Home » Michael Rockefeller : आदिवासींनी खरंच त्याला खाऊन टाकलं होतं ?

Michael Rockefeller : आदिवासींनी खरंच त्याला खाऊन टाकलं होतं ?

by Team Gajawaja
0 comment
Michael Clarke Rockefeller
Share

१७ नोव्हेंबर १९६१ ला एक यंग अमेरिकन मुलगा ज्याचं नाव होतं, मायकल क्लार्क रॉकफेलर, जो Adventure साठी न्यू गिनीमध्ये गेला आणि गायब झाला. तो कुठे गायब झाला, कोणाला काहीच कळायचा मार्ग नव्हता. असं म्हणतात, त्याची बोट एका बेटाजवळ बुडाली आणि मायकल कायमचा गायब झाला. हा त्याचा शेवटचा फोटो होता. जो आदिवासी जमातींसोबत दिसतोय. जिथे तो शेवटचा जिवंत दिसला. (Michael Clarke Rockefeller)

त्यानंतर बराच काळ तो सापडला नाही. लोकांना वाटलं, तो पाण्यात बुडून मेला आणि त्याचं शरीर कधीच सापडलं नाही. पण काही वर्षांनी एक धक्कादायक गोष्ट समोर आली की, मायकल जिवंत होता. काही काळाने तिथल्या आदिवासी जमातीने त्याला खाऊन टाकलं आणि त्यांच्याकडे मायकलची फक्त हाडं उरली होती. पण हे सत्य होतं का? आणि सत्य असेल तर ते लपवलं गेलं होतं का? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरंच असं घडलं का? नक्की हे मायकल क्लार्क रॉकफेलरचं काय प्रकरण आहे? जाणून घेऊ. (Top Stories)

मायकल क्लार्क रॉकफेलरचा जन्म एक श्रीमंत घरात झाला. हा न्यूयॉर्कचा गव्हर्नर आणि अमेरिकेचा भावी उपाध्यक्ष, नेल्सन रॉकफेलरचा मुलगा होता. मायकल श्रीमंत असूनसुद्धा अत्यंत हुशार होता. १९६१ मध्ये मायकल न्यू गिनीला निघाला, जिथे अस्मत नावाची एक आदिवासी जमात राहायची, जी पाश्चिमात्य जगासाठी जवळपास अज्ञात होती. त्याला आपल्या वडिलांच्या म्युझियम ऑफ प्रिमिटिव्ह आर्टसाठी न्यू गिनीमधल्या अस्मत जमातीच्या कलाकृती गोळा करायच्या होत्या. या आदिवासींना पहिलं तर असं वाटेल की, ते स्टोन एजमधले आदिवासी आहेत. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. त्यांचं आयुष्य मायकलच्या आयुष्यापेक्षा एकदम ऑपोजिट होतं. (Michael Clarke Rockefeller)

Michael Clarke Rockefeller

मायकेलने १९६१ मध्ये दोनदा न्यू गिनीला भेट दिली. पहिली भेट मार्च ते ऑगस्ट आणि दुसरी भेट ऑक्टोबर १९६१ मध्ये घेतली. पहिल्या भेटीत सहा महिने तो अस्मत लोकांमध्ये राहिला. तिथे त्याने त्यांच्या लाइफस्टाईलचा अभ्यास केला आणि त्यांच्या काही कलाकृती आपल्या वडिलांच्या म्युझियमसाठी गोळा केल्या. आजही ते न्यूयॉर्कच्या मेट म्युझियममधल्या मायकेल सी. रॉकफेलर विंगमध्ये त्याच्या गोळा केलेल्या कलाकृती पाहायला मिळतात.(Top Stories)

