आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींकडून आपण अनेकदा ऐकल असेल की दुसऱ्यांच्या गोष्टी कधी वापरु नयेत. मात्र अनेकांना दुसऱ्यांच्या गोष्टी वापरायची जणू सवयच लागलेली असते.बरेच जण आपल्या मित्रपरिवाराकडून कपडे, शूज, इतर वैयक्तिक गोष्टी घेऊन काही काळासाठी वापरतात.पण तुम्हाला माहीत आहे का असे करणे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा घेऊन येते. हो, वास्तुशास्त्रानुसार आपण अशा गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. अशाने आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांना देतो आणि स्वत:साठी त्रास घेतो. काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. काही ठराविक वस्तू तर अशा आहेत ज्या तुमची चुकूनही दुसऱ्यांना देने आणि दुसऱ्यांच्या घेणे पूर्णपणे टाळायला हव्यात. त्या वस्तू कोणत्या हेच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. (Vastu Tips)
– कपडे:
एकमेकांचे कपडे हल्ली सर्रास वापरले जातात पण तसे करणे आपल्यासाठी योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचे कपडे कधीही घेऊन घालू नये अशाने आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टींचा वास सुरु होतो आणि आयुष्यात अनेक अडचणी येण्यास सुरुवात होते.
– रुमाल :
मोठे लोक उगाचच म्हणत नाहीत की इतरांचा रुमाल वापरायला घेऊ नका त्या मागे तसेच तार्किक आणि वैज्ञानिक कारण आहे पहिल कारण हे की, दुसऱ्याचा रुमाल घाणेरडा असेल तर त्याने बॅक्टेरिया पसरण्याचा धोका असतो आणि दूसरे कारण असे की, दुसऱ्याचा रुमाल वापरण्याने ती व्यक्ती आणि तुमच्यात वाद होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी ही वाढू शकतात. त्यामुळे यापुढे दुसऱ्याचा रुमाल वापरू नका आणि आपला कोणाला देऊ ही नका.
– घड्याळ:
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींनी जोडले गेलेले असते. अस म्हटलं जाते की एखाद्याचे घड्याळ वापरण्यास घेतले की त्या व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाईट वेळ आणायची नसेल तर चुकूनही दुसऱ्याचे घड्याळ वापरू नका.
– अंगठी:
वास्तु शास्त्रानुसार दुसऱ्याची अंगठी कधीही आपल्या बोटात घालू नये हे अशुभ समजले जाते आणि यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही तसेच तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींची वाढ होते.
– पेन:
कोणत्याही व्यक्तीचा पेन घेऊ नये आणि काही वेळेसाठी घेतलाच तर तो त्यांना परत देण्यास विसरु नये. कारण दुसऱ्यांचा पेन घेणे हे केवळ तुमच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच अशुभ मानले जात नाही तर त्यामुळे आर्थिक अडचणी सुद्धा सुरु होतात. (Vastu Tips)
=====================
( हे देखील वाचा : कर्जातून सुटका हवी आहे? तर मग फॉलो करा ‘या’ टिप्स)
====================
– बिछाना किंवा गादी :
कोणा दुसऱ्याचा बिछाना किंवा गादी वापरण्यासाठी घेणे ही वास्तुशास्त्रा अशुभ मानला गेलेली गोष्ट आहे. अशाने जो व्यक्ती त्यावर झोपतो त्याला आरोग्याशी संबंधित अडचणी सुरु होतात. (Vastu Tips)
(Declaimer: वरील माहिती खरीअसल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही.वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.)