Vastu Tips : वास्तुशास्रानुसार घरातील बाथरुम आणि टॉयलेट फार महत्वपूर्ण मानले जाते. शास्रानुसार घरातील बाथरुम अथवा टॉलेट असे स्थान असते जेथून सर्वाधिक उर्जा संचारित होत असतात. ही उर्जा सकारात्मक अथवा नकारात्मक असू शकते. याच कारणास्तव वास्तुशास्रात असे म्हटले आहे क, बाथरुम अथवा टॉयलेटसंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याची योग्य दिशा नसल्यास घरात नकारात्मक उर्जा अधिक वाढल्या जातात. जाणून घेऊया कोणत्या दिशेला बाथरुमचा दरवाजा असणे उत्तम मानले जाते.
कोणत्या दिशेला असावा बाथरुमचा दरवाजा?
बाथरुमचा दरवाजा नेहमीच उत्तर-पश्चिम दिशेला असावा. या दिशेला बाथरुमचा दरवाजा असल्यास घरातील नकारात्मक उर्जा कमी आणि सकारात्मक उर्जा वाढल्या जातात. याशिवाय उत्तर दिशेला बाथरुम असल्यास दरवाजाच्या अशा ठिकाणी तयार करा जेथून पश्चिम दिशा येईल.
याशिवाय बाथरुम कधीच दक्षिण, दक्षिण-पश्चिम अथवा दक्षिण-पूर्व दिशेला नसावे. जर घरात बाथरुम उत्तर-पश्चिम दिशेला असल्यास आणि बाथरुमचे दरवाजे आतमधील बाजूस उघडल्यास समोर दक्षिण-पूर्व दिशा येत असल्यास तर शुभ मानले जाते. यामुळे घरातील कोणतेही दोष आपोआप दूर होऊ लागतात. (Vastu Tips)
वास्तुशास्रात असेही सांगण्यात आले आहे की, बाथरुमचा दरवाजा उत्तर दिशेला उघडत असल्यास अथवा पूर्व दिशेला उघडत असल्यास व बाथरुम कोणत्याही दिशेला असेल तर घरावर वाईट परिणाम होत नाही. याशिवाय वास्तुदोषही निर्माण होत नाही. यावेळी एक गोष्ट लक्षात टेवा बाथरुमचा दरवाजा कधीच तुटलेला नसावा.