Home » वास्तुनूसार वर्कटेबलवर ‘या’ गोष्टी ठेवणे टाळा

वास्तुनूसार वर्कटेबलवर ‘या’ गोष्टी ठेवणे टाळा

असे काहीवेळेस होते की, आपले कामात मन लागत नाही अथवा कामात वारंवार चुका होत राहतात. कधीकधी असे सुद्धा होते सामान्य आहे. पण तुमच्यासोबत सातत्याने असे होत असेल तर थोडं सतर्क राहण्याची गरज आहे.

by Team Gajawaja
0 comment
Vastu Tips
Share

असे काहीवेळेस होते की, आपले कामात मन लागत नाही अथवा कामात वारंवार चुका होत राहतात. कधीकधी असे सुद्धा होते सामान्य आहे. पण तुमच्यासोबत सातत्याने असे होत असेल तर थोडं सतर्क राहण्याची गरज आहे. कधीकधी आपल्या वास्तुच्या चुकांमुळे आपले कामात मन लागत नाही किंवा कामातील ग्रोथ थांबली जाते. बहुतांशवेळा आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्कटेबलवर तुम्ही काय ठेवता हे लक्षात ठेवणे गरजेचे असते. (Vastu Tips)

खरंतर असे केल्याने कामावर बहुतांश प्रमाणात परिणाम होतो. तुम्हाला माहिती नसेल पण वास्तुनूसार अशा काही गोष्टी असतात ज्या वर्कटेबलवर ठेवू नये. अन्यथा कामावर वाईट परिणाम होतो.

-फालतू सामान ठेवू नका
काही वेळेस आपण वर्कटेबलवर अशा काही गोष्टी ठेवतो ज्याच्याशी आपले काही घेणेदेणे नसते. अथवा ते काम पूर्ण झालेले असते. अशातच आपण वर्कटेबलवरील अशा काही फाइल्स किंवा कागदपत्र ठेवू नका. फालतू सामान वर्कटेबलवर ठेवण्यापासून दूर रहा. यामुळे व्यक्तीचे मन कामात लागत नाही. त्याचसोबत त्याच्या कामात वारंवार चुका सुद्धा होऊ शकतात.

12 things on your work desk that are making you look unprofessional

-न वापरल्या जाणाऱ्या वस्तू
कधीकधी अशी स्टेशनरी जसे की, बंद झालेले पेन अथवा कंप्युटरचा पार्ट वर्क करत नसेल तर ते ठेवू नये. या गोष्टी आपण व्यवस्थितीत करून पुन्हा वापरू म्हणून त्या टेबलवर ठेवतो. जर तुम्ही त्या लगेच ठिक करणार असेल तर उत्तम. पण त्यासाठी वेळ लागणार असेल तर त्या वस्तू वर्कटेबलवरून काढून टाकाव्यात. अशा वस्तूंना डेड आइटम मानले जाते. याच वस्तू तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. (Vastu Tips)

-फोटो ठेवू नका
बहुतांश लोक वर्कटेबल डेकोरेट करण्यासाठी काही फोटो लावतात. पण तेथे असे कोणतेही फोटो लावू नये ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. जसे की, एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून गेला किंवा त्यांचा मृत्यू झालाय, तुमच्यापासून दूर राहतात अशांचे फोटो लावू नका. असे फोटो पाहून सतत वाईट वाटत राहते. याचाच परिणाम तुमच्या कामावर होतो.

-आरसा ठेवू नका
आपल्या वर्कटेबलवर कधीच आरसा ठेवू नका. यामुळे निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकतात. तसेच तुमचा ऑरा डॅमेज होऊ शकतो. अशा प्रकारे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कामात केले तर मनात उदासिनता आणि कामात चुका सुद्धा होत राहतात.


हेही वाचा- घरात दररोज ‘या’ दिशेला लावा दिवा, होईल धनवर्षाव

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.