Home » घरातील वास्तुदोष ‘या’ उपायांनी करा दूर

घरातील वास्तुदोष ‘या’ उपायांनी करा दूर

घरातील वास्तुदोष दूर करणे अत्यंत गरजेचे असते. घरात वास्तूदोष असेल तर काही ना काही समस्या नेहमीच येत राहतात. आपली कामे पूर्ण होत नाहीत.

by Team Gajawaja
0 comment
Vastu Dosh Remedies
Share

घरातील वास्तुदोष दूर करणे अत्यंत गरजेचे असते. घरात वास्तूदोष असेल तर काही ना काही समस्या नेहमीच येत राहतात. आपली कामे पूर्ण होत नाहीत. हेल्थ संबंधित समस्या असो किंवा आर्थिक नुकसान. घरात सतत वाद होणे हे सुद्धा वास्तुदोषाचे एक कारण आहे. (Vastu Dosh Remedies)

प्रत्येक घर हे वास्तुशास्रानुसार तयार केलेले असेल असे नाही. मात्र तुम्ही त्यामधील वास्तुदोष हे दूर करू शकता. जर तुम्हाला कोणतीही तोडफोड न करता घताली वास्तुदोष दूर करायचे असतील तर पुढील काही टीप्स तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात.

आपले शरीर हे पंचतत्त्वांनी तयार झालेले आहे. जसे की, जल, अग्नि, वायू, पृथ्वी आणि आकाश. या प्रत्येकाची घरात एक दिशा असते. या दिशा वास्तुदोष मुक्त असाव्यात. जेणेकरुन घरात नेहमीच हेल्दी वातावरण राहण्यासह तुम्ही ही आनंदित राहता.

ईशान्य दिशेला वास्तूदोष असेल तर…
जर तुमच्या ईशान्य दिशेला वास्तूदोष असेल तर हा एक मोठा वास्तुदोष आहे. या दिशेला अॅक्टिव्ह करणे गरजेचे असते. या ठिकाणी बेडरुम किंवा किचन अथवा कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर दोषमुक्त होण्यासाठी तेथे स्वच्छता करावी. म्हणजेच घरातील उत्तर पूर्व कोपरा दोषमुक्त असणे गरजेचे आहे. या ठिकाणी उगवत्या सुर्याच्या किंवा उडत्या पक्षाच्या फोटो लावा. अथवा या ठिकाणी बाल्कनी असेल तर तुळशीचे झाड लावा. जेणेकरून सकारात्मक उर्जा येईल.

आग्नेय दिशा
जर तुमचे किचन आग्नेय दिशेला नसेल तर आग्नेय दिशेच्या भितींवर गणपतीची मूर्ती लावा. घरातील आग्नेय दिशेला एक लाल बल्ब जरुर लावा आणि तो सकाळ संध्याकाळ चालूच ठेवा. आग्नेय दिशेला मनी प्लांट लावा. जर किचन आग्नेय दिशेऐवजी दुसऱ्या ठिकाणी असेल तर किचनच्या आग्नेय कोपऱ्याच्या येथे पाण्यासंबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नका. येथे माइक्रोवेव ठेवू शकता आणि एक बल्ब सुद्धा लावा. असे केल्याने किचन आणि आग्नेय कोपऱ्यातील दोष दूर होऊ शकतो.

प्रवेशद्वाराचा येथे दोष असेल
घरातील प्रवेश द्वाराचा दोष असेल तर तो दूर करावा. प्रवेशद्वार अस्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी कधीच घरात येणार नाही. त्यामुळे तो नेहमीच स्वच्छ असावा. प्रवेशद्वारावर तोरण असावे. त्याचसोबत ओम अथवा स्वस्तिक काढाा. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा येणार नाही. दक्षिणमुखी प्रवेश द्वार असेल तर तेथे पंचमुखी हनुमानाचा फोटो लावा. (Vastu Dosh Remedies)

हेही वाचा- वास्तुशास्रानुसार तुमचे किचन ‘या’ दिशेला असणे मानले जाते शुभ

घरातील पूजा
घरात वास्तुदोष कसा ही असेल तरही ज्या घरात सकाळ-संध्याकाळ पूजा होते, धूप बत्ती आणि संध्या आरती होते तेथे नकारात्मता वास करत नाही.

अशा प्रकारे तुम्ही वास्तुच्या या उपायांनी घरातील वास्तुदोष दूर करू शकता. जेणेकरुन तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.