वास्तु शास्रात अशा काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरात सुख-शांती समृद्धी कायम टिकवू शकता. असे म्हटले जाते की, याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकतात. अशातच तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर वास्तु शास्रानुसार काही उपाय केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. (Vastu tips for Financial Crisis)
योग्य दिशेला असू द्या तिजोरी
वास्तु नुसार तिजोरी योग्य दिशेला ठेवल्यास घरात काही बदल होतात. त्यामुळे लक्षात असू द्या की, तुमची तिजोरी ही घरातील दक्षिण दिशेला आणि त्याचा दरवाजा हा नेहमीच उत्तर दिशेला उघडणारा असावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील धनाची समस्या दूर होते.
-घरातील दिशांसाठी वेगवेगळ्या रंगाचे महत्व
वास्तु शास्रात सांगण्यात आले आहे की, घरांच्या भितींना योग्य रंगांचा वापर न केल्यास काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नेहमीच रंगांकडे लक्ष द्या. खोलीच्या पूर्वेला सफेद रंग, पश्चिमेला निळा, उत्तरेला हिरवा आणि दक्षिणेला लाल रंग लावा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा नेहमीच टिकून राहते.

-घर स्वच्छ ठेवा
घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी त्या ठिकाणी येत नाही. अशातच आर्थिक संकट उभी राहतात. त्यामुळे नेहमीच आर्थिक संकटांपासून दूर राहण्यासाठी घरात नेहमीच साफसफाई करावी. या व्यतिरिक्त वास्तुदोष ही कमी होतो.(Vastu tips for Financial Crisis)
-घराचे वॉशरुम
वास्तु शास्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर परिवारावर प्रभाव पडत असतो. याच कारणामुळे लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्यावे. जर तुमच्या घरातील वॉशरुम हे दक्षिण-पश्चिम दिसेल तर सतर्क रहा. असे म्हटले जाते की, दक्षिण-पश्चिम दिशेला स्नान गृह उभारणे शुभ मानले जात नाही.
हे देखील वाचा- ओखलेश्वर हनुमान मंदिरामध्ये घडला चमत्कार.. हनुमानाच्या मूर्तीने केली पापण्यांची उघडझाप
-मंगळवारी करा पेमेंट्स
असे म्हटले जाते की, प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व असते. अशातच जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर प्रयत्न करा की, प्रत्येक मंगळवारी पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. आचार्य सुद्धा हाच सल्ला देतात की, घराचे भाडे, दुकानाचे भाडे, बँकेचा हप्ता, शाळेची फी या व्यतिरिक्त अन्य पेमेंट सुद्धा मंगळवारीच करावे. असे मानले जाते की, मंगळवारी पेमेंट केल्यास तुमच्यावरील कर्ज कमी होते. त्याचसोबत आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते.
या व्यतिरिक्त घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व असा असावा. त्याचसोबत घराचे किचन हे ईशान्य कोनात असावे. घराचे बाथरुम उत्तर-पश्चिम दिशेला बनवण्यापासून दूर रहा. या व्यतिरिक्त घरात अशी काही झाडं लावा जी तुमच्यासाठी फायदेशीर असतील. जसे की, मनी प्लांट.