Home » Valentine Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? ज्यांच्या स्मरणार्थ साजरा होतो हा प्रेमदिन

Valentine Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? ज्यांच्या स्मरणार्थ साजरा होतो हा प्रेमदिन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Valentine Day
Share

या जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र भावना म्हणून प्रेमाला ओळखले जाते. प्रत्येकासाठी प्रेम हे नेहमीच खास असते. ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा आणि स्पेशल असतो. याच प्रेमाचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यातल्या १४ तारखेला साजरा होतो प्रेमदिन अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’. सर्वच प्रेम करणाऱ्या जोड्यांसाठी हा दिवस जणू काही उत्सवच असतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. (Valentine Day)

जेव्हा आपल्याला वाटेल तोच दिवस आणि तीच जागा खास समजून प्रेम व्यक्त करता येते. मात्र तरीही आजच्या आधुनिक जगात आपण अनेक महत्वाचे दिवस साजरे करतो मग प्रेमासाठी एखादा खास दिवस का नसावा? म्हणूनच दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. मात्र हा दिवस साजरा का केला जातो? या दिवसाची सुरुवात कशी, कुठे आणि कधी झाली? याची माहिती खूपच कमी लोकांना असेल. आज आपण या लेखातून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. (Marathi)

व्हॅलेंटाईन डे हा भारतीय डे नाही. हा देखील इतर अनेक ‘डे’ सारखा पाश्चात्य संस्कृतीशी जोडला गेलेला डे आहे. व्हॅलेंटाईन नावाचे रोममध्ये खूप मोठे संत होऊन गेले. त्यांच्या नावावर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र एक सर्वात जास्त प्रचलित आणि प्रसिद्ध असलेली कथा आहे. (Todays Marathi HEadline)Valentine Day

साधारणपणे आजपासून १७०० वर्षापूर्वी, तिसऱ्या शतकात रोममध्ये व्हॅलेंटाईन नावाचा एक सेन्ट अर्थात संत होऊन गेला. त्यावेळी रोममध्ये क्लॉडियस दुसरा या राजाचे राज्य होतं. या राजाला जग जिंकण्याची मनिषा होती. त्यामुळे सतत युद्ध करणे हा याचा छंद होता किंवा सवय होती असे आपण म्हणू शकतो. क्लॉडियसला एक लक्षात आले की लग्न न झालेले सैनिक हे लग्न झालेल्या सैनिकांपेक्षा अधिक धाडसी असतात, शूर असतात. त्यावेळी त्यानं एक फर्मान काढलं. आपल्या राज्यात आता लग्न करण्याला, प्रेम करायला बंदी आहे असं त्यात लिहलं होतं. तसंच प्रेम करणाऱ्यांचाही त्याला राग यायचा. (Latest Marathi HEadline)

त्याच राज्यात हा व्हॅलेंटाईन नावाचा संत राहायचा. प्रेम करणाऱ्या तरुणांचे तो गुप्तपणे लग्न लावायचा. याची खबर क्लॉडियसला लागताच त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकले. क्लॉडियलच्या मते, हा भयंकर गुन्हा होता. पुढे तुरुंगात असताना व्हॅलेंटाईनचा जीव तुरुंग अधिकाऱ्याच्या मुलीवर आला, त्यांचे प्रेम जुळले. याची माहिती लागताच खवळलेल्या क्लॉडियसने व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले. व्हॅलेंटाईनला १४ फेब्रुवारी या दिवशी फाशी देण्यात आली. त्यांच्या मृत्यूला आणखी एका खास कारणासाठी लक्षात ठेवले जाते. त्या काळात नगर तुरुंगाधिकारी याकोबस नावाची मुलगी होती, ती आंधळी होती. सेंट व्हॅलेंटाईनने जेलरच्या मुलीला तिच्या मृत्यूच्या वेळी डोळे दान केले. यासोबतच जेकबसच्या नावाने एक पत्रही लिहिलं होतं, ज्यात त्याने ‘युवर व्हॅलेंटाइन’ असे लिहिले होते. (Top Stories)

========

Valentine Day : उद्यापासून सुरु होतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’

========

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने त्याच्या प्रियसीला पत्र लिहिले आणि त्या पत्राचा शेवट ‘युवर व्हॅलेंटाईन’ असा केला होता. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात चर्चच्या एका संताने व्हॅलेंटाइनने प्रेमासाठी दिलेल्या बलिदानाची दखल घेतली आणि त्याच्या फाशीचा दिवस व्हॅलेंटाईन डे च्या स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो असं सांगण्यात येते. मध्ययुगीन काळात, १४ फेब्रुवारी हा युरोपमधील प्रेमींसाठी खास दिवस बनला. यानंतर, हा दिवस १८ व्या आणि १९ व्या शतकात अधिक लोकप्रिय झाला. लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तर गुलाबाचे फूल आणि चॉकलेट हे व्हॅलेंटाईन डेचे मुख्य प्रतीक मानले जाते. लोक या दिवशी या गोष्टींची देवाणघेवाण करतात, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.