अफ्रीकन देश गाम्बिया मध्ये भारतातील कफ सीरप प्यायल्याने मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तपास अद्याप सुरुच आहे. या मात्र त्यानंतर काही महिन्यांनी आता उज्बेकिस्तानमध्ये भारतीय सिरप प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. येथील आरोग्य मंत्र्यांनी असा दावा केला आहे की, तेथील २१ मुलांवर उपचार भारतीय औषध निर्माती कंपनीने बनवलेल्या औषधांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने मेरियन बायोटेक प्राइवेट लिमिटेड कंपनीवर त्या मुलांच्या मृत्यूचा आरोप लावला आहे. जी वर्ष २०१२ मध्ये ऊज्बेकिस्तामध्ये रजिस्टर्ड करण्यात आली होती. (Uzbekistan Children Deaths)
कंपनीच्या नोएडा येथील प्लांटमध्ये बनवण्यात आले होते सिरप
आरोग्य मंत्रालयाने आपल्या अधिकृत विधानात असे म्हटले आहे की, मुलांचा मृत्यू डॉक-१ मॅक्स सीरप प्यायल्यामुळे झाला आहे. त्यांचे उत्पादन मेरियन बायोटेकच्या भारतातील नोएडा येथील प्लांटमध्ये करण्यात आले होते. मंत्रालयाच्या मते, हे सीरप गंभीर श्वासामुळे पीडित असेलल्या २१ मुलांना दिले गेले होते. ज्यामध्ये आता पर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे.
मुलांनी सीरपचा चुकीचा डोस घेतला
मंत्रालयाच्या मते, मृत्यूचे शिकार झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापू्र्वीच २-७ दिवस घरीच ते सीरप प्यायले होते. या मुलांनी दिवसभरात ते ३-४ वेळा २.५ ते ५ मिलीलीटर ऐवढा डोस घेतला. जो मुलांच्या ठरवलेल्या स्टँडर्ड डोसपेक्षा अधिक जास्त आहे.
मंत्रालयाच्या मते, पालकांनी मुलांची थंडी दूर करण्यासाठी पॅरासिटामोल ऐवजी या सीरपचा वापर स्वत: हून मेडिकल मधून खरेदी करत केला. त्यावेळी त्यांनी त्याबद्दल विक्रेत्यांना विचारले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधाचे डोस आपल्या मुलांना दिले. हेच कारण ठरले की, मुलांची प्रकृती अधिक बिघडली गेली.
सीरपमध्ये विषारी केमिकल
मंत्रालयाने असे ही म्हटले की, डॉक-मॅक्स सीरपच्या प्राथमिक लॅब चाचणी दरम्यान, यामध्ये एथीलिन ग्लॉयकोलचे अंश मिळाले आहेत. जे अत्यंत विषारी केमिकल आहे. या केमिकलचा वापर करुन औषधात त्याचा वापर केवळ १-२ मिलीग्राम जरी असेल तरीही रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. यामुळे उलटी, हृदयविकाराचा झटका, हृदयासंबंधित समस्या ते किडनी फेल पर्यंतची गंभीर समस्या उद्भवू शकते. (Uzbekistan Children Deaths)
हे देखील वाचा- कार्डिएक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका ‘या’ दोघांमधील जाणून घ्या फरक, लक्षणं
उज्बेक बाजारातून हटवण्यात आले सीरप
हे सीरप बाजारात उतरवण्यापूर्वीच तपासात निष्काळजीपणा दिसून आल्याने ७ अधिकाऱ्यांना बरखास्त करण्यात आले आहे. तसेच उज्बेक बाजारातून डॉक-१ मॅक्स सीरप व टॅबलेट्स ही हटवण्यात आले आहे. मंत्रालयाने पलकांना आपल्या मुलांच्या उपचारासाठी कोणतेही औषध डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच मेडिकल स्टोरमधून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.