कोणताही नवा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी व्यक्ती त्याबद्दल आधी विचार करतो, त्याचे प्लॅनिंग करतो आणि त्यानंतरच तो करायचा की नाही याचा निर्णय घेतो. काही वेळेस असे होते की, व्यवसाय सुरु करण्यासाठी फार मेहनत घेतली जाते. मात्र हाती निराशा येते. यामागे वास्तु दोष हे सुद्धा फार मोठे एक कार आहे. वास्तु शास्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्यापार वृद्धि करु शकता. (Vastu tips for business)
व्यापार वृद्धिसाठी करा या नियमांचे पालन
-वृद्धि यंत्राची पूजा
हिंदू धर्मात पूजेमध्ये यंत्रांचे खास महत्त्व असते. असे म्हटले जाते की, यंत्रांची पूजा केल्याने सकारात्मक प्रभाव पडतो. आर्थिक स्थिती मजबूत होते. जर व्यापारात यशस्वी व्हायचे असेल तर व्यापार वृद्धि यंत्राची पूजा करावी.
-उत्तर दिशा महत्त्वाची
वास्तुनुसार धनाची देवता कुबेरचे स्थान उत्तर दिशेला असते. जर घरात उत्तर दिशेला एखादा दोष असेल तर तो व्यक्ती व्यवस्थितीपणे काम करु शकत नाही. तसेच निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा त्यामध्ये कमी होते. अशा स्थितीत आर्थिक अडचणी सुद्धा येतात. त्यामुळे उत्तर दिशा दोषमुक्त करा. उत्तर दिशेच्या भींतीला हिरवा रंग लावू शकता. कारण बुधाचा रंग हा हिरवा असतो.
-घरात लावा असे फोटो
वास्तु शास्रानुसार, जर तुम्ही एखादा फूड संदर्भात बिझनेस करत असाल तर घरातील बेडरुममध्ये गायीची मुर्ती ठेवा. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स संबंधित काम करत असाल तर खोलीत ख्रिसमसचे झाड ठेवा. तसेच तुम्ही औषधांसंबंधित व्यवसाय करत असाल तर खोलीत सुर्य नारायणाचा फोटो लावा.
-ऑफिसमध्ये ठेवा कासव
ऑफिसमध्ये धातुने तयार केलेल्या कासवाची मुर्ती ठेवणे फायदेशीर मानले जाते. यामुळे धन वृद्धि होते आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
-मुख्य प्रवेशद्वार
ऑफिसचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला याला उत्तम मानले जाते. उत्तर-पश्चिम किंवा उत्तर-पूर्व दिशेला सुद्धा मुख्य प्रवेशद्वार असणे योग्य मानले जाते. मुख्य द्वाराच्या समोर कोणताही अडथळा नसावा. यामुळे कामात सुद्धा अडथळे निर्माण होतात. (Vastu tips for business)
-बॉसची खोली
ऑफिसमध्ये बॉसची खोली ही दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. तसेच बसताना तोंड हे उत्तरेला असावे. जेथे बसणार त्याच्यामागे एक भींत असावी. मात्र काचेची भींत किंवा खिडकी नसावी.
हेही वाचा- घरात Fish Aquarium ठेवल्याने खरंच सुख-समृद्धी वाढते का?
वास्तु शस्राच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, दुकानात किंवा फॅक्ट्रित सफेद किंवा क्रिम रंगाचा वापर करा. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होत राहते. तसेच व्यवसाय वृद्धिसाठी आपल्या टेबलवर श्रीयंत्र, व्यापार वृद्धि यंत्र, क्रिस्टलचा कासव, हत्ती ठेवा. हे शुभतेचे प्रतीक मानले जाते.