जर तुमच्या पर्समध्ये ५००० रुपये असतील आणि तुम्हाला पर्वतांच्या सहलीला जायचे असेल, तर मग आम्ही तुम्हाला मदत करू शकतो! ‘देवभूमी’, उत्तराखंड हे राज्य निसर्गरम्य प्रेक्षणीय ठिकाणांनी भरलेले आहे. जिथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. (Uttarakhand Tourism)
हे राज्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते, कारण येथे शांततेत वेळ घालवण्यासाठी, ट्रेकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये पर्वतांना भेट देण्याचा प्लॅन बनवायचा असेल, तर आम्ही अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही ५००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत भेट देऊ शकता. (Uttarakhand Tourism)
लॅन्सडाउन
उत्तराखंडमधील एक सुंदर हिल स्टेशन, लॅन्सडाउन हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना गर्दीपासून दूर एकांतात वेळ घालवायला आवडते. लोक येथे अनेक ॲक्टिव्हिटी करू शकतात, मग ते साहसी असो किंवा आध्यात्मिक असो. येथून केदारनाथ पर्वत आणि चौकुंभ स्पष्ट आणि दिसतात. (Uttarakhand Tourism)
हरिद्वार
जर तुम्ही आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती असाल, तर संपूर्ण धार्मिक सुट्टीसाठी हरिद्वारपेक्षा चांगले ठिकाण कमी बजेटमध्ये उपलब्ध असतात. हर-की-पौरीपासून ते मनसा देवी मंदिरापर्यंत, हे ठिकाण काही अविश्वसनीय आणि प्राचीन मंदिरांनी भरलेले आहे. याशिवाय तुम्ही हरिद्वारच्या घाटांवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या भव्य गंगा आरतीचा आनंदही घेऊ शकता. (Uttarakhand Tourism)
ऋषिकेश
जगाची योग राजधानी, ऋषिकेश हे जगभरातील साहसी आणि शांतताप्रेमी लोकांना फार पूर्वीपासून आकर्षित करत आहे. झिपलाइनिंग, बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंग यासारख्या साहसी क्रियाकलापांसाठी हे ठिकाण एक योग्य केंद्र आहे. केवळ ५००० रुपयांमध्ये तुम्ही या भव्य शहराच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
मसुरी
मसुरी हे उत्तर भारतातील असेच एक हिल स्टेशन आहे, जिथे सर्वाधिक पर्यटक जातात. हे देहरादूनपासून ३४ किमी अंतरावर आहे. उत्तराखंडच्या या सुंदर आणि मनमोहक हिल स्टेशनमध्ये तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य, टेकड्या आणि जुन्या इमारती पाहायला मिळतील. जर तुमच्याकडे ५००० रुपये असतील तर तुम्ही या ठिकाणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.
=====
हे देखील वाचा – उन्हाळ्यात लडाखला भेट देण्याचा प्लॅन करताय? मग चुकवू नका ‘ही’ ५ ठिकाणं
=====
भीमताल
उत्तराखंडमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे भीमताल! भीमतालला वर्षभरात कधीही भेट देता येते. हे ठिकाण आल्हाददायक आणि थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. नैनितालच्या जवळ वसलेल्या, भीमतालमध्ये मोहक टेकड्या, एक भव्य तलाव आणि हिरवळ आहे. मूलभूत गरजांशी तडजोड न करता येथे ५००० रुपयांमध्ये चांगला वेळ घालवता येतो.