Vastu tips for Property- एखादी जमीन खरेदी करावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र काही वेळेस जमिन खरेदी केल्यानंतर ती त्यांना लाभदायी ठरत नाही. अशातच वास्तु शास्रानुसार, त्यामागील कारण असे की जमिनीचा आकार सुद्धा असू शकतो. त्यामुळे एखादी जमीन खरेदी करताना त्याचा आकार कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा पाहणे फार महत्वाचे असते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला जमिनीचे असे काही पाच आकार सांगणार आहोत ज्यामुळे घर खरेदी किंवा व्यवसायासाठी उत्तम मानली जाईल. वास्तु शास्रानुसार, जर त्यांच्या आकारांची जमीन खरेदी केल्यास तर घरात धन संपत्तीसह मुलांवर प्रत्येक प्रकारच्या सुखाचा वर्षाव होत राहिल.
शुभ आकाराच्या जमीनी कोणत्या आहेत?
वास्तु शास्रात नेहमीच शुभ आकाराची जमीन खरेदी करण्याबद्दल सांगितले गेले आहे. वास्तु शास्रानुसार पाच प्रकारच्या जमीनी नेहमीच लाभदायी असता. यामध्ये चौरस आकार, गोलाकार, आयताकार, गोमुखाका आणि सिंहमुखाकार जमिनीचा समावेश आहे. तर याच जमिनींबद्दल अधिक जाणून घेऊयात.
गोलाकार जमीन
अशा प्रकारची जमीन खरेदी केल्यास तुम्हाला धन लाभ होतो. कारण ती धनाची प्रतीक असल्याचे सांगितले जाते. या भूखंडावर जर घर बांधायचे झाल्यास तर गृह स्वामीच्या किर्तित वृद्धी होण्यासह धन ही प्राप्त होते.
चौरस आकार
ज्या भुखंडाची लांबी रुंदी एकसारखीच असते किंवा ज्या जमिनीचा प्रत्येक कोन ९० डिग्रीचा असेल अशी जमीन तुम्ही खरेदी करु शकता. यामुळे सुद्धा धन आणि यश मिळू शकते. वास्तु शास्रानुसार अशा भुखंडावर घर बांधणी केल्यास त्यामध्ये लक्ष्मीचा निवास राहतो. धन लाभासह घरातील मालकाचे ऐश्वर्य ही वाढते.
आयताकार
जमिनीचा समोरासमोरील हिस्सा हा समान आणि प्रत्येक कोन ९० डिग्रीचा असेल तर अशा भुखंडावर घर बांधणाऱ्या व्यक्तीसाठी हे फलदायी ठरते. वास्तु शास्रानुसार, अशी जमीन मालकाला धनासह मुलांचे सुख ही देते.(Vastu tips for Property)
गोमुखाकार
ज्या भुखंडाची मागील बाजू मोठा आणि प्रवेश दार हे लहान असेल अशा भुखंडाला गोमुखाकार असे म्हटले जाते. या भुखंडात प्रवेश करणारा व्यक्ती नेहमीच धनवान, चतुर आणि प्रत्येक सुविधांचा लाभ घेणारा असतो.या प्रकारची जमीन घरासाठी वापरल्यास तर ती श्रेष्ठच ठरेल.
हे देखील वाचा- घर न घेताच रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ‘हे’ आहेत काही स्मार्ट पर्याय
सिंहमुखाकार
ही जमीन गोमुखाकार पेक्षा उलटी असते. या भुखंडाचा मागील भाग लहान आणि प्रवेश दार हे मोठे असते. अशी जमीन व्यापारासाठी सर्वोत्तम मानली जाते. अशा जमिनीवर घर बांधणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला घर बांधायचे झाल्यास तर गोलाकार, चौसर आकार, आयताकार आणि गोमुखाकाराची जमीन खरेदी करा. पण व्यवसायासाठी मात्र सिंहमुखाकार जमीच खरेदी करावी.