एखादे नवे काम करताना आपल्या सर्वांच्या मनात एक भीती असते की, हे काम यशस्वी होईल की नाही. नव्या कामाबद्दल विविध शंका मनात निर्माण होत असतात. ते काम यशस्वी होण्यासाठी आपण खुप प्रयत्न करतो. परंतु असे प्रत्येकासोबतच होत नाही की, त्याला कामात पूर्णपणे यश मिळते. काही लोक ऐवढी मेहनत करतात तरीही यश त्यांना मिळत नाही. अशातच तुमच्यामध्ये काही वेळेस नकारात्मक उर्जा निर्माण होते. (Vastu tips for success)
असे असू शकते की, तुमच्या सोबत असे सातत्याने होत असेल आणि आपल्याला कहीच कळत नाही. अखेर अशावेळी काय करावे हे सुद्धा सूचत नाही. त्यामुळे काही वास्तू टीप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्येवर तोडगा काढू शकता.
-कागदपत्र योग्य ठिकाणी ठेवा
जर तुम्ही एखादे नवे काम सुरु करणार असाल तर त्या संबंधित कागदपत्र ही योग्य ठिकाणी ठेवली पाहिजेत. अशा प्रकारची कागदपत्र उत्तर दिशेच्या अगदी मधोमध ठेवावी. जर तुम्ही त्यानुसार केले तर तुमची उत्तम प्रगती होण्याची शक्यता असते.
-अस्वच्छता दूर करा
जर तुम्ही नवे काम करणार असाल तर सर्वात प्रथम तुमच्या घरात नको असलेले सामान काढून टाका. लक्षात ठेवा तुमच्या कामाच्या ठिकाणी अजिबात अस्वच्छता असू देऊ नका. यामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होतात आणि तुम्हाला तुमच्या कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
-पाण्याचे फाउंटेशन ठेवा
जेथे तुम्ही नवे काम सुरु करत असाल घर असो किंवा ऑफिस. तेथे उत्तर दिशेला मध्यम आकाराचे लहान पाण्याचे फाउंटेशन ठेवा. सकाळी ते सुरु करा आणि संध्याकाळी ४-५ वाजता बंद करा. यामुळे तुम्हाला कामासाठी खुप मदत मिळेल. (Vastu tips for success)
-फिनिक्स पक्षाचे पोस्टर लावा
जर नवे काम सुरु करत असाल तर आणि व्यवसायात स्वत:ला पुढे घेऊन जायचे असेल तर तुम्ही खुर्चीच्या मागील भिंतीवर फिनिक्स पक्षाचे पोस्टर लावा. यामुळे तुम्ही कामात पुढे रहाल. हे एक चाइनीज फेंगशुईचा पार्ट आहे. लक्षात ठेवा याचा आकार कमीत कमी सहा इंच तरी असावा.
हे देखील वाचा- तळहातावरील रेषा आणि निशाण सांगतात व्यक्तींचे भविष्य
-कार्यालयात ठेवा कासवाची मुर्ती
वास्तु शास्रानुसार ऑफिसमध्ये धातुपासून तयार केलेली कासवाची मुर्ती ठेवणे फायदेशीर असते. कारण ती ऑफिसमध्ये ठेवल्यास व्यापारात धन लाभ होण्यासह यश ही मिळते. तसेच अडलेली कामे ही पूर्ण होतात.