भारत हा जसा बहुभाषिक देश आहे, तसेच बहुव्यंजनांचा देश म्हणूनही भारत ओळखला जातो. इथे प्रत्येक पावलावर भाषा बदलते, तशीच खाद्यसंस्कृतीही बदलते. भारतात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात मोजता येणार नाहीत, एवढे खाद्यपदार्थ तयार केले जातात. देशातील काही शहरे त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल जात. मध्यप्रदेशमधील इंदौरची खाऊगल्ली जगप्रसिद्ध आहे. केरळ पुट्टू, अप्पम या पदार्थांसाठी ओळखले जाते. (Palitana City)
मुंबई ही पावभाजी आणि वडापावसाठी ओळखली जाते. पंजाबमध्ये पराठा आणि पनीरच्या पदार्थांसाठी खाद्यप्रेमी आवर्जून जातात. तसेच गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना हे शहर संपूर्ण शाकाहारी शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा प्राचिन इतिहास आहे. इथे मोठ्या प्रमाणात जैन मंदिरे आहेत. 11 व्या शतकातील या जैन मंदिरात जगभरातून भाविक येतात. त्यामुळे या शहरात मांसाहार पूर्णपणे बंद कऱण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर मांसाहार करणे हा येथे गुन्हा होतो. जगातील पहिले आणि एकमेव शाकाहारी शहर म्हणून या भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहराची ओळख झाली आहे. जगातील पहिले आणि एकमेव शाकाहारी शहर म्हणून गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहर ओळखले जाते. या शहरात मांस खाणे, ते विकणे आणि प्राण्यांना मारणे हे गुन्हा मानले जाते. (Marathi News)
पालिताना हे जैन धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या शहरातील शत्रुंजय टेकड्यांवर 800 हून अधिक मंदिरे आहेत. यातील प्रमुख मंदिर आदिनाथ मंदिर असून या ठिकाणी जगभरातील भाविक वर्षभर येतात. याशिवाय या जैन मंदिरांचे सौंदर्य हे अद्भूत येतात. ही मंदिरे बघण्यासाठी येणा-या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच पालिताना हे पवित्र शहर मानले जाते. येथे येणा-या जैन भाविकांची मोठी संख्या पाहता या संपूर्ण शहरात मांस विकणे आणि त्यासाठी प्राण्यांची कत्तल करणे यावर बंदी आहे. हा नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येते. काही वर्षापूर्वी या भागात मोठ्या संख्येनं मांसविक्री करणारी दुकाने होती. मात्र जैन साधूंनी शासनाकडे या गोष्टीबाबत निषेध नोंदवला. तसेच जगभरातून पालिताना येथे येणा-या जैन भक्तांना यामुळे त्रास होत असल्याचे स्पष्ट केले. पालिताना शहराला शांकाहारी घोषित कऱण्यासाठी 200 जैन संतांनी उपोषण केले. या उपोषणाला समाजातून मोठा पाठिंबा मिळाला. (Palitana City)
त्यामुळे सरकारने 2014 मध्ये या शहरात प्राण्यांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी घातली. पालिताना शहराजवळ शत्रुंजय टेकड्यावरील जैन मंदिरे ही वास्तुकलेचा अद्वितीय नमुना म्हणूनही ओळखली जातात. या शहराला पूर्वी पद्लिप्तपूर म्हणून ओळखले जात होते. याशिवाय येथे असलेल्या मंदिराच्या संख्येमुळे मंदिराचे शहर म्हणूनही पालितानाची ओळख आहे. जगभरातील जैन धर्मिय एकदा तरी या शत्रुंजय टेकड्यांवरील मंदिरांना भेट देतात. या टेकड्यांवर 800 हून अधिक संगमरवरी कोरीवकाम केलेली मंदिरे आहेत. या मंदिरात जाण्यासाठी 3500 पाय-या चढाव्या लागतात. या मंदिरांबाबत एक कथाही सांगितली जाते, त्यानुसार भगवान नेमिनाथ वगळता 23 तीर्थंकरांनी या मृत्यूंजय टेकड्यांना भेट दिली आहे. येथील मुख्य मंदिर हे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना समर्पित आहे. पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी पालिताना शहराला भेट दिल्याने या शहराचे महत्त्व वाढले आहे. हे शहर जैन समुदायाचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आणि जगातील सर्वात मोठे मंदिर संकुल मानले जाते. त्यामुळे या भागाचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. पालिताना शहराचा इतिहासही मोठा आहे. (Marathi News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?
पूर्वी पद्लिप्तपुरा म्हणून ओळखले जाणा-या पालितानामध्ये मुघल राजवट होती. 1656 मध्ये गुजरातच्या मुघल शासकाने जैन व्यापारी शांतीदास झवेरी यांना पालितानाचा ताबा दिला. तेव्हापासून या शहरात जैन धर्मियांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली. या शहरातवर ब्रिटीशांचीही मोठी मर्जी होती. ब्रिटीश राजवटीमध्ये पालिताना हे ब्रिटीशांचे संस्थान म्हणून ओळखले जात होते. येथील मंदिरामुळे ब्रिटीश काळातही येथे येणा-या जैन भाविकांची संख्या मोठी होती. पालिताना शहराजवळील शत्रुंजय नदीच्या काठावर असलेल्या शत्रुंजय डोंगरमाथ्यावरील ही मंदिरे 11 व्या शतकात उभारली असल्याची माहिती आहे. वेळोवेळी या मंदिरात सुधारण करण्यात आल्या असल्या तरी त्यांचे कोरीवकाम हे अनोखे ठरते. याचीच भुरळ येथे येणा-या भाविकांना पडत आहे. (Palitana City)
सई बने