आपल्या शास्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपल्यासाठी फायदेशीर असतात. त्याचसोबत वास्तु शास्र असे एक प्राचीन विज्ञान आहे जे घरात सुख-शांति आणते. जर तुमच्या आजूबाजूचे वातावरण बिघडलेले असेल तर त्यासाठी तुमची वास्तू कशी आहे हे फार महत्त्वाचे असते. वास्तुच्या काही उपायांनी तुम्ही घरात आणि आयुष्यात आनंदाचे क्षण आणू शकता. (Vastu Tips)
त्यापैकीच एक विशेष उपाय म्हणजे कापूरचा वापर. कापूर घरातील वातावरण शुद्ध राखण्यास मदत करते. असे सुद्धा म्हटले जाते की, जर घरात नियमित रुपात कापूर जाळल्यास तर घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. कारण कापूरमध्ये शुद्धिकरणाचे गुण असतात. ते आपल्या आयुष्याला प्रभावित करतात. अशातच घरात कापूर कुठे-कुठे ठेवला पाहिजे हे जाणून घेऊयात.
तिजोरीत ठेवा कापूर
जर तुम्ही आर्थिक समस्येचा सामना करत असाल तर एक कापूराचा तुकडा तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे धन योग होतो. पैसा विनाकारण कोणत्याही ठिकाणी खर्च होणार नाही. त्याचसोबत तुम्ही तुमच्या शिखात सुद्धा कापूरचा तुकडा ठेवू शकता.
किचनमध्ये ठेवा
वास्तुशास्रानुसार जर घरातील किचनमध्ये कापूर ठेवणे फायदेशीर मानले जाते. यामुळे सकारात्मक उर्जा वाढतात. कापूरामुळे अन्नाला लागणारे किटक दूर होतात. किचमध्ये कापूर ठेवल्याने अन्न-धनाची कमतरता कधीच निर्माण होत नाही.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर ठेवू सकता. कारण येथून सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा घरात येत असते. जर तुम्ही तेथे कापूर ठेवला तर नकारात्मक उर्जा येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील. (Vastu Tips)
देवघरात ठेवा कापूर
वास्तुशास्रानुसार घरातील देवघरात कापूर ठेवणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. कारण हेच घरातील उर्जेचे केंद्र असते. कापूरच्या माध्यमातून तुम्ही घरात सकारात्मक उर्जा पसरली जाते. असे मानले जाते की, पूजेदरम्यान जर तुम्ही कापूर जाळला तर घरातील वातावरण पूर्णपणे शुद्ध होते. यामुळे परिवारातील सर्वांना मानसिक शांती मिळते.
हेही वाचा- Vastu Tips for Home: घरात सुख, शांति वैभव नांदण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या वास्तु टिप्स !