प्रयागराजमध्ये झालेला महाकुंभ हा आता जागतिक अभ्यासाचा विषय ठरला आहे. महाकुंभमध्ये 66 करोड भाविक सहभागी झाले होते. या महाकुंभचे आयोजन, नियोजन कसे झाले, याबाबत अभ्यासक्रम येत आहेत. पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाकुंभमुळे प्रयागराज येथील अर्थव्यवस्था पार बदलून गेली आहे. सोबतच उत्तर प्रदेशमधील अर्थव्यवस्थेला प्रयागराजमुळे सोनेरी दिवस आले आहेत. यापूर्वी उत्तराखंडला धार्मिक यात्रेसाठी जाणा-या भाविकांची संख्या मोठी होती. परदेशी पर्यटकही उत्तराखंडला पसंती देत होते. मात्र आता या सर्व भाविकांचा ओघ उत्तरप्रदेशमध्ये वळला आहे. प्रयागराज येथील महाकुंभला आलेल्या भाविकांनी वाराणसी, अयोध्या, मथुरा, वृंदावन येथेही हजेरी लावली. परिणामी उत्तरप्रदेशमधील धार्मिक पर्यटन वाढले आहे. (Maha Kumbh)
या सर्व भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली आहे. रस्ते वाहतूक, हॉटेल, रेस्टॉरंट पासून हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करणा-या लहान व्यावसायिकांनाही 30 ते 40 टक्के नफा मिळाल्याची माहिती आली आहे. या महाकुंभमुळे प्रयागराज, उत्तरप्रदेशसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी उभारी मिळाली आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची समाप्ती झाली असली तरी हा महाकुंभ येथील जनमानसाच्या मनामध्ये कायम रहाणार आहे. या महाकुंभची भव्यता, व्यापकता याचे वर्णन करणे अशक्य आहे. सोबतच या संपूर्ण महाकुंभ कालावधीत प्रयागराज येथील जनतेचे जीवन बदलले आहे. प्रयागराज येथील हॉटेल पासून ते गाडीवर खाद्य पदार्थ किंवा फळे विकणा-या विक्रेत्यांनाही पुढच्या काही वर्षातील नफा मिळाला आहे. 2013 मध्ये झालेल्या महाकुंभमध्ये प्रयागराज येथील नागरिकांना नाराजी व्यक्त केली होती. मात्र यावेळी झालेल्या महाकुंभच्या आयोजनासाठी प्रयागराज शहरातील वाहतूक आणि अन्य व्यवस्थेत कमालीची बदल करण्यात आले. (Marathi News)
शिवाय विकासकामांमुळे अनेक बांधकामे तोडण्यात आली, रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र प्रयागराजच्या लोकांनी याबाबत तक्रार केली नाही. महाकुंभच्या 45 दिवसांच्या कालावधीत करोडो नागरिक या शहरात आले. त्याचा येथील रहिवाशांना काही प्रमाणात त्रास झाला. मात्र या करोडो भाविकांमुळे प्रयागराज शहराची अर्थव्यवस्था सोनेरी झाल्याची जाणीवही या नागरिकांना आहे. थोडी थोडकी नाही तर प्रयागराजच्या अर्थव्यवस्थेला 40 टक्के फायदा झाला आहे. महाकुंभमध्ये भाविकांना टिका लावणा-यांनीही दिवसाला पाच ते दहा हजार रुपयांची कमाई केली आहे. या सर्वांमुळे प्रयागराजला भविष्यात सोनेरी दिवस येणार आहेत. येथील विकासकामे अधिक वेगानं सुरु होणार असून प्रयागराज मधील मंदिरांचेही अधिक सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच या मंदिराभोवती कॉरिडोर करण्याचा विचार उत्तरप्रदेश सरकारचा आहे. यासर्वात उत्तरप्रदेशमधील सर्वच धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी होत असून त्याचा फायदा उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला झाला आहे. (Maha Kumbh)
महाशिवरात्रीला पवित्र स्नान करून प्रयागराज महाकुंभमेळ्याची सांगता झाली. पण महाकुंभाच्या या भव्य आयोजनानं अनेक विक्रम रचले गेले आहेत. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभमेळ्यात, भारतासह जगातील 100 हून अधिक देशांतील भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. या भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे, वाहतूक क्षेत्रापासून ते हॉटेल, पर्यटन अशा शेकडो क्षेत्रांच्या व्यवसायात अनपेक्षित वाढ झाली असून आर्थिक उलाढाल 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची माहिती आहे. महाकुंभमुळे प्रयागराजमधील रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि लक्झरी वस्तूंच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. महाकुंभमुळे उत्तरप्रदेशसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. (Marathi News)
मार्चअखेर देशाची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. महाकुंभाच्या आयोजनातून वाढलेल्या उत्पन्नामुळे प्रयागराजच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 300 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाजही आहे. यामुळे प्रयागराजमधील धार्मिक पर्यटनाच्या सुविधाही भविष्यात वाढवण्यात येणार आहेत. परिणामी महाकुंभाची समाप्ती झाली असली तरी प्रयागराजमध्ये पुढची दोन वर्ष असाच भाविकांचा ओढा रहाणार आहे. महाकुंभमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टूर आणि ट्रॅव्हल उद्योग तसेच धान्य, भाजीपाला, गाद्या, बेड, फर्निचर, तंबू यांच्या व्यावसायिकांना 40 पट अधिक नफा मिळाला आहे. यातील अनेकांनी व्यवसायासाठी नवी साधनसामुग्री घेतली आहे. महाकुंभ झाल्यावर भाविकांचा ओघ कमी झाला तर अशा व्यावसायिकांचे नुकसान होणार अशी शंका होती. मात्र उत्तरप्रदेश सरकारनं प्रयागराजमध्ये महाकुंभ नंतरही अनेक विकासकामे सुरु केल्यानं भाविकांचा ओघ असाच राहणार आहे. परिणामी धार्मिक पर्यटनावर आधारित येथील अर्थव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे. (Maha Kumbh)
===============
हे देखील वाचा : Goldfish : गोल्डफिश आहे का तुमच्याकडे ? मग हे नक्की वाचा..
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
प्रयागराजमधील महाकुंभ हा पुढील काही वर्ष चर्चेचा आणि आर्थिक घडामोडींच्या अभ्यासाचा विषय ठरणार आहे. आर्थिक तज्ञांच्या मते, आतिथ्य आणि निवास, अन्न आणि पेय क्षेत्र, वाहतूक, धार्मिक पोशाख, पूजा आणि हस्तकला, कापड, ग्राहकोपयोगी वस्तूंसह अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी झाल्या आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने 30000 कोटी रुपयांचा महसूल मिळवल्याची महिती आहे. या महाकुंभसाठी उत्तरप्रदेश सरकारनं 7500 कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. महाकुंभसाठी उत्तरप्रदेशमध्ये 14 नवीन उड्डाणपूल, सहा अंडरपास रस्ते, 200 हून अधिक रुंदीकरण केलेले रस्ते, नवीन कॉरिडॉर, विस्तारित रेल्वे स्थानके आणि आधुनिक विमानतळ टर्मिनल बांधण्यासाठी हे बजेट वापरण्यात आले. महाकुंभनंतर आता उत्तरप्रदेश सरकारच्या खजिन्यात याहून दुप्पटीनं पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महाकुंभ फक्त धार्मिक दृष्ट्या विशेष ठरला असे नाही तर, आर्थिक दृष्ट्याही फलदायी ठरल्याचे चित्र आहे. (Marathi News)
सई बने