेन जान सिरीपान्योने यांचे सगळे बालपण हे लंडनला गेले आहे. आपल्या दोन बहिणींसोबत ते लंडनाला शिकत होते. (Ven Ajahn Siripanyo)
=====
हे देखील वाचा : अमेरिकेने घ्यावे भारताकडून धडे !
========
जवळपास आठ भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मात्र या अलिशान जिवनातही काहीतरी कमी असल्याची जाणीव त्यांना होती. त्यातूनच त्यांनी थायलंडला भेट दिली आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी कठोर नियमांचे पालन केले. मुख्य म्हणजे, आपल्या कुटुंबापासून ते दूर झाले. बौद्ध धर्माच्या नियामानुसाराच त्यांनी आत्तापर्यंत अगदी मोजक्या वेळी कुटुंबियांची भेट घेतली आहे. वेन जान सिरीपान्योने यांच्या कुटुंबियांनीही त्यांचा हा निर्णय आनंदाने स्विकारला आहे. आनंदा कृष्णन यांच्या दोन मुली त्यांना व्यवसायात सहभागी आहेत. आपल्या भावाच्या या अध्यात्मिक वाटेबद्दल त्यांना आदर आहे. वेन जान सिरीपान्योने यांच्या आईची प्रतिक्रीया अधिक बोलकी आहे. थायलंडच्या राजघराण्यातील असलेली त्यांची आई, एम सुप्रिंदा चक्रबन हिला आपल्या मुलाचा अभिमान आहे. थायलंडमध्ये बौद्ध धर्माला मानाचे स्थान आहे. आपल्या मुलानं जीवनाचे खरे रहस्य जाणल्याचे त्यांच्या आईचे मत आहे. वेन जान सिरीपान्योने यांचे वडील आनंदा कृष्णन हेही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. आपल्या मुलानं संपत्तीपेक्षा बौद्ध धर्मातील तत्वांना महत्त्व दिले याचे त्यांना कौतुक आहे. वेन जान सिरीपान्योने यांच्याबद्दल माहिती सोशल मिडियावर आल्यामुळे, हे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (International News)
सई बने