मराठी बॉस दिवसेंदिवस अधिकच रंगात येत आहे. घरात होणारे मोठे वाद आणि भांडणं यांसोबतच अनेक घटनांमुळे हा शो रंजक होत आहे. निक्की, जान्हवी या भांडण करणाऱ्या सदस्यांसोबतच इतरही कलाकार आता त्यांचा खेळ खुलून खेळताना दिसत आहे. एवढे दिवस फक्त शांत असणारे सदस्य आता घरातील सर्वच टास्कमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सहभागी होताना दिसत आहे.
आर्या आणि निक्कीमध्ये झालेली झटापट त्यात आर्याने निक्कीला लागवलेली चापट या सर्व गोष्टी या आठवड्यात तुफान चर्चेत होत्या. सोशल मीडियावरही हीच चर्चा रंगलेली दिसली. अशातच आर्याला बिग बॉसने निक्कीला मारल्यामुळे घरातून अचानक निष्कासित केले आणि सगळ्यांना धक्काच बसला. अनेकांनी बिग बॉसला यामुळे ट्रोल देखील केले. अनेकांनी यात निक्कीला तर काहींनी आर्याला पाठिंबा दिला. कलाकारांनी देखील यावर त्यांचे मत व्यक्त केले. कोणताच सीजन गाजला नसेल एवढा बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीजन गाजतोय.
आर्याला या आठवड्यात बिग बॉसमधून निष्कासित केल्यानंतर पुन्हा नेहमीच नॉमिनेशन संपन्न होणार की नाही याबाबत सगळ्यांमध्येच संभ्रम होता. या आठवड्यामध्ये अभिजीत, अंकिता, वैभव, निक्की, वर्षा आणि आर्या असे सहा सदस्य नॉमिनेट होते. यापैकी आर्याला निक्कीला कानशिलात लगावल्याप्रकरणी ‘बिग बॉस’ने घरातून बाहेर काढले.
View this post on Instagram
त्यानंतर भाऊच्या धक्क्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी रितेश देशमुख थेट घरात गेले आणि घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला. रितेश घरात आल्याने सगळ्यांना वाटले यावेळी रितेश वैभव चव्हाणला घराबाहेर घेऊन गेले. रितेशने वैभव घरातून बाहेर जाणार हे सांगताच जान्हवी आणि अरबाज दोघेही प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. घरातून निरोप घेण्याआधी वैभवचे दोन्ही मित्र त्याला मिठी मारून खूप रडले.
======
हे देखील वाचा : “पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल
======
सुरुवातील वैभव खूपच स्ट्रॉंग स्पर्धक वाटला होता. मात्र जसा खेळ सुरु झाला तसे त्याच्या फॅन्सला आणि प्रेक्षकांना जाणवले की हा वैयक्तिकरित्या खेळ खेळण्यास असमर्थ आहे. वैभवकडून प्रेक्षकांना जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा त्याचा खेळ काही दिसला नाही, त्यामुळे प्रेक्षक नाराज होते. तो अरबाजच्या आड खेळतो, असेही प्रेक्षकांनी त्याला ऐकवले. या शोमध्ये मात्र वैभव आणि इरिनाची मैत्री मात्र प्रेक्षकांना भावली.
वैभवच्या घरातून बाहेर जाण्यामुळे आता निक्कीचा ग्रुप खूपच कमजोर झाला आहे. त्यामुळे आता निक्की, अरबाज, जान्हवी हे तिघं त्यांचा ग्रुप कसा सांभाळणार हे पाहावे लागेल. दरम्यान रितेशने बिग बॉसच्या घरात जाताना सदस्यांसाठी एक खास भेट नेली होती. त्याने घरातील सर्वच सदस्यांना त्यांच्या परिवारातील सदस्यांचे व्हिडिओ दाखवले. ज्यामुळे सर्वच खूप भावुक झाल्याचे दिसले.