Home » Wealth : लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी ‘हे’ उपाय करून बघा

Wealth : लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्यासाठी ‘हे’ उपाय करून बघा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Wealth
Share

या जगात प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी जंग जंग पछाडत असते. आपल्या, आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वच लोकं अपार मेहनत घेत असतात. आजच्या काळात तर पैसाच सर्वस्व बनले आहे. सर्वच हौसमौस करण्यासाठी पैसा गरजेचा असतो. मात्र असे असले तरी आपल्याला जाणवते की, आपण कितीही मेहनत घेतली कितीही पैसा कमावला तरी तो अजिबातच टिकत नाही. पगार झाला की, लगेच पुढच्या काही दिवसातच तो संपून जातो. बचत देखील होत नाही. अशा वेळेस काय करावे हेच समजत नाही. आज आम्ही तुम्हाला घरात पैसा टिकावा यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. (Vastu Tips)

लक्ष्मी मातेला धनाची देवी म्हटलं जातं. ज्या व्यक्तीवर किंवा कुटुंबावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही, त्यामुळे जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल आणि तुम्हाला पैशांसंबंधी काही अडचणी जाणवत असतील तर घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, दररोज सकाळी लक्ष्मी मातेची पूजा करून, फोटोला एक कमळाचं फूल अर्पण करा, घरातील सर्व वास्तूदोष दूर होतील. उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पैशांच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतात. (Marathi)

तुमची पैशाची जी तिजोरी आहे, त्यामध्ये नेहमी एक लक्ष्मी मातेचा फोटो असलेलं चांदीचं नाणं किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा. तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही, तुमची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहील. सोबतच घर नेहमी स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ असल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, असं वास्तुशास्त्र सांगण्यात आलं आहे. घरात पैसा टिकावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने हिरव्या रंगाचे पाकीट ठेवावे आणि त्यात थोडे पैसे नक्कीच ठेवावे. पाकीट रिकामे कधीच ठेवू नका. आर्थिक लाभ होण्यासाठी रविवार वगळता दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. असे केल्याने पैशांचा ओघ वाढतो अशी मान्यता आहे. (Todays Marathi HEadline)

वास्तूशास्त्रात, पैसा हातात ठेवण्यासाठी व्यक्तीने लिहिण्यासाठी हिरव्या रंगाच्या पेनचा वापर करावा. जे काही लेखन काम करत असाल ते फक्त हिरव्या रंगाच्या पेनने करा. आर्थिक फायद्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात मिठाचे दोन डबे ठेवायला हवेत. त्यातील एक डब्बा हा नेहमी पूर्णपणे भरलेला असावे. आठवड्यातून एक किंवा दोनवेळा आहारात दही आणि भात खा. असे केल्याने घरात लक्ष्मीचा सहवास राहतो अशी मान्यता आहे. आर्थिक लाभ आणि समृद्धीसाठी तसेच संपत्तीच्या स्थिरतेसाठी दररोज स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे. तसेच आदल्या दिवशी घातलेले कपडे पुन्हा न धुता घालू नयेत. (Top Marathi News)

Wealth

घरातील नकरात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणून सैंधव मिठाकडे पाहिलं जातं. दररोज थोडं सैंधव मीठ अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्यानं अंघोळ केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून तुमचं संरक्षण होतं. आर्थिक समस्या दूर होतात. तेजपत्ता ही केवळ एक मसाल्याची वस्तूच नाहीये तर वास्तुशास्त्रामध्ये देखील त्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अंघोळीच्या पाण्यात थोडासा तेज पत्ता टाकून त्या पाण्यानं अंघोळ केल्यास सर्व निगेटिव्हीटी दूर होते. तसेच त्यामुळे घरात आर्थिक बरकत येते असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. (Latest Marathi Headline)

जर घरात कुबेर यंत्र असेल तर तुमच्या घरात पैशांची बरकत टिकून राहील. ती कधीच कमी होणार नाही. तुम्ही घरात पाच पांढऱ्या रंगाच्या कवड्या घराच्या तिजोरीत ठेवल्या तर तुमच्या घरात पैशांची बरकत राहील. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा संपत्ती आणि समृद्धीचा घटक मानली जाते. या दिशेचा स्वामी कुबेर देवता आहे, जो संपत्ती आणि समृद्धीचा देव मानला जातो. जर तुम्ही तुमची तिजोरी किंवा पैसा उत्तर दिशेला ठेवला, तर आर्थिक वाढ होण्याची शक्यता असते आणि पैसा टिकून राहतो. वास्तुशास्त्रानुसार, तिजोरी अशा प्रकारे ठेवावी की तिचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल. यामुळे पैसा जास्त काळ टिकतो. (Top Trending News)

पूर्व दिशा सूर्यदेवाची जागा मानली जाते, जो ज्ञान आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. या दिशेला पैसा ठेवल्याने नवीन संधी आणि आर्थिक प्रगती होते. पैशाशी संबंधित कागदपत्रे, गुंतवणूक, बँकेची चेकबुक पूर्व दिशेला ठेवावीत. या दिशेला या सर्व गोष्टी ठेवल्यास समृद्धी आणि यश मिळते. ही दिशा विशेषतः व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरते. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात घाण असते तिथे देवी लक्ष्मी कधीही राहत नाही. देवी लक्ष्मीला घाण अजिबात आवडत नाही, ती नेहमीच स्वच्छ ठिकाणी राहते. म्हणून, देवी लक्ष्मीला अशा ठिकाणी राहणे अशक्य आहे जिथे कोणी अस्वच्छतेत राहतो आणि त्याचा परिसरही अस्वच्छ ठेवतो. यासोबतच, वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आणि प्रार्थना कक्षाची स्वच्छता देखील महत्त्वाची मानली जाते. (Top Stories)

=========

Vastu Tips : घ्ररात वास्तुदोष असल्यास नक्कीच करून बघा ‘हे’ सोपे फायदेशीर उपाय

=========

जो आपल्या घराच्या स्वयंपाकघरात आणि प्रार्थना कक्षात स्वच्छता आणि शुद्धता पाळत नाही त्याला वास्तुदोषाच्या श्रेणीत ठेवले जाते. अशा घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. जे लोक घरात झाडूचा आदर करत नाहीत, ते इकडे तिकडे फेकतात आणि झाडूजवळ कचराही गोळा करतात, ते देखील माता लक्ष्मीला आवडत नाहीत. झाडूला घरात योग्य जागा द्या आणि पायांनी लाथ मारू नका, तर लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर स्वच्छता आणि शुद्धतेला चिकटून राहा आणि या वास्तुदोषांपासून मुक्त व्हा. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, नियमितपणे पूजा करणे, साफ-सफाई करणे, दानधर्म करणे, आणि काही खास उपाय करणे, तसेच लक्ष्मीला आवडत्या गोष्टी अर्पण करणे महत्त्वाचे आहे. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.