पण ही गोष्ट इथे संपत नाही. दुसऱ्यांदा मायकल जेव्हा तिथे गेला तेव्हा एका मानववंशशास्त्रज्ञ रेने वासिंग आणि दोन स्थानिक गाइड्स, सायमन आणि लियो, यांच्यासोबत प्रवास करत होता. त्यांची बोट किनाऱ्यापासून जवळपास तीन मैलांवर होती. तेव्हा एक मोठी लाट आली आणि त्यांची बोट उलटली. बोटीवर कोणतंच कम्युनिकेशन इक्विपमेंट नव्हतं. सायमन आणि लियो यांनी मदत मागायला किनाऱ्याकडे पोहायचं ठरवलं आणि मायकल आणि रेने बोटीला धरून राहिले. सुरुवातीला त्यांना फार काळजी वाटली नाही, पण बोट किनाऱ्यापासून लांब-लांब जात होती. (Michael Clarke Rockefeller)

२४ तास गेले आणि मदत येण्याचं नाव नाही. मायकलचे पेशन्स संपले आणि त्याला वाटलं की ते गाईड्स त्यांना सोडून पळाले. शेवटी मायकलने दोन रिकाम्या जेरी कॅन्स आपल्या कमरेला बांधून किनाऱ्याकडे पोहायचं ठरवलं आणि त्याने रेनेला सांगितलं, “I think I can make it.” रेने बोटीला धरून राहिला. सायमन आणि लियो या गाइड्सनी किनाऱ्यापर्यंत पोहून मदत मागितली आणि रेनेला तब्बल २२ तासांनंतर वाचवण्यात आलं. पण आता प्रश्न असा की मायकलचं काय झालं? तर मायकल गायब झाला होता.(Top Stories)

मायकलच्या गायब होण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आणि रॉकफेलर फॅमिलीने त्यांचं राजकीय आणि आर्थिक सामर्थ्य वापरून साउथ पॅसिफिकच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं. हजारो स्थानिक, अनेक बोटी, हेलिकॉप्टर्स आणि स्पॉटर प्लेन्स यांचा समावेश होता. १० दिवस झाले तरी काहीच सापडलं नाही आणि १९६४ मध्ये मायकलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं घोषित केलं. पण तरीही तो खरंच मेला आहे का? अशा शंका होत्याच कारण मायकलचं शरीर सापडलं नाही. (Michael Clarke Rockefeller)

Michael Clarke Rockefeller

१९६८ मध्ये मिल्ट मॅक्लिन नावाचा एक पत्रकार, जो आर्गोसी मॅगझिनचा एडिटर होता. त्याने न्यू गिनीला प्रवास केला. हळूहळू मिल्टने मायकलच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं आणि जे त्याला कळलं ते त्याला धक्का देणारं होतं. १९५७ मध्ये, मायकल न्यू गिनीला येण्याच्या चार वर्षांआधी, अस्मतच्या दोन गावांमध्ये युद्ध झालं होतं, ज्यात एकाच दिवसात १०० हून जास्त लोक मारले गेले. डच वसाहतवाल्यांना हे सहन झालं नाही. म्हणून त्यांनी एक सशस्त्र पथक पाठवलं आणि शेवटी ओत्सजानेप गावातले पाच अस्मत योद्धे डचांच्या गोळ्यांनी मारले गेले.

अस्मत संस्कृतीत “An eye for an eye” ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. जर एखाद्या शत्रू गावाने गावातला एक माणूस मारला, तर त्यांच्या गावातला एक माणूस मारावा लागायचा. हा त्यांच्या आध्यात्मिक विश्वासाचा भाग होता. म्हणून ओत्सजानेपच्या त्या पाच मृत योद्ध्यांचा बदला घेणं गरजेचं होतं, जेणेकरून जगातला बॅलन्स राखला जाईल. पण डचांविरुद्ध बदला घेणं अशक्य होतं, कारण त्यांच्याकडे बंदुका होत्या. पण जेव्हा मायकल रॉकफेलर एकटा आणि असुरक्षित, त्यांच्या नदीत तरंगत आला, तेव्हा त्यांना त्यांच्या मृत योद्ध्यांचा बदला घेण्याची संधी दिसली. मिल्ट मॅक्लिन १९६९ मध्ये चार महिन्यांनंतर अमेरिकेला परतला. त्याला खात्री झाली होती की, मायकल रॉकफेलरला अस्मत लोकांनी मारलं आणि खाल्लं. त्याने आपलं ऑबजरवेशन द सर्च फॉर मायकेल रॉकफेलर नावाच्या पुस्तकात लिहिलं. (Michael Clarke Rockefeller)

