Home » वीगन मिल्क की गाईचे दूध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

वीगन मिल्क की गाईचे दूध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

दूध आपल्या शरीराच्या संपूर्ण विकासासाठी फार महत्त्वाचे कार्य करते. दूधात व्हिटॅमिन्स, मिनिरल्ससह काही पोषक तत्त्वे आढळतात.

by Team Gajawaja
0 comment
vegan vs cow milk
Share

दूध आपल्या शरीराच्या संपूर्ण विकासासाठी फार महत्त्वाचे कार्य करते. दूधात व्हिटॅमिन्स, मिनिरल्ससह काही पोषक तत्त्वे आढळतात. याच कारणासतव याला कंम्प्लिट फूड असे म्हटले जाते. दूधात कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्याने हाडांना बळकटी मिळते. पण काही लोकांना दूध पिणे पसंद नसते. त्याला काही पर्यायी पदार्थांचा समावेश ते आपल्या डाएटमध्ये करतात. (vegan vs cow milk)

बहुतांश लोक आजकाल वीगन डाएट फॉलो करतात. याच कारणास्तव ते प्लांट बेस्ड मिल्कचा डाएटमध्ये समावेश केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, गाईचे दूध आणि या प्लांट बेस्ड दूधात नक्की काय फरक असतो? तसेच कोणते दूध अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे देखील जाणून घेऊयात.

गाईचे आणि प्लांट बेस्ड दूधात काय आहे फरक
गाईच्या दूधात 90 टक्के पाणी असते. त्याचसोबत कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह काही प्रोटीन असतात. जे लो फॅट असतात. याव्यतिरिक्त या दूधात पाणी असल्याने तुम्ह हाइड्रेट राहण्यास मदत होते. हे दूध पचनास हलके असते.

Plant Based Milk vs Cow's Milk: Which is Better? - To Taste

प्लांट बेस्ड मिल्कला वीगन मिल्क असे म्हटले जाते. हे पशूंपासून मिळणाऱ्या दूधापेक्षा फार वेगळे असते. ते झाडांपासून मिळणाऱ्या पदार्थांपासून तयार केले जाते. यामध्ये कमी फॅट असते.वीगन डाएटमध्ये खरंतर गाईचे दूध प्यायले जात नाही. यामध्ये मांस, डेयरी प्रोडक्टस, अंडी, मध यांचा समावेश केला जात नाही. या व्यतिरिक्त शाहाकारी खाण्या चरबी, छास किंवा जिलेटिनचे देखील सेवन केले जात नाही. वीगन डाएट हे खरंतर प्लांट बेस्ड असते. वीगन डाएट फॉलो करणारीच लोक केवळ वीगन मिल्कचा वापर करतात. वीगन मिल्क हे सोया, कोकोनट मिल्क, कॅश्यू मिल्क, बादामाचे दूध, ओट्स मिल्कपासून तयार करण्यात येते.

आजकाल गाईच्या दूधात ही भेसळ करून ते विक्री केले जाते. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.न्युट्रिशियनिस्ट असे म्हणतात, ज्या लोकांना लॅक्टोज इंटोरलेंसची समस्या हे त्यांच्यासाठी वीगन मिल्क बेस्ट ऑप्शन आहे. सोया किंवा बादाम मिल्क लॅक्टोज फ्री असतात. यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. पण तुम्ही गाईचे दूध की वीगन मिल्क प्यावे याची निवड स्वत: करावी.(vegan vs cow milk)

पोषक तत्त्वांच्या आधारावर वीगन आणि गाईचे दूध यामध्ये फार फरक असतो. यामुळे यापैकी कोणते दूध आरोग्यासाठी बेस्ट आहे हे सांगणे थोडं मुश्किल असते.


हेही वाचा- किचनमधील ‘हे’ फूड्स वाढवतात तुमचे वजन


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.