आज संपूर्ण जगामध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. मागील काही वर्षांपासून फेब्रुवारी महिना म्हणजे व्हॅलेंटाइन डे असे समीकरणच झाले आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रेम करणारे लोकं आपले प्रेम व्यक्त करतात. तसेच आपल्या जोडीदाराला विविध प्रकारचे गिफ्ट देखील देतात. हा संपूर्ण दिवस आपल्या जोडीदारांसोबतच घालवतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेमाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे देखील सर्वच वयोगटातील लोकं साजरा करतात. मात्र असे असले तरी जगातील अनेक देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात नाही. हा दिवस साजरा करण्यावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. असे देश कोणते आणि का बंदी आहे चला जाणून घेऊया. (Valentine Day)
पाकिस्तान
पाकिस्तानात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी खूप विरोध केला गेला. २०१८ मध्ये हायकोर्टाने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणे आणि त्याचे मीडिया कव्हरेज करण्यावर बंदी घातली होती. कारण ‘व्हॅलेंनटाइन डे’ पाश्चिमात्य देशाची संस्कृती असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या देशात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात नाही. (Marathi)
सौदी अरेबिया
सौदी अरेबियामध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी आहे. २०१४ मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केल्यास ३९ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, २०१८ मध्ये व्हॅलेंटाइनवरील बंदी हटवण्यात आली होती. यामुळे सौदी अरेबियामध्ये टव्हॅलेंटाइन डेट साजरा करण्यावर कोणतीही बंदी नाही. पण मुस्लीम लोकसंख्या असल्याने येथील नागरिक ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करत नाहीत. (Top Marathi News)
मलेशिया
मलेशियात देखील मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. २००५ मध्ये ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त एक फतवा जारी करण्यात आला होता. त्यामुळे या देशात देखील हा दिवस साजरा केला जात नाही, याउलट प्रत्येक वर्षी मलेशियात ‘अँटी व्हॅलेंटाइन’ डे साजरा केला जातो. (Todays Marathi Headline)

इराण
इराण एक मुस्लीम देश असून येथे ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी आहे. खरंतर, ‘व्हॅलेंनटाइन डे’ साजरा करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांची असल्याचे मानले जाते. याच कारणास्तव इराणमधील धर्मगुरु ‘व्हॅलेंटाइन’ साजरा करणे वाईट मानतात. (Top Trending News)
उझबेकिस्तान
उझबेकिस्तान येथे ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याऐवजी नागरिक आपल्या देशाचे नायक बाबर सम्राटचा जन्मदिवस साजरा करतात. व्हॅलेंटाइन डे साजरा करणे बेकायदेशीर नाही. पण बाबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास सक्त मनाई आहे. (Latest Marathi HEadline)
इंडोनेशिया
इंडोनेशियात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी नाही. पण इंडोनेशियातील सुराबया आणि मकसारसारख्या परिसरात कट्टरपंथी मुस्लीम नागरिक राहतात, जे ‘व्हॅलेंनटाइन डे’ साजरा करणे वाईट मानतात. या दिवशी ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त आंदोलनही करतात. (Top Stories)
उत्तर कोरिया
उत्तर कोरियामध्ये व्हॅलेंटाइन डे हा अधिकृतपणे साजरा केला जात नाही, कारण ते पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक मानले जाते आणि सरकार सर्व सांस्कृतिक उत्सवांवर कडक नियंत्रण ठेवते. त्याऐवजी, १६ फेब्रुवारी रोजी किम जोंग इल यांचा वाढदिवस (क्विनजोंगिलिया) मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यासाठी लोकांची राज्यनिष्ठा महत्त्वाची असते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
