Vastu Tips : आरशाचा वापर केवळ साज, शृंगार करताना स्वत: ला पाहण्यासाठी नव्हे तर वास्तुदोषही दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आरशाचा योग्य पद्धतीने वापर केल्याने वास्तुदोषांपासून दूर राहाता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांचा वापर करून तुम्ही आयुष्यात सुख-समृद्धी आणू शकता. याशिवाय नकारात्मक उर्जा यामुळे दूर राहू शकतात.
फुटलेला आरसा घरात ठेवू नये सांगितले जाते. कारण भारतीय संस्कृतीत फुटलेल्या आरशाला अशुभ मानले जाते. एखाद्या व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर फुटलेला आरसा पाहिल्यास तर त्याचा संपूर्ण दिवस समस्यांचा सामना करण्यामागे जाऊ शकतो. वास्तुशास्रानुसार, घरात फुटलेली काच किंवा आरसा ठेवू नये. अथवा फुटलेल्या आरशाचा वापरही अन्य दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी करू नये.
दोन आरसे एकमेकांच्या समोरासमोर लावू नये. यामुळे ज्या ठिकाणी आरसा लावला आहे तेथे शांती येण्याऐवजी तुम्ही अधिक बैचेन होता. वास्तुशास्रानुसार, तुम्ही झोपण्याच्या ठिकाणीही आरसा लावू नये. खासकरून असा, जेथून तुमचा बेड आरसामध्ये दिसेल. यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात सातत्याने वाद होऊ शकतात. याशिवाय घरात जागा कमी असेल तर झोपण्याच्या ठिकाणी आरसा असल्यास तो रात्रीच्या वेळेस पडद्याने झाकून ठेवा.
वास्तुशास्रानुसार असेही सांगितले जाते की, कोणत्याही खोलीच्या दरवाज्यामागे आरसा लावू नये. व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही आरसा अशा ठिकाणी लावा जेथे कॅश बॉक्स, बिलिंग मशीन, रजिस्टर अशा गोष्टींचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसेल. यामुळे संपन्नता येते. (Vastu Tips)
याशिवाय पूर्व दिशेच्या भिंतीला घरात किंवा कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यासमोर गोल आरसा लावणे शुभ मानले जाते. असा आरसा उगवत्या सूर्याचे प्रतिनिधित्व करते. उत्तर-पूर्व दिशेच्या भिंतीलाही आरसा लावणे शुभ मानले जाते.
घरातील एखाद्या कोपऱ्यात काळोख असल्यास तेथे नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत तुम्ही त्या ठिकाणी आरसा लावू शकता. पण आरसा लावताना देखील वास्तुशास्रानुसार दिशा पाहून लावा. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, किचनमध्ये आरसा लावण्याची चूक कधीही करू नका.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)