आपण नेहमीच आपल्या आजी-आजोंबांकडून किंवा घरातील एखाद्या वरिष्ठ मंडळींकडून असे ऐकतो की, चप्पल-बूट उलटी ठेवू नयेत. यामुळे घरात अनेक समस्या वाढू शकतात. मात्र या गोष्टीकडे कधीतरी आपण कानाडोळा करतो आणि आपल्याला ते पुढे जाऊन भारी पडते. वास्तु शास्रानुसार घरात चप्पल-बूट ठेवण्यासंदर्भात काही नियम आहेत. तर घरात प्रवेश केल्यानंतर चप्पल-बूट ठेवण्यासाठी आणि काढताना काही गोष्टींची खरंच काळजी घ्यावी लागते अन्यथा घरात दारिद्र आणि आर्थिक संकट येऊ शकते. तर जाणून घ्या या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी. (Vastu Tips for Sho Rack)
-नकारात्मक उर्जेचा वास
शास्रानुसार चप्पल-बूट उलटी ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो. यामुळे परिवारात सुख-शांती टिकत नाही. परिवारातील सदस्यांमध्ये ताणतणावाची स्थिती निर्माण होते आणि घरात धन येण्याच्या मार्गात ही अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच चप्पल-बूट उलटी ठेवू नयेत.

-‘या’ दिशेला ठेवू नका चप्पल-बूट
नेहमीच आपण घरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा घाईघाईत चप्पल-बुट कुठे ना कुठे तरी काढतो. यामुळे घरात दारिद्र येऊ शकते. आर्थिक संकटांचा सुद्धा सामना करावा लागू शकते. परिवारातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते.
शास्रामुळे घरात चप्पल-बुट उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरातील सकारात्मक उर्जा टिकत नाही. घरात देवी लक्ष्मीचा वास राहत नाही आणि यामुळेच धन सुद्धा लाभत नाही.(Vastu Tips for Sho Rack)
हे देखील वाचा- आसाम मध्ये मासिक पाळी संदर्भात ‘ही’ आहे अनोखी परंपरा
-चप्पल-बुट ठेवण्याची योग्य दिशा
वास्तुनुसार, घरात चप्पल-बुटांचे रॅक हे नेहमीच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ असते. घराबाहेरुन आल्यानंतर चप्पल-बुट ही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला काढून ठेवावीत. त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, चप्पल-बूट घरातील मुख्य द्वारावर ते काढू नयेत.
त्याचसोबत वास्तु शास्रानुसार चप्पल-बुटांचा रंग हा पिवळा नसवा. कारण पिवळा रंग गुरु संबंधित आहे. अशातच या रंगाचे चप्पल-बुट तुम्ही घालणार असाल तर तुम्ही गुरुचा अनादर करता असे वास्तु शास्रात सांगितले आहे. यामुळे गुरु ग्रह सुद्धा कमजोर होते. वास्तु शास्रात हा ग्रह सर्वाधिक शुभ मानला जातो. अशातच जर गुरु ग्रह कमजोर झाल्यास व्यक्तीच्या संस्कारांवर खुप वाईट परिणाम होतो. त्याचसोबत पैशांची चणचण ही निर्माण होते.