आपले घर सजवण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्न करताना दिसतो. बाजारात कुठेही आपल्याला फिरताना काही चांगली वस्तू दिसली की लगेचच आपण आपल्या घरासाठी ती घेतो. आपण आपल्या घरासाठी त्याच्या डेकोरेशनसाठी ज्या काही सजावटीच्या वस्तू घेतो. त्यापैकी अनेक सजावटीच्या वस्तू अशा असतात की, त्या योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेने न ठेवल्यास वास्तू दोष निर्माण होऊ लागतात. सकारात्मक, नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर घडत असतो. आपल्याकडे असलेल्या वास्तुशास्त्रानुसार घरातील लहान मोठ्या सर्वच वस्तू आपल्यावर काही ना काही परिणाम करताना दिसतात. त्यामुळेच आपण घेत असलेल्या वस्तू विचार करून घ्यायला पाहिजे.
प्रत्येकालाच आपले जीवन आनंदाने व्यतीत व्हावे असे वाटत असते. शिवाय आपल्या घरात देखील कायम सकारात्मकता, आनंद असावा अशी इच्छा असते. यासाठी आपण विविध उपाय करतो, देवाची पूजा अर्चना, व्रत, विविध उपाय आदी अनेक गोष्टी करून घर सुखी करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण आपले घर शांत, सुखी करू इच्छित असाल तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय दिले आहे. हे उपाय वापरून आपण आपले घर सकारात्मकतेने भरून देऊ शकतात.
वास्तुशास्त्रात दिलेला एक उपाय म्हणजे घरात पिरॅमिड ठेवणे. पिरॅमिड हा चिनी वास्तुशास्त्रात अर्थात फेंगशुईमध्ये देण्यात आलेला उपाय आहे. घरात सजवटीसाठी पिरॅमिडचा वापर केला जातो. सजावट म्हणून वापरलेला पिरॅमिड योग्य ठिकाणी ठेवल्यास वास्तू दोष दूर होण्यासही मदत होऊन आर्थिक स्थैर्य येते. घरात पिरॅमिड ठेवण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
– घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे कौटुंबिक कलह, आर्थिक संकट, मानसिक तणाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पिरॅमिड घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो. यामुळे घरात सुख-शांती राहते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
– वास्तूनुसार घरात पिरॅमिड ठेवणे खूप शुभ मानले जाते. पिरॅमिड ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. व्यावसाय आणि नोकरीमध्ये प्रगती झाल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात.
– पिरॅमिडमध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तणावग्रस्त किंवा थकलेल्या व्यक्तीने पिरॅमिड जवळ ठेवल्यास त्याचे मन शांत होते आणि सर्व प्रकारचा थकवा दूर होतो.
– जर मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर स्टडी रूममध्ये पिरॅमिड ठेवणे शुभ आहे.
– तुमचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिस केबिनच्या नैऋत्य-पश्चिम कोपऱ्यात पिरॅमिड ठेवू शकता.
– जर मालमत्ता विकण्यात अडचणी येत असतील तर तुमच्या मालमत्तेच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात पिरॅमिड ठेवला तर चांगले असते.
– जर झोप नीट होत नसेल, तर घराच्या नैऋत्य कोपऱ्यात पिरॅमिड ठेवावा. यामुळे तुमचे मन शांत राहते आणि शांत झोप लागते.
– जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल तर पिरॅमिड बेडजवळ ठेवला तर लाभदायक असते.
-वास्तूनुसार दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवल्याने हितशत्रूंपासून संरक्षण होते. महत्वाचे म्हणजे कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या लोकांनी पिरॅमिड दक्षिण दिशेला ठेवावा. त्याचा फायदा होतो.
– पिरॅमिड पूर्व दिशेला ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिड पूर्व दिशेला ठेवल्यास मान-सन्मान आणि कीर्ती वाढते.
पिरॅमिडची योग्य दिशा
वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व आहे. दिशेनुसार वास्तु पिरॅमिड नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. हे असे ठिकाण आहे जे जास्तीत जास्त ऊर्जेचे केंद्र मानले जाते आणि या दिशेला वास्तू पिरॅमिड लावल्याने तुमच्या घराची उर्जा संतुलित राहण्यास मदत होते.
(टीप : ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)