आयपीएल प्रमुख असताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली भारत सरकार ललित मोदीचा शोध घेत आहे. हा ललित मोदी 2010 मध्ये भारत सोडून लंडनमध्ये राहत आहे. फरार असलेल्या ललित मोदीने भारताच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी वानुआतु नावाच्या देशाचे नागरिकत्व मिळवले. अर्थात याबाबत भारतीय परराष्ट्रखात्यानं तत्पर कारवाई केल्यामुळे वानुआतु देशानं हे नागरिकत्व रद्द केलं आहे. स्वतः वानुआतु देशाचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ही माहिती दिली. सोबतच आपल्या देशातील गोल्डन पासपोर्ट कार्यक्रम गुन्हेगारांसाठी पळून जाण्याचे साधन बनू दिला जाणार नाही, असेही स्पष्ट केले. ललित मोदीला जेव्हा नागरिकत्व दिले, तेव्हा त्यानं भारतात केलेल्या गैरव्यवहाराची माहिती नव्हती, असेही स्पष्टीकरण वानुआतु देशातर्फे देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणानंतर हा वानुआतु देश नेमका कुठे आहे, याचा शोध सुरु झाला आहे. पैसे घेऊन आपले नागरिकत्व बहाल करणारा वानुआतु देश हा जगभरातील देशांच्या पासपोर्टच्या क्रमावारीतही भारतापेक्षा पुढे आहे. भारतातील एखाद्या राज्यापेक्षा लहान असलेल्या या देशानं जगभरातील श्रीमंतांना नागरिकत्व दिले आहे. (Vanuatu)
वानुआतू हा देश ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस आणि न्यूझीलंडच्या उत्तरेस म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि फिजीच्या दरम्यान आहे. या देशाची राजधानी पोर्ट विला असून ती इफेट बेटावर आहे. वानुआटु हा देश दक्षिण प्रशांत महासागरात असलेल्या बेटांचा देश आहे. हा एक 83 बेटांचा समूह असून त्यावरील फक्त 65 बेटांवर लोकवस्ती आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा ही बिस्लामा असली तरी या देशात इंग्रजी आणि फ्रेंच भाषा सर्वाधिक बोलल्या जातात. येथील शाळांमध्येही याच भाषेतून शिक्षण देण्यात येते. वानुआटु देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं पर्यटन आणि नागरिकत्वावर आधारित आहे. या देशात शेती आणि मासेमारी हे दोन व्यवसायही मोठ्या प्रमाणात होतात. मात्र देशाची आर्थिक घडी ही या देशाचे नागरिकत्व विकत घेणा-या श्रीमंतांवर अवलंबून आहे. वानुआटु देशात नागरिकत्व-गुंतवणूक कार्यक्रम आहे. यात परदेशी लोक सुमारे 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स देऊन या देशाचे नागरिकत्व विकत घेतात. (International News)
1980 मध्ये हे देश फ्रान्स आणि ब्रिटनपासून स्वातंत्र्य झाला. तीन लाख लोकसंख्या असलेल्या या देशानं तेव्हापासून गोल्डन व्हिसा कार्यक्रम स्विकारला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली. या नागरिकत्वाच्या बदल्यात या देशाला 30 टक्के उत्पन्न मिळते. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांमध्ये भारत 80 व्या क्रमांकावर आहे. तर वानुआतु या यादीत 51व्या क्रमांकावर आहे हे विशेष. शिवाय वानुआतु च्या पासपोर्टमुळे जगभरातील 113 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशही मिळतो. वानुआतु देश हा निसर्गानं संपन्न देश आहे. यामध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी असून त्यात पाण्याखाली असलेल्या ज्वालामुखीचाही समावेश आहे.वानुआतु चा पूर्वइतिहास अस्पष्ट आहे. ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलणारे लोक या बेटावर सुमारे 4000 हजार वर्षापूर्वी आल्याची माहिती दिली जाते. येथील काही भागात 1300 ईसापूर्व काळातील मातीच्या भांड्याचे तुकडेही मिळाले आहेत. मात्र 1606 मध्ये युरोपीय लोकांनी वानुआतु द्वीपसमूह शोधून काढल्याचे सांगण्यात येते. (Vanuatu)
1774 मध्ये कॅप्टन कुकने या बेटांना न्यू हेब्रीड्स असे नाव दिले होते. हा देश स्वतंत्र होईपर्यंत याच नावानं ओळखण्यात येत होता. त्यानंतर त्याला वानुआतु नाव मिळाले. या बेटांवर 1825 साली चंदनाच्या झाडांची सर्वात मोठी संख्या असल्याचा शोध लागला. तेव्हापासून या बेटांचे महत्त्व वाढले. अनेक स्थलांतरित येथे या चंदनाच्या लाकडाच्या व्यापारासाठी आले. काही काळानं ते याच बेटांवर स्थाईक झाले. 1860 नंतर या बेटावर ऑस्ट्रेलिया, फिजी, स्पेन येथील मजूर मोठ्याप्रमाणात आले. शिवाय दुस-या महायुद्धानंतर अमेरिकन नागरिकही या बेटावर आले. याच सर्वांनी या देशाच्या उभारणीसाठी हातभार लावला. वास्तविक वानुआतुचे क्षेत्रफळ अंदाजे 12,274 चौरस किलोमीटर आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !
===============
मात्र त्यापैकी जमिनीचे क्षेत्रफळ फक्त 4700 चौरस मैल आहे. या बेटावर गोड्या पाण्याचा अभाव आहे. शेतीसाठी यातील फक्त 9 टक्के जमिन वापरली जाते. तरीही या देशात वनसंपदा भरपूर आहे. विशेषतः वानुआतु बेटांवरील मुंग्याच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक बेटावर येतात. समुद्रानं घेरलेल्या या बेटांवर समुद्री गोगलगाईच्या 4000 हून अधिक प्रजाती आहेत. अलिकडच्या काळात या देशातील गायकांनाही जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. अनेक मान्यवर लेखक या वानुआतु देशात येऊन आपल्या कथा, कादंब यांचे लिखाण करतात. मुख्यतः शांतताप्रिय असलेल्या वातुआतुमध्ये ललित मोदी यांनी मोठे वादळ निर्माण केले होते. मात्र त्यांचे नागरिकत्व रद्द करत वातुआतुनं एक उत्तम उदाहण जगापुढे ठेवले आहे. (Vanuatu)
सई बने…