Vastu tips for finance- प्रत्येकाला आपल्या घरात सुख-शांतीने रहावेसे वाटते. मात्र काही वेळेस अधिक मेहनत करुन सुद्धा आपण अपयशस्वी होतो. त्यामुळे वास्तु शास्रानुसार, काही लहान-लहान चुकांकडे लक्ष न दिल्याने त्याचा मोठा फटका आयुष्यात बसतो. त्याचसोबत आपली प्रगती सुद्धा होत नाही. त्यामुळे वास्तू शास्रात अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या घरात ठेवल्यास तुम्हाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेलच. पण आयुष्यावर ही त्याचा वाईट परिणाम होतो. तर जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.
-फाटलेल्या जुन्या चप्पल
वास्तु शास्रानुसार घरात फाटलेल्या जुन्या चप्पल ठेवू नये. कारण त्या घरात ठेवल्यानंतर व्यक्तीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचसोबत आर्थिक स्थितीवर ही वाईट परिणाम होतो.
-बंद झालेले घड्याळ
काही लोकांची सवय असते की, घड्याळ खराब झाल्यानंतर ते घरातच ठेवतात. कारण त्याची काच किंवा घड्याळ कधी ना कधी वापरात येईल असा आपण विचार करतो. मात्र वास्तुनुसार घरात कधीच बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. कारण तुमच्या कामात विविध बाधा येऊ शकतात. त्यामुळे घड्याळ दुरुस्त तरी करा किंवा ठेवू नका.
हे देखील वाचा- घरात देवघराची रचना कशी असावी? जाणून घ्या वास्तूशास्र काय सांगते
-जुने वृत्तपत्र
वास्तु शास्रानुसार कधीच जुनी वृत्तपत्र घरात ठेवू नये. कारण यावर धूळ-माती जमा झाल्यास तुमच्या आर्थिकतेवर त्याचा परिणाम होतो. यासाठी जुनी वृत्तपत्र असतील तर ती लगेच घरातून काढा.
-खराब झालेले टाळं
घरात खराब झालेली टाळं कधीच ठेवू नये. कारण खराब टाळ्यांमुळे तुमची प्रगती थांबू शकते. यासाठी घरातील जुनं टाळं किंवा खराब झालेली टाळं वापरणे टाळा.(Vastu tips for finance)
-खराब इलेक्ट्रॉनिक सामान
काही वेळेस आपल्या घरात खराब चार्जर, बल्ब सारख्या गोष्टी उगाचच ठेवल्या जातात. परंतु वास्तुनुसार घरात खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक सामानातून नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढत जातो. त्यामुळेच तुम्ही आर्थिक चणचणीला तर सामोरे जालच पण समस्या ही वाढतील. त्यामुळे बंद पडलेल्या गोष्टी घरातून काढून टाका.
या व्यतिरिक्त नेहमीच अपशब्दांचा वापक करु नये असे ही वास्तु शास्रात सांगितले आहे. उत्तम आयुष्य जगण्यासाठी तुम्ही विविध प्रयत्न केले तरीही घरात शांतता नसेल, वारंवार अपशब्दांचा वापर किंवा भांडण होत असेल त्या ठिकाणी देव कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे देवाची आपल्यावर कृपा रहावी यासाठी सुद्धा घरात नेहमीच देवापुढे सकाळ-संघ्याकाळ दिवाबत्ती जरुर करावी असे ही वास्तु शास्रात सांगितले आहे.