भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर आहेत. त्यांच्या या तीस तासांच्या भारत दौ-यामुळे अवघा देश पुतिनमय झाल्याचे चित्र आहे. राजधानी दिल्लीमध्ये व्लादिमीर पुतिन यांचे शाही स्वागत झालेच, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या अन्य मंत्रीमंडळानंही लक्ष वेधून घेतले आहे. पुतिन यांच्यासोबत रशियामधील आघाडीचे उद्योगपतीही भारत भेटीवर आले आहेत. या सर्वात चर्चेत आहे, ती पुतिन यांची महिला ब्रिगेड. (Vladimir Putin)

जागतिक राजकारणात पुतिन यांची रणनीती कायम अग्रेसर असते. युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून रशियाची आर्थिक ताकद कमी होणार अशी आवई उठवण्यात आली होती. मात्र रशियानं कच्चे तेल, युद्धसामुग्री यांच्या जोरावर आपल्या आर्थिक साम्राज्याचा डोलारा सांभाळला आहे. या सर्वांमागे पुतिन यांची विश्वासू महिला ब्रिगेड कार्यरत आहेत. यात व्लादिमीर पुतिन यांच्या दोन मुली आणि एका प्रेमिकेचाही समावेश आहे. पुतिन या सर्वांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही योजनेला सहमती देत नाहीत. पुतिन यांचा विश्वास संपादन करणा-या या दहा महिलांपैकी एक तर त्यांची उत्तराधिकाही म्हणूनही ओळखली जाते. पुतिन भारत दौ-यावर असतांना रशियातील या १० शक्तिशाली महिलांपैकी कोण त्यांच्यासोबत भारत भेटीवर आले आहे, याचीही उत्सुकता आहे. (International News)
जागतिक राजकारणात व्लादिमीर पुतिन यांच्या रणनितीपुढे भलेभले गारद झाले आहेत. पुतिन यांचे अनेक निर्णय धाडसी असतात, आणि त्यांच्या समर्थकांसह पुतिन यांचे विरोधकही त्यामुळे आश्चर्यचकीत होतात. या सर्व निर्णयामागे पुतिन यांचे मंडळ कारणीभूत आहे. या सर्वात १० महिलांची एक ब्रिगेड कायम चर्चेत असते. यातील पहिले नाव आहे व्हॅलेंटिना मॅटविएन्को यांचे. पुतिन यांची उत्तराधिकारी म्हणून व्हॅलेंटीना यांचे नाव घेतले जाते. याशिवाय त्या अंतराळात उड्डाण करणा-या पहिल्या महिला म्हणूनही ओळखल्या जातात. व्हॅलेंटीना सध्या रशियन फेडरेशनच्या फेडरेशन कौन्सिलची अध्यक्षा आहेत. यानंतर मारिया झाखारोवा यांचे नाव येते. (Vladimir Putin)
मारिया झाखारोवा या रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आहेत. मारिया जागतिक मुद्द्यांवर रशियन परराष्ट्र मंत्रालयाचे जोरदार प्रतिनिधित्व करतात. पुतिन यांच्या विश्वासू असलेल्या मारिया या जागतिक राजकारणाच्या अभ्यासक आहेत. एन्ना त्सिव्हिलेवा या रशियाचा माजी उपसंरक्षण मंत्री आहेत. पुतिन यांच्या परिवाराबद्दल फारशी कुणालाही माहिती नाही. एन्ना त्सिव्हिलेवा या त्यांच्या कुटुंबापैकीच एक असल्याची माहिती आहे. मात्र फक्त कुटुंबातील असल्यामुळे त्यांना रशियाच्या मंत्रीमंडळात पद मिळाले नाही, तर एन्ना या यशस्वी उद्योजिका असल्याचीही माहिती आहे. पुतिन यांच्या महिला ब्रिगेडमध्ये अलिना काबाएवा हे नाव महत्त्वाचे आहे. अलिनाचा उल्लेख काय व्लादिमीर पुतिन यांची प्रेयसी असा होता. अत्यंत सुंदर असलेली अलिना सध्या रशियाच्या राष्ट्रीय मीडिया ग्रुपची अध्यक्ष आहे. (International News)

अलिना आणि पुतिन यांच्या नात्याबाबत रशियामध्ये अनेकवेळा चर्चा होते. जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिंपिक चॅम्पियन असल्याची अलिना पुतिन यांच्या दोन मुलांची आई असल्याचीही चर्चा आहे. मात्र अलिनाच्या मुलांची कुठलिही माहिती सोशल मिडियावर उपलब्ध नाही. पुतिन यांची धाकटी मुलगी कॅटरिना तिखोनोवा ही सुद्धा त्यांची विश्वासू सल्लागार आहे. कॅटरिना ही शास्त्रज्ञ आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात कॅटरिना पुतिन सोबत दिसू लागल्यानं पुतिन तिला आपला उत्तराधिकारी म्हणून तयार करत असल्याचीही चर्चा आहे. मारिया व्होरोंत्सोवा ही व्लादिमीर पुतिन आणि त्यांची माजी पत्नी ल्युडमिला पुतिना यांची मोठी मुलगी आहे. मारिया ही बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट आहे. तिला मारिया फासेन म्हणूनही ओळखले जाते. (Vladimir Putin)
========
हे देखील वाचा : America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !
========
मारियाही मंत्रीमंडळामध्ये सल्लागार असून अनेकवेळा ती आपली बहिण कॅटरिना हिच्यासोबत आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये दिसते. याशिवाय पुतिन यांच्या महिला ब्रिगेडमध्य़े रशियाच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नर एल्बिरा नाबिउलिना यांचा समावेश आहे. एल्बिरा यांनी रशियाचे अर्थमंत्री आणि पुतिन यांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. युक्रेन युद्धाच्यावेळी रशियाचा आर्थिक डोलारा याच एल्बिरा यांच्या धोरणामुळे व्यवस्थित राहिल्याची माहिती आहे. यासर्वात उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा, माजी उपपंतप्रधान ओल्गा गोलोडेट्स आणि पुतिन यांच्या पक्षाच्या सदस्या व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांचाही समावेश आहे. पुतिन या सर्वांचा सल्ला घेऊनच आपला निर्णय जाहीर करतात. (International News)
सई बने
