उत्तरप्रदेश येथील प्रयागराजमध्ये अनेक पुरातन वारसा असलेली मंदिरे आहेत. यातील एक प्रमुख मंदिर म्हणून लेटे हुए हनुमानजी मंदिरही आहे. त्रिवेणी संगमा जवळ असलेल्या या मंदिरात हनुमानजींची भव्य मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये झालेल्या घनघोर युद्धानंतर हनुमानजी प्रयागराज येथील या त्रिवेणी संगमावर विश्रांतीसाठी आले असल्याची कथा सांगितली जाते. याच हनुमानजींना दरवर्षी माता गंगा, यमुना स्वतः भेटायला येतात. (Uttar Pradesh)

हा सर्व सोहळा अद्वितीय असतो. सध्या उत्तरप्रदेशमध्य जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे गंगा आणि यमुना नदीचे पाणी लेटे हुए हनुमानजींच्या मंदिरापर्यंत पोहचले आहे. येथे जमिनीपासून जवळपास सात फूट खाली अशी झोपलेल्या अवस्थेतील हनुमानांची मूर्ती आहे. 20 फूट उंचीच्या या मुर्तीवर यावर्षी पहिल्यांदा गंगेच्या पाण्याचा अभिषेक झाला आहे. हा अभिषेक सोहळा बघण्यासाठी येथे अनेक भक्त उपस्थित होते. हनुमानांवर हा अभिषेक होत असतांना मंदिराच्या पुजा-यांनी आरतीही केली. पुढचे काही दिवस माता गंगा या मंदिरापर्यंत रहाणार असून हनुमानांना रोज अभिषेक होणार आहे. (Latest Updates)
प्रयागराज त्रिवेणी संगमावर असलेले लेटे हुए हनुमानजी मंदिर प्रसिद्ध आहे. त्रिवेणी संगमपासून सुमारे 1 किमी अंतरावर हे भव्य मंदिर आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य रुपात असलेल्या सरस्वती नदींचा येथे संगम होतो. याच संगमावरील या मंदिरात दरवर्षी पावसाळ्यात एक अद्भूत सोहळा होता. गंगा नदीला पूर आल्यावर त्याचे पाणी संगमाबाहेर येते. हा पूर एवढा मोठा असतो की संगमापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या लेटे हुए हनुमानजी मंदिरातही हे पुराचे पाणी शिरते. (Uttar Pradesh)
मात्र ही घटना येथे एका सोहळ्यासारखी साजरी केली जाते. माता गंगा या मंदिरामध्ये कधी येणार याची प्रतीक्षा अनेक भाविक करत असतात. आत्ता प्रयागराज येथे हा सोहळा झाला आहे. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यानं लेटे हुए हनुमानजींचा अभिषेक संपन्न झाला आहे. या मंदिराला स्थानिक बडी हनुमान मंदिर म्हणूनही ओळखतात. बडी हनुमान मंदिराच्या गर्भगृहात गंगा आणि यमुनेचे पाणी येणे शुभ मानले जाते. गंगा आणि यमुनेचे पाणी गर्भगृहात पोहोचल्यानंतर, मंदिरात विधीनुसार पूजा आणि आरती करण्यात येते. सध्या या मंदिरेचा महंत बलबीर गिरी असून त्यांनी हनुमानजींची आणि माता गंगा, यमुनेचीही आरती केली. (Latest Updates)
यावेळी अनेक भक्तही या पुराच्या पाण्याच उभं राहून हनुमानजींचा जयजयकार करीत होते. मंदिरात हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करण्यात आले. मात्र पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर सुरक्षितेसाठी या मंदिराचे दरवाजे बंद कऱण्यात आले आहेत. आता या मंदिरात पुजा-यांशिवाय अन्य कोणालाही जाण्यासाठी परवानगी नाही. दरवर्षी यमुना नदीची पाण्याची पातळी 81.54 मीटर आणि गंगा नदीची पातळी 80.97 मीटरपर्यंत पोहोचते तेव्हा गंगा आणि यमुना नदी या लेटे हुए हनुमानजी मंदिरात प्रवेश करते. त्यापेक्षा पाण्याची पातळी अधिक असली तर मंदिर बंद करण्यात येते. आता प्रयागराजमध्ये पुराची पातळी वाढली असून शहरात पाणी शिरले आहे. त्यामुळे सुरक्षितेसाठी हे लेटे हुए हनुमानजी मंदिर बंद केले आहे. प्रयागराजच्या या लेटे हुए हनुमानजी मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. हनुमानजींची ही मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून असून तिची उंची 20 फूट आहे. (Uttar Pradesh)

झोपलेल्या अवस्थेतील ही मूर्ती जमिनीपासून 7 फूट खाली आहे. हे मंदिर बडी हनुमानजी, किल्ले हनुमानजी, लेइंग हनुमानजी आणि दाम हनुमानजी या नावांनीही ओळखले जाते. या मूर्तीबद्दल असे मानले जाते की, कामदा देवी या मूर्तीच्या डाव्या पायाखाली लपलेली आहे आणि अहिरावण या मूर्तीच्या उजव्या पायाखाली लपलेला आहे. त्याच्या उजव्या हातात राम-लक्ष्मण आणि डाव्या हातात गदा आहे. हे ठिकाण खूप जागरुक मानले जाते. हनुमानजी येथे प्रत्यक्ष वास करीत असून ते आपल्य भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, असेही सांगितले जाते. हे मंदिर किमान 700 वर्षे जुने आहे. या मंदिरामागे कन्नौजच्या राजाची कथा सांगितली जाते. कन्नौजच्या राजाला मूलबाळ नव्हते. त्यांच्या गुरूंनी यावर उपाय म्हणून प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना नागाच्या पाशातून सोडविण्यासाठी पाताळात गेलेल्या हनुमानजींची मूर्ती तयार कर, असे सांगितले. (Latest Updates)
=============
हे ही वाचा : Jaipur : ऐन श्रावणात बंद रहाणारे महादेवाचे मंदिर !
==========
हनुमानजीची ही मूर्ती विंध्याचल पर्वतावरून बनवून आणण्यात आली. मात्र विंध्याचलहून हनुमानजीची मूर्ती नावेतून आणत असतांना अचानक बोट फुटली आणि ही मूर्ती पाण्यात बुडाली. त्यामुळे दुःखी होऊन राजा आपल्या राज्यात गेला. या घटनेनंतर