बॉलिवूड स्टार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण अलीकडल्या काळात काही बॉलिवूड कलाकारांनी नॉन-व्हेज खाणे सोडले असून ते आता पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले आहेत. यामध्ये आलिया भट, शाहिद कपूर सारख्या स्टार्सचा समावेश आहे. जाणून घेऊया असे कोणते स्टार आहेत जे आता प्युअर व्हेजिटेरियन झाले आहेत. (Vegetarian Bollywood Stars)
अमिताभ बच्चन
बिग बी यांना खाण्यापिण्याची फार आवड आहे. अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. हेल्दी आयुष्य जगण्यासाठी त्यांनी नॉन-व्हेज आणि अल्कोहोलचे सेवन करणे सोडले आहे. याशिवाय त्यांना अत्यंत साधे खाणे पसंत आहे. उत्तम आरोग्यासाठी ते भातही खात नाहीत.
आर माधवन
आर माधवन हा देखील प्युअर व्हेजिटेरियन आहे. माधवनला भाज्या फार आवडतात. त्याच्याकडे एक किचन गार्डनही आहे. यामध्ये तो काही आयुर्वेदिक वनस्पती उगवतो. नॉन-व्हेज खाणे म्हणजे जनांवरांवर अत्याचार करण्यासारखे असल्याचे त्याला वाटते. याच कारणास्तप त्याने नॉन-व्हेज खाणे टाळले आहे.
जॉन अब्राहम
बॉलिवूडमधील फिटनेस स्टार म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहमही व्हेजिटेरियन आहे. तो आपल्या डाएटमध्ये ही भाज्यांचा समावेश करतो.
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरन नॉन-व्हेज सोडून प्युअर व्हेजिटेरियन झाली आहे. नॉन-व्हेज सोडून तिला चार वर्षे झाली असतील. तिच्या या निर्णयामुळे ती फार आनंदित आहे. श्रद्धाला चिकन फार आवडायचे. व्हेजिटेरियन झाल्यानंतर श्रद्धा कपूरला 2020 मध्ये पेटाकडून एक पुरस्कारही मिळाला होता.
रितेश आणि जेनेलिया
रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही नॉन-व्हेज खाणे सोडले आहे. या दोघांनी आपले व्हेंचर इमेजिन मीटची स्थापना केली आहे. रितेश आणि जेनेलिया हे दोघे आता प्युअर व्हेजिटेरियन झाले आहेत. (Vegetarian Bollywood Stars)
सोनम कपूर
सोनम कपूर काही वर्षांपूर्वीच शाहाकारी झाली आहे. सोनम कपूर ही फूडी आहे. तिला चॉकलेट्स फार आवडतात. पण ज्यावेळी सोनमला कळले की, ती लॅक्टोसचे सेवन करू शकत नाही. तेव्हापासून तिने नॉन-व्हेज खाणे सोडले आहे.
आणखी वाचा: साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट