केरळातील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिरातील तांदूळ आणि गुळाचा प्रसाद खाऊन ७० वर्षापर्यंत मंदिराची देखरेख करणाऱ्या दिव्य मगरीला भू समाधी दिली गेली आहे. या मगरीचा मृत्यू मंदिराच्या तलावातच झाला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, तिच्या मृत्यूचे कारण म्हणजे तिचे वाढलेले वय. या सर्वाच्या खुलासा तिच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एका प्राण्यात अशा प्रकारचा दुर्लभ भाव पाहण्यास मिळाला. (Vegetarian Crocodile)
असे सांगितले जात आहे की, मगर ही कासरगोड जिल्ह्यातील कुंबलामध्ये श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिराचा हिस्सा आहे. तिच्यावर हिंदू संन्यासीच्या रुपात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐवढेच नव्हे तर तिच्यावर अत्यंतसंस्कारण्यापूर्वी भाविकांना तिचे दर्शन सुद्धा दिले गेले. श्रद्धांजलि देण्याच्या हेतूने शव हे काही तासांपर्यंत मोबाईल फ्रीजरमध्ये ठेवले होते.
मंदिर ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष उदय कुमार यांचे असे म्हणणे आहे की, आपल्याजवळ एक हिंदू स्वामीजींच्या दफनासंबंधित अनुष्ठान आणि प्रार्थना केली. त्यांनी असे म्हटले की, शव मंदिराच्या जवळील खड्ड्यात पुरले गेले. त्यांनी असे म्हटले की, बबिया एख दिव्य आत्मा होती. भविष्यात भक्त तिच्या समाधीवर येऊन प्रार्थना करतील.
पुढे त्यांनी असे म्हटले की, बबिया अशावेळी चर्चेत आला होता जेव्हा तो शाकाहारी मगर असल्याचे समोर आले होते. भक्तांनी दावा केला की, मगर ही शाकाहारी आहे. याच कारणास्तव मंदिरातील प्रसादाचे सेवन करतो. त्यानंतर मगरीला दिव्य दर्जा प्राप्त झाला. मात्र या गोष्टीचा दावा केला जाऊ शकत नाही की, मगर पूर्णपणे शाकाहारी होता. त्यामुळेच तो मंदिराचा प्रसाद सेवन करायचा. मगर मंदिरात जवळजवळ ७० वर्षाहून अधिक काळ तलावात होता.(Vegetarian Crocodile)
हे देखील वाचा- बाबो… 700 ग्रॅमच्या सदस्याची झाली चोरी
मगरने कधीच कोणत्याही भाविकावर हल्ला केलेला नाही. बबिया मंदिरातील तलावात माशांसोबत रहायचा. जवळजवळ दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या अत्यंत पवित्र ठिकाणच्या शिड्यांवर त्याला पाहिले होते. दरम्यान, १९५४ मध्ये एका ब्रिटिश सैनिकाने या पवित्र ठिकाणी एका मगरीला गोळी मारली होती आणि काहीच दिवसांमध्ये आणखी एक दिसली. त्यामुळेच बबियाचे वय जवळजवळ ७० दशक असल्याचे मानले जाते.
मंदिराच्या पुजाऱ्यांनी असे म्हटले की, जेव्हा मगरीला पाहण्यासाठी एखादा जायचा तेव्हा तो आपल्या गुहेतच असायचा. याचा संबंध भगवान कृष्णाशी असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोक कथांच्या मते, मंदिराजवळ एक ऋषि तपस्या करायचे. एक दिवस भगवान कृष्णाने बाल्य रुपात तेथे पोहत ऋषिंना त्रास देऊ लागले. अशातच त्यांनी त्याच्यावर राग व्यक्त करत ढकलले. त्यामुळे ते पाण्यात पडले. काही वेळानंतर आपल्या चुकी बद्दल कळून आले तेव्हा बालकाला काढण्यासाठी ते पाण्यात उतरले. तेव्हा तेथे कोणीही नव्हते. जवळच्या एका गुहेत एक चिर पडली होती. असे म्हटले जाते तेथूनच भगवान निघून गेले. त्याच गुहेतून ही मगर आली होती जी त्या रस्त्याची देखरेख करायचा. नंतर लोकांनी त्याचे नाव बाबिया असे ठेवले.