पण २०१४ मध्ये, लेखक कार्ल हॉफमन याने मायकलच्या गायब होण्याचा तपास पुन्हा सुरू केला. मिल्टसारखा कार्ल न्यू गिनीला गेला, पण त्याने द हेगमधल्या डच कॉलोनियल आर्काइव्ह्जमध्येही तपास केला. तिथे त्याला बरीच कागदपत्रं सापडली, ज्यात डच अधिकाऱ्यांना आणि मिशनरींना शंका होती की मायकलला ओत्सजानेपच्या हेडहंटर्सनी मारलं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट? डचांनी हे सत्य जाणीवपूर्वक लपवलं होतं. पण का? कारण मायकल गायब झाला तेव्हा न्यू गिनीचं डच नियंत्रण संपत होतं आणि ते इंडोनेशियाकडे जात होतं. डचांना जगाला दाखवायचं होतं की त्यांनी स्थानिकांना किती civilised केलंय. जर त्यांनी सांगितलं असतं की अस्मत जमातीने जगातल्या सगळ्यात प्रभावशाली फॅमिलीच्या मुलाला खाल्लं, तर त्यांचं नाव खराब झालं असतं. म्हणून त्यांनी ही माहिती दाबून टाकली.(Top Stories)

एक अफवा अशी पसरली की १९७० च्या दशकात रॉकफेलर फॅमिलीने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला अस्मत जमातीत पाठवलं. त्या डिटेक्टिव्हने कथितपणे एक बोटीचं इंजिन देऊन तीन मानवी खोपड्या घेतल्या, ज्या अस्मत यांनी मारलेल्या एकमेव गोऱ्या माणसांच्या होत्या. त्यात मायकेलची खोपडी होती का, हे कोणालाच माहीत नाही. पण त्या डिटेक्टिव्हला त्या खोपड्या अमेरिकेत आणण्यासाठी २.५ लाख डॉलर्स मिळाले. (Michael Clarke Rockefeller)

=================

हे देखील वाचा : Blood : ‘गोल्डन ब्लड’ आहे जगातील सर्वात महागडा रक्तगट, जगात केवळ ४५ लोकांकडे आहे हे ब्लड

=================

पण सर्च ऑपरेशमध्ये एक ट्विस्ट आला होता. मिल्ट मॅक्लिन १९६० च्या दशकात न्यू गिनीमधून परत आला तेव्हा त्याच्याकडे चार पाच तासांचं फुटेज होतं. हे फुटेज २००८ पर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं, जोपर्यंत चार्लटन हेस्टनचा मुलगा फ्रेझर याने ते शोधलं नाही. तो मिल्टच्या ट्रिपवर एक डॉक्युमेंट्री बनवत होता. या फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसली – अस्मत यांच्या डझनभर कॅनोज नदीतून धावत होत्या आणि त्यांच्यामध्ये एक नग्न गोरा माणूस होता, जो जमातीतलाच एक वाटत होता. पण या फूटेजमधला गोरा माणूस मायकल असण्याची शक्यता कमी आहे, कारण तो कोणीतरी पर्यटक असू शकतो कारण फुटेज अस्पष्ट होतं, त्यामुळे निश्चित सांगता येत नाही. (Michael Clarke Rockefeller)

मायकलच्या मृत्यूचं रहस्य रहस्यच राहिलंय. इतके सर्च ऑपरेशन होऊनही बरेच तर्क तर मांडले गेले पण कोणताच ठोस पुरावा सापडला नाही. मायकलला अस्मत आदिवासींंनी खाल्लं की तो अजून जिवंत आहे आणि त्या जमातीसोबत अजूनही राहतोय. हा अजूनही प्रश्नच आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॅमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.