Home » Vastutips : घरात घोड्याची नाल लावण्याने होतील चमत्कारिक फायदे

Vastutips : घरात घोड्याची नाल लावण्याने होतील चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vastutips
Share

आपल्या सर्वांनाच वाटत असते की, आपली, आपल्या कुटुंबातील सदस्यांची कायम भरभराट व्हावी, सगळ्यांनाच आयुष्यात यश, कीर्ती, पैसा मिळावा. यासाठी दैवी आशीर्वाद, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अजोड मेहनत सर्वच करत असतात. मात्र यासोबतच अनेक लोकं घरात वास्तुशास्त्राशी, फेंगशुई संबंधित विविध उपाय देखील करत असतात. बऱ्याच लोकांचा यावर विश्वास असतो. असे काही उपाय केल्याने यश, सुख, समृद्धी आदी सर्वच प्राप्त होत असल्याचे मानले जाते. अशाच काही उपायांचा एक भाग म्हणजे घरात घोड्याची नाल लावणे. अनेक घरांमध्ये आपण जर पाहिले तर उंबरठ्याला ही नाल लावलेली दिसते, काहींच्या घरात विशिष्ट ठिकाणी ठेवलेली असते. मात्र नक्की घोड्याची नालला वण्याचे फायदे आहेत तरी काय? आणि ही नाल कुठे लावतात? जाणून घेऊया याबद्दल (Vastu Tips)

घोड्याच्या नालला शुभ आणि पवित्र मानले जाते, घोड्याची नाल म्हणजे काय तर घोड्याला पळताना काही दुखापत होऊ नये, त्याचे पाय घसरू नये, यासाठी त्याच्या पायाला अर्धगोल आकाराची एक लोखंडी पट्टी ठोकलेली असते. जेव्हा ही पट्टी घोड्याच्या पायातून निघून पडते, तेव्हा ही नाल तुम्ही जर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठोकली तर सर्व प्रकारच्या वाईट शक्तिपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं. कोणाचीही नजर तुमच्या घराला लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर घोड्याची नाल ठोकलेली असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही, घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते (Marathi News)

– मान्यतेनुसार काळा घोड्याच्या नालला काळ्या कपड्यात गुंडाळून धान्यात ठेवले तर कधीही धान्याची कमतरता भासणार नाही. कायम बरकत राहील.
– काळ्या घोड्याची नाल काळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास संपत्ती वाढते.
– जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावा. असे केल्याने काही दिवसातच याचा लाभ मिळू लागतो आणि धन मिळण्याचे मार्ग दिसू लागतात. (Todays Marathi HEadline)
– जर एखाद्या व्यक्तीला शनिदोषाचा त्रास होत असेल, तर त्याच्या पलंगावर घोड्याची नाल लटकवावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
– ज्यांना शनीची साडेसाती सुरु असेल, त्यांनी घोड्याच्या नालेची अंगठी बोटात घालावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपाचे वाईट परिणाम दूर होतात.

Vastutips
– जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने लावावा. घराच्या मुख्यदारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते. (Top Stories)
– तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढू लागली असेल, सतत घरामध्ये वाद होत असतील, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल बसवा. यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील.
– तुम्हाला करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्ही शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालीपासून बनवलेली अंगठी घालावी. काही दिवसामध्येच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील. (Top Trending Headline)
– जर तुमच्या यशाच्या मार्गात ग्रहांचा अडथळा येत असेल, तर काळ्या घोड्याच्या नालेचे ब्रेसलेट घाला, यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
– कुटुंबात वाद किंवा भांडण होत असेल तर दारावर घोड्याचा नाल लटकवल्याने वाईट नजर आणि हानिकारक ऊर्जा दूर होते.
– वाईट स्वप्ने दूर ठेवण्यासाठी पलंगाच्या वर एक घोड्याचा नाल देखील ठेवला जातो.
– महत्त्वाच्या कामाला किंवा कार्यक्रमांना जाण्यापूर्वी लोक घोड्याच्या नालाला हात लावून शुभेच्छा देतात. (Top Marathi News)

घोड्याचे नाल ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* सुख, सौभाग्य आणि सुरक्षिततेसाठी घोड्याचा नाल दरवाजाच्या चौकटीबाहेर मुख्य दरवाजाच्या वर ठेवावा.
* घोड्याच्या खुराला जोडलेला मूळ जोडा खूप शुभ मानला जातो, परंतु कोणत्याही प्रकारे प्राण्यांना त्रास देऊन घोड्याचा नाल मिळवू नये.
* घोड्याची नाल दरवाजाच्या वर लावताना, लक्षात ठेवा की ती U आकारात लावावी. असे मानले जाते की घोड्यांच्या नालांचे निराकरण करण्याचा हा वास्तविक आणि सर्वोत्तम मार्ग आहे. (Latest Marathi HEadline)
* फेंगशुईनुसार घोड्याचे नाल धातूचे बनलेले असतात. या कारणास्तव, पूर्व आणि आग्नेय दिशेला असलेल्या दारावर ठेवू नये असा सल्ला दिला जातो.
* घोड्याचा नाल पश्चिम, उत्तर-पश्चिम आणि उत्तर दिशेला ठेवणे शुभ आणि परिणामकारक मानले जाते.
* घोड्याच्या नालेवर काळा धागा बांधून घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला लटकवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्याचबरोबर घरात सुख-शांती नांदेल. (Top Trending News)

========

Maharashtra : ‘त्या’ चार बायका रोज १३ वाघांशी नडतात !

========

घोड्याची नाल लावण्यापूर्वी हे करा
घोड्याच्या पायातून निघून पडलेली नाल सापडली तर खूपच चांगले. पण, जर सापडली नाही तर लोहाराकडून बनवलेली नालही घरात आणलेली चालते. ही नाल घरी आणल्यानंतर ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून घोड्याची नाल गंगाजलाने धुवावी. यानंतर घोड्याची नाल ओला झाल्यावर उन्हामध्ये घोड्याची नाल सुकवावी. यानंतर घोड्याची नाल घरातील देवऱ्यासमोर किंवा मंदिरात न्या आणि लक्ष्मीसमोर ठेवा. मग कुंकु आणि तांदळाने लक्ष्मीची पूजा करावी आणि नंतर घोड्याच्या नालची पूजा करावी. घोड्याच्या नालला काळ्या धागा किंवा दोरी बांधा. यानंतर घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला कुठेतरी लटकवा. आर्थिक समृद्धीसोबतच घरात शांतताही कायम राहते. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.