Home » राज कपूर यांच्या ‘या’ अफेयरबद्दल समजलं आणि ऋषी कपूर यांनी सोडले घर?

राज कपूर यांच्या ‘या’ अफेयरबद्दल समजलं आणि ऋषी कपूर यांनी सोडले घर?

by Team Gajawaja
0 comment
rishi kapoor
Share

बॉलिवूडमध्ये अगदी सुरुवातीपासूनच अनेक प्रेमकहाण्या तयार झाल्या आणि गाजल्या देखील. काही प्रेमकहाण्या लग्नापर्यंत पोहचल्या मात्र काही प्रेमकहाण्या सुरु तर झाल्या मात्र त्या त्यांच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहचू शकल्याचे नाही. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अनेक विवाहित आणि प्रसिद्ध लोकांच्या प्रेमकहाण्यांनी जास्त लाईमलाइट मिळवले. अनेक दिग्दर्शक अभिनेत्रींच्या प्रेमात असल्याचे चित्र पूर्वीच्या काळापासून पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. बॉलिवूडचे शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांचे मनोरंजनविश्वात अभूतपूर्व योगदान आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन आदी अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी यशस्वी काम केले. हिंदी चित्रपटांना एक नवीन ओळख, एक नवीन दिशा देण्याचे काम राज कपूर यांनी केले. आजही राज कपूर यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. राज कपूर हे चित्रपटांबद्दल प्रचंड पॅशनेट होते. चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचे घर देखील गहाण ठेवल्याचे सांगितले जाते. ते जेवढे त्यांच्या यशस्वी व्यावसायिक आयुष्याबद्दल गाजले तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल तुफान गाजले. विवाहित असूनही राज कपूर हे अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते. याचे अनेक किस्से आजही इंडस्ट्रीमध्ये गाजताना दिसतात. आज असच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (rishi kapoor)

राज कपूर यांचे वैयक्तिक आणि खासकरून वैवाहिक जीवन खूपच चर्चेत राहिले. एक वेळ अशी आली जेव्हा राज कपूर यांची पत्नी असलेल्या कृष्णा राज कपूर यांनी त्यांच्या मुलाला ऋषी कपूर (rishi kapoor) यांना घेऊन त्यांचे राहते घर सोडले होते. ऋषी कपूर यांनी त्याच्या पुस्तकात याबाबत मोठा खुलासा केला आहे. ऋषी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते की, आईने घर सोडले होते: वडिलांबाबत खुलासा करताना त्यांनी लिहिले, “नर्गिस यांच्यासोबत राज कपूर यांचे अफेयर होते तेव्हा सर्व सामान्य होते. मात्र जेव्हा राज कपूर यांचे अफेयर वैजयंतीमाला यांच्यासोबत सुरु झाले तेव्हा माझ्या आईला ते सहन झाले नाही. मी तेव्हा खूपच लहान होतो. जेव्हा माझ्या वडिलांचे अफेयर नर्गिस यांच्यासोबत सुरु होते. मला नीट आठवत देखील नाही. मात्र मला हे नक्कीच आठवते की. वैजयंतीमाला यांच्या वेळेला माझ्या आईने मला घेऊन घर सोडले आणि आम्ही मरीन ड्राईव्हला असलेल्या नटराज हॉटेलमध्ये राहू लागलो.” 

पुढे ऋषी कपूर (rishi kapoor) यांनी लिहिले की, “त्यावेळी माझ्या आईने हार पत्करली आणि आम्ही हॉटेलमध्ये राहू लागलो. पुढे काही दिवसांनी आम्ही चित्रकुटच्या दोन रूमच्या घरात शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आमच्यासाठी ते घर खरेदी केले होते. माझ्या वडिलांनी आमच्यासाठी खूपच काही करण्याचे प्रयत्न केले, मात्र माझ्या आईने त्यांना शेवट्पर्यंत माफ केले नाही.” पण त्यांनी वैजयंतीमाला यांच्यासोबतच्या अफेयरच्या चर्चाना पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत नाकारले होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी वैजयंतीमाला आणि राज कपूर यांचे नाते होते हे साफ नाकारले होते. त्यांनी सांगितले होते की, “वैजयंतीमाला यांनी दावा केला होता की पब्लिसिटीसाठी त्यांनी खोटे खोटे असे सांगितले होते. मी चिडलो होतो. त्या इतक्या वाईट कशा काय असू शकतात? त्यांना सत्य चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडण्याचा कोणताच अधिकार नव्हता. कारण तेव्हा माझे वडील खरे सांगण्यासाठी या जगातच नव्हते.” (rishi kapoor)

ऋषी कपूर (rishi kapoor) यांनी त्यांच्या पुस्तकात राज कपूर यांच्यासोबतच कपूर कुटुंब त्यांचे वैयक्तिक आयुष्य आदी अनेक गोष्टींबद्दल मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.