Vastu Tips : तुम्ही आजूबाजूच्या घरांमध्ये पाहिले असेल की, त्यांच्या घरात लाकडाचा दरवाजा असेल. आजकाल बदलत्या काळानुसार लाकडाचा देव्हारा घरात ठेवला जातो. पण वास्तुशास्रानुसार, घरात लाकडाचा देव्हारा ठेवण्यासंदर्भात काही नियम दिले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया…
कोणत्या लाकडाचा देव्हारा असावा
घरात लाकडाचा देव्हारा कोणत्या लाकडाचा आहे यावरुन कळते की, तो शुभ आहे की अशुभ आहे. वास्तु शास्रानुसार काही झाडांची लाकडे शुभ मानली जातात. यापासून देव्हारा तयार केल्यास तो शुभ मानला जातो. पण लक्षात ठेवा लाकडाला वाळवी लागणार नाही असा देव्हारा घरात असू द्या.
देव्हाऱ्याची योग्य दिशा
पूर्व-पश्चिम दिशेचा अर्थ असा होत नाही की, घरात लाकडाचा देव्हारा पूर्व दिशेलाच असावा. ज्यावेळी तुम्ही देव्हाऱ्या पूजा करणार असाल तेव्हा चेहरा पुर्वेला आणि पाठ पश्चिम दिशेला असावी. वास्तुशास्रानुसार, पुर्वेव्यतिरिक्त उत्तक दिशेला देव्हारा ठेवू शकता. (Vastu Tips)
देव्हाऱ्यात कोणत्या रंगाचे कापड असावे
लाकडाच्या देव्हाऱ्यात पिवळ्या अथवा लाल रंगाचे कापड असावे. ते शुभ मानले जाते. कधीच देवाची मुर्ती अथवा फोटो लाकडावर ठेवू नका.
भिंतीला टांगून ठेवू नका
सर्वसामान्यपणे घरात जागा कमी असल्याने घरातील भिंतीवर लाकडाचा देव्हारा कधीच टांगून ठेवू नका. वास्तुशास्रानुसार, असे केल्याने घरात सकारात्मक उर्जा येत नाही.