२०० वर्षांपूर्वीची गोष्ट, एक अतृप्त आत्मा, एक भयाण वाडा, वाड्यात ऐकू येणाऱ्या “निघून जा” च्या किंकाळ्या आणि “आपण कुणालाच नाही घाबरत” म्हणत घरात येणारं एक कुटुंब एवढीच गोष्ट मी सांगितली तर तुम्ही म्हणाल, भुल भुलैय्या पिक्चरची स्टोरी आहे म्हणून. पण तसं नाहीये, ना भुल भूलैय्या ना पछाडलेला, मुळात ही पिक्चरची स्टोरीच नाहीये. ही कहाणी आहे यूपी मधल्या एटा जवळची त्या वाड्यात किंकाळ्यांचा आवाज का यायचा, त्या वाड्यात नक्की काय घडलंय? हे जाणुन घेऊया. (UttarPradesh Story)
तर मघाशी सांगितल्याप्रमाणे गोष्ट आहे २०० वर्षांपूर्वीची. उत्तरप्रदेशातल्या एटा जवळ एक हवेली आहे. साधारणपणे जुनी हवेली म्हटली की जळमटं लागलेली, तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेतली वास्तू डोळ्यासमोर येते, पण इथे तसं नाहीये. ह्या वाड्यात एक कुटुंब वास्तव्याला आहे होतं आहे म्हणजे आधी कुटुंब होतं पण आता जे उरलयं त्याला कुटुंब म्हणता येईल का, हा प्रश्नच आहे. कारण ह्या वाड्यात ह्या कुटुंबासोबत वास्त्यव्याला आहे रमिया जिचा मृत्यू होऊन उलटून गेलीयेत २०० वर्ष. (Social News)
रमिया बाई एक नाचणारी बाई जिच्या रूपाची चर्चा गावा गावात व्हायची जिला नाचताना पहाणं प्रत्येकाचं स्वप्न असायचं असच स्वप्न घेऊन २०० वर्षांपुर्वी ह्या वाड्यात राहणारे दोन भाऊ रमिया जवळ गेले, मग रमिया वाड्यावर आली. रमियाच्या रूपाचे, तिच्या कलेचे दिवाने झालेले हे दोघं भाऊ कधी एकमेकांचा दुस्वास करू लागले, त्यांचं त्यांनाही कळलं नाही. त्यात रमिया बिचारी इमानेइतबारे तिचं काम करणारी, तिच्याही हे लक्षात आलं नाही, आणि एके दिवशी कडेलोट झाला. (UttarPradesh Story)
रमियावरून दोघे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले जोरदार भांडण झालं कुणीतरी एक संपल्यावरचं हे भांडण संपणार होतं इतक्यात रमिया मध्ये पडली आणि ते “कुणीतरी” रमियाच ठरली. हसत खेळत नाचत गात लोकांना तासनतास खिळवून ठेवणारी नजर आता शून्यात पहात शांत झाली. निष्कारण गेलेला रमियाचा बळी वाड्याला भारी पडला. एकामागोमाग एक करत वाडा खाली झाला, पण रमिया मात्र वाड्यात भटकत राहिली, आठवत राहिली जुन्या दिवसांना, तिच्या सुवर्णकाळाला. काळ पुढे सरकला, पण रमिया अजून तिथेच होती. कालांतराने गुप्ता फॅमिली वाडयात रहायला आली. त्या वाडयात जिथे मध्यरात्री एका तरुण मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येतो, भयाण आवाज “मला बाहेर काढू नका, हे माझं घर आहे. तुम्हाला बर्बाद करून टाकीन”,या किंकाळ्या रमियाच्याच असतात. असंच एक दिवस वाड्यात किंचाळण्याचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. पण ह्यावेळी किंचाळण्यात त्रास ऐकू येत होता. वेदना ऐकू येत होत्या. पाणी,पाणी, करत ती तरुणी मदत मागत होती. पण जाण्याची चूक कुणी करत नव्हतं, कारण तीच्या जवळ गेलेला परत कधी येतच नाही. (Social News)
======
हे देखील वाचा : मंजिरींना सुद्धा गुप्तहेर म्हणून वापरतात ?
====
गुप्ता परिवारातले असेच बरेच जण गेले आणि परत आलेच नाहीत. मग गुप्ता परिवराने वैतागून खूप कमी पैशात हा वाडा विकला. तो विकत घेतला तोमर कुटुंबाने. तोमर कुटुंब वाडयात आलं आणि व्हायचं तेच झालं. संतेंद्र तोमर यांच्या आईला एक रात्री एक सावली दिसली. त्यांच्या आईला सावली दिसत होती, पण ती कोणाची आहे हे दिसतच नव्हतं. तोमर कुटुंबातील ज्याला ज्याला कसली तरी सावली दिसली, तो पुन्हा कधीच दिसला नाही. आधी आई, मग बायको, मग तीन मुलं रमियाची शिकार बनली. ह्या सगळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी पूजा सुद्धा घालण्यात आली, पण पूजा घातलेला माणूसच दुसऱ्या दिवशी मेला. तेव्हा रमियाची शक्ती लोकांच्या लक्षात आली. आता ह्याला भयानक सत्य म्हणायचं की रंजक दंतकथा ते प्रत्येकाने ठरवायचंय पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की जर रमिया ही दंत कथा आहे तर मग गुप्ता आणि तोमर कुटुंबातल्या माणसांचं झालं काय?? केलं कुणी?? (UttarPradesh Story)