फेब्रुवारी महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते व्हॅलेंटाइन डे (Valentine Week) चे. सर्व तरुण तरुणींसाठी आणि प्रेम करणाऱ्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूपच महत्वाचा आहे. प्रेमाचा महिना अशी ओळख असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. यादिवशी सर्व प्रेमी युगल एकमेकांप्रती आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. मात्र जरी १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे साजरा होत असला तरी त्याच्या ७ दिवस आधीपासूनच या व्हॅलेंटाइन डे आठवड्याची सुरुवात होते. (Valentine Week)
७ फेब्रुवारीपासून १३ फेब्रुवारीपर्यंत विविध खास डेज साजरे केले जातात आणि त्यानंतर १४ ला व्हॅलेंटाइन डे साजरा होतो. या व्हॅलेंटाइन आठवड्याची सुरुवात रोज डे (Rose Day) पासून होते/ ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र रोज डे साजरा होतो. या दिवशी एकमेकांना विविध रंगाची गुलाबाची फुलं दिली जातात आणि आपल्या भावना समोरच्याला सांगितल्या जातात. मात्र हा रोज डे का साजरा केला जातो? यामागे नक्की काय इतिहास आहे? हे तुम्हाला माहित आहे का? नाही…? चला मग जाणून घेऊया रोज डेची संपूर्ण माहिती. (Top Stories)
लाल रंगाचे गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. (Symbol Of Love) हे फुलं देऊन प्रेम व्यक्त केले जाते. मात्र प्रत्येक रंगाच्या गुलाबाच्या फुलांना एक खास अर्थ देखील देण्यात आला आहे. जसे लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, तसे पिवळा गुलाब मैत्रीचे, पांढरा गुलाब शांततेचे, गुलाबी गुलाब हे कौतुकाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी तुम्ही थेट लाल गुलाब न देत वेगळ्या रंगाचे गुलाब देऊन देखील तुमच्या प्रेम कथेची सुरुवात करू शकतात.
प्रेमाचा विषय निघतो तेव्हा गुलाबाचा विचार डोक्यात येणार नाही असे होणार नाही. प्रेम आणि गुलाब हे जणू समीकरणच झाले आहे. प्रेमाचा दुसरा अर्थ लाल गुलाब असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज ७ फेब्रुवारी रोज डे. मात्र तुम्हाला माहित आहे का या रोज डे ची सुरुवात आता नाही तर मुघल काळातुन झाली आहे. आजच्या काळात सर्वात जास्त गाजणाऱ्या या रोज डे ची सुरुवात आज नाही तर मुघल काळातून झाली आहे. म्हणजे मुघलांच्या काळापासून पासून रोज डे साजरा केला जातो. (Latest Marathi News)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
===============
या रोज डेबद्दल सांगितले जाते की, मुघल बेगम असलेल्या नूरजहां यांना लाल रंगाची गुलाबाची फुलं खूप आवडायची. त्यांची हि आवड लक्षात ठेऊन त्यांचे पती जहांगीर बेगम साहेबांना खुश करण्यासाठी रोज एक दोन नव्हे तर तब्बल एक टन गुलाबाची फुले त्यांना पाठवायचे. ही फुले पाहून नूरजहाँ खूप जास्त खुश व्हायच्या. यानंतर राणी व्हिक्टोरियाच्या काळात लोकांनी एकमेकांना खुश करण्यासाठी गुलाबाची फुले देण्यास सुरुवात केली होती. पुढे हीच पद्धत प्रेमी युगलांमध्ये खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली. म्हणूच प्रेमी युगलं आजही त्यांचे प्रेम व्यक्त करताना गुलाबाच्या फुलाची मदत घेतात.
याबद्दल अजून एक आख्यायिका आहे. ती म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या काळात अनेक लोकं प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर करायचे. ही पद्धत आजही कायम चालू आहे आणि म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी रोज डे साजरा केला जातो. याची एक रोमन पौराणिक कथा देखील सांगितली जाते. गुलाबाचा संबंध प्रेमाची देवी शुक्राशी संबंधित आहे. या देवीला पवित्र मानले जात होते. आशिया आणि अरब जगतासारख्या अनेक संस्कृतींमध्ये प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब आजही जोपासला जात आहे.