कुर्मग्राम मध्ये ना वीज आहे ना इंटरनेटची सुविधा. मनोरंजनासाठी टेलिव्हिजन ही नाही. कोणत्याही घरात गॅस नसल्याने चुलीवर जेवण शिजवले जाते. कोणाकडे ही अत्याधुनिक गोष्टी, उपकरणं किंवा गॅजेट्स ही नाहीत. ऐवढेच नव्हे तर लोक मोबाईल ही वापरत नाहीत. संपूर्ण गावाक केवळ एक सामान्य फोनची सुविधा आहे.जेव्हा एखाद्याला फोनवरुन एखाद्याशी बोलायचे असते तेव्हा ते या सार्वजनिक लँन्डलाइनचा वापर करतात.(Vedic Village)
गरिबी नव्हे तर स्वत:हून त्यागल्यात काही गोष्टी
गावाची जी स्थिती आहे, त्याबद्दल ऐकून असे वाटते की, येथील लोक फार गरीब आहेत. त्यामुळे ते लोक आधुनिक जगासारखे जगत नाहीत असे वाटते. असे ही नाही की, लोक सुखसोईंचा आनंद घेऊ शकत नाही. पण या सर्व गोष्टींचा त्यांनीच स्वत:हून त्याग केला आहे. येथील लोकांची साधी राहणीमान, उच्च विचारसरणी आहे. गावात १४ परिवार आणि काही कृष्ण भक्त राहतात. ज्यांनी आपले आयुष्य कृष्णाला समर्पित केले आहे.
सर्व गोष्टी स्वत: करतात
कुर्मा ग्राम श्रीकाकुलमपासून जवळजवळ ६ किमी दूर आहे. गावातील घर ९ व्या शतकापासून भगवान शअरीमुख लिंगेशवर मंदिराच्या धरतीवर बांधली आहेत. लोकांचा दिवस सकाळी साडे तीन वाजता सुरु होते. तर संध्याकाळी साडे सात वाजता गावातील सर्व लोक झोपतात. त्याचसोबत नेहमी घालण्याची वस्र ही स्वत: शिवतात, जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या, अन्नधान्य ही स्वत: उगवतात. कोणीही कोणावर निर्भर नाही. येथे येणाऱ्या लोकांना अन्नदान ही केले जाते. त्याला प्रसाद असे बोलले जाते.

३०० वर्षांपूर्वी सारखे आयुष्य जगतात
गावात राहणारे राधा कृष्ण चरण दास यांनी कृष्णाच्या भक्तीसाठी आपली आयटी मधील नोकरी सोडली आणि एक शिक्षक झाले. ते असे सांगतात की, आमचे पूर्वज ३०० वर्षांपूर्वी जसे आयुष्य जगायचे त्याच पद्धतीने आम्ही जगतो. नातेश्वर नरोत्तम दास सुद्धा या गावातील गुरुकुलाचे प्रमुख आहेत. आम्ही भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने जे सांगितले त्याच उद्देशावर आयुष्य जगतो. (Vedic Village)
बाहेरील जगाशी संबंधच नाही
कुर्मग्राम मधील स्थानिकांना याची परवाह नाही की, त्यांच्या आश्रमाबाहेर काय होते. परंतु त्यांना अभ्यागतांकडून सतत माहिती मिळत असते. येथे येणाऱ्या लोकांची संख्या गावीतील प्रसिद्धीसह वाढत आहे. आठवड्यातील रविवारी तर हजारो लोक येतात. येथील आश्रमात येणारे लोक तेलंगणा आणि अन्य तयीट आँध्र जिल्ह्यातील असतात.
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मंदिरात नामकरणासाठी मुलं नव्हे तर पाळीव कुत्र्यांना आणले जाते
परदेशी नागरिक ही येऊन राहतात
आश्रमाच्या आसपासच्या गावात आध्यात्मिकता आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार केला जातो. आश्रम आणि गुरुकुलात राहणारे हजारो लोक आध्यात्मिक ज्ञान आणि कृष्णभावनामृत शिकतात. तर बाहेरुन येणाऱ्या लोकांना आश्रमात राहण्याची परवानगी दिली जाते. जर त्यांनी त्यांचे सिद्धांत पाळले तरच ही परवानगी मिळते. येणाऱ्या परिवारांसह ब्रम्हमचारी भक्तांना वेगवेगळे ठेवले जाते. काही परदेशी नागरिकांनी कुर्मग्रामलाच आपले घर बनवले आहे. अर्जेंटिनात जन्मलेली आणि एक इटालियन नागरिक, रुपा रघुनाथ स्वामी महाराज यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ म्हणजेच जवळजवळ १९७८ मध्ये भारतात येण्यास सुरुवात केली होती.