Vastu tips for money plant- मनी प्लांटला वास्तु शास्रात फार महत्व आहे. कारण घरात मनी प्लांट लावल्याने घरातील सकारात्मक उर्जा अधिक वाढते आणि धन-संपत्तीत ही वाढ होते. बहुतांश लोक सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी ऑफिसच्या आपल्या टेबलवर सुद्धा मनी प्लांट ठेवतात. परंतु मनी प्लांट लावतेवेळी बहुतांश लोक वास्तुच्या काही नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मनी प्लांन्ट लावून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाहीच पण नुकसान होते. तर जाणून घेऊयात मनी प्लांट लावताना कोणत्या-कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
-मनी प्लांट हे नेहमीचय योग्य दिशेला लावले पाहिजे. ते उत्तर-पूर्व दिशेला लावू नये.असे म्हटले जाते की, या दिशेला लावल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच घरात नकारात्मकता सुद्धा वाढते. मनी प्लांट नेहमीच दक्षिण-पूर्व दिशेला असावे. कारण गणपती या दिशेला निवास करतो आणि कल्याण, समृद्धीचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात.
-मनी प्लांट हे झपाट्याने वाढणारे झाड आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की, त्याचा जमिनिला स्पर्श झाला नाही पाहिजे. याच्या वेली नेहमीच वरच्या दिशेने चढलेल्या असाव्यात. कारण वास्तुनुसार वाढत्या वेली या वृद्धी आणि समृद्धिच्या प्रतीक आहेत. मनी प्लांट देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. त्यामुळेच त्यांना जमिनीवर सोडून देऊ नका.
हे देखील वाचा- पूजा करण्यासाठी पितळेची भांडी का वापरली जातात?

-वास्तूनुसार मनी प्लांटचे झाड कधीच सुकू देऊ नका. खरंतर सुकलेले मनी प्लांट दुर्भाग्याचे प्रतीक आहे. ते तुमच्या घराची आर्थिक स्थिती प्रभावित करते. त्यापासून बचाव करण्यासाठी मनी प्लांटला नियमित रुपात पाणी देत रहा. जर पान सुकली असतील तर ती कापून टाका.(Vastu tips for money plant)
-मनी प्लांट नेहमीच घराच्या आतमध्ये ठेवा. या झाडाला उन्हाची अधिक गरज नसते, त्यामुळे ते घराच्या आतमध्ये लावावे. वास्तुनुसार, मनी प्लांन्ट घराच्या बाहेर लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे बाहेरच्या वातावरणामुळे ते लगेच सुकते आणि त्याची वाढ ही होत नाही. वाढ खुंटल्याने तुमचा विकास ही थांबतो आणि ते आर्थिक तंगीचे कारण ठरु शकते.
-वास्तुनुसार मनी प्लांट कधीच दुसऱ्याला देऊ नये. असे म्हटले जाते की, ते शुक्र ग्रहाला क्रोधित करते. शुक्र समृद्धि आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे असे केल्याने नुकसान होते.