Home » Marseille Port : वीर सावरकर आणि फ्रान्स !

Marseille Port : वीर सावरकर आणि फ्रान्स !

by Team Gajawaja
0 comment
Marseille Port
Share

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्यात अग्रक्रमानं नाव येतं ते विनायक दामोदर सावरकर यांचे. महान स्वातंत्र सेनानी वीर सावरकर हे क्रांतीकारी स्वातंत्र्यसैनिक होते. वकील, कवी, लेखक आणि नाटककार म्हणूनही त्यांची ओळख होती. या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भारतात विरोधक कितीही आगपाखड करीत असले तरी आज परदेशातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती जपण्यात आल्या आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटसाठी उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तेथील मार्सेली शहराला आवर्जून भेट दिली. फ्रान्सच्या या मार्सेली शहराला भारताच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. (Marseille Port)

115 वर्षांपूर्वी ब्रिटीश कैदेतून सुटून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हेच मार्सेली शहर गाठले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्सेली शहरात पोहोचले आणि त्यांनी वसाहतवादी काळात स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांना मदत केल्याबद्दल शहरातील लोकांचे आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मार्सेलीतून ब्रिटीश सैन्यानं अटक केली आणि त्यांच्यावर ऐतिहासीक खटला चालवला गेला. यात वीर सावरकरांना दोषी ठरवत त्यांना 50 वर्षांच्या काळ्या पाण्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्वात मार्सेली शहराचेही नाव घेतले जाते. त्याच शहरात जाऊन पंतप्रधान मोदी यांनी सावरकरांच्या पाठिशी उभं रहाणा-या फ्रेंच जनतेचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौ-यावर असतांना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेली शहराला आवर्जून भेट दिली. (International News)

भारताच्या स्वातंत्र्यात या शहराचे विशेष महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान शस्त्रे खरेदी आणि वाटप, इंग्रज सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे आणि देशद्रोहात्मक भाषणे दिल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मार्च 1910 मध्ये लंडनमध्ये अटक करण्यात आली. या अटकेपूर्वी वर्षभर आधी सावरकर लंडनमध्ये दाखल झाले होते. इंग्लंडहून त्यांना येमेन मार्गे एसएस मोरिया या ब्रिटिश जहाजाद्वारे भारतात आणले जात होते. सावरकर यांच्यावर इंग्रज खटला चालवणार होते. मात्र सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलीजवळील समुद्रात जहाजातून उडी मारली आणि पोहत मार्सेली बंदर गाठले. ही घटना छोटीशी वाटत असली तरी या घटनेनं अवघ्या जगाचे भारताच्या स्वातंत्रलढ्याकडे लक्ष वेधले गेले. 8 जुलै रोजी अवघ्या 27 वर्षाच्या सावरकरांनी घेतलेली ही स्वातंत्र्याची झेप पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरली. (Marseille Port)

सावरकरांना ज्या जहाजातून भारतात आणण्यात येत होते, त्या मोरिया जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून भर समुद्रात उडी मारली होती. यात सावरकरांच्या छातीला आणि पोटाला मार बसला. मात्र त्याही परिस्थितीत ते भर समुद्रातून पोहत मार्सेल बंदरावर पोहचले. फ्रेंच भूमीवर पाय ठेवला आणि त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. सावरकर फ्रेंच पोलीसांसमोर उभे राहिले आणि त्यांनी राजकीय आश्रय मागितला. सावरकारांचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास होता. त्यांनी फ्रेंच पोलिसांना आंतरराष्ट्रीय कायद्याची माहिती दिली. पण इंग्रजांनी फ्रेंच पोलिसांवर दबाव आणला. हे प्रकऱण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले. फ्रेंच पोलीसांनी सावरकरांना ब्रिटीशांच्या स्वाधीन केले आणि त्यांना परत मुंबईत आणण्यात आले. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्यात सावरकरांना 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनवण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर एका प्रयत्नात अपयशी ठरले असले तरी, त्यांच्या या ऐतिहासीक उडीनं अवघ्या जगाचं लक्ष भारताच्या स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. (International News)

=============

हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?

Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?

=============

भारताची गुलामगिरी जागतिक चर्चेचा विषय ठरली. फ्रेंच भूमीवर सावरकरांना बेकायदेशीरपणे अटक केल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयातही गाजला. स्वातंत्र्यसैनिक सावरकर हे दोनदा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे एकमेव क्रांतिकारक होते. या काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतांना वीर सावरकरांवर इंग्रजांनी जे क्रूर अत्याचार केले आहेत, त्याच्या आजही खूणा अंदमानच्या तुरुंगात आहेत. फ्रान्स सरकारने फ्रान्समध्ये वीर सावरकरांच्या स्मारकाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या भागाला भेट देऊन स्वातंत्रवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लिहितांना फ्रान्समधील हे मार्सेली शहर आणि त्याचा समुद्रकिनारा यांचा कायम उल्लेख होणार आहे. (Marseille Port)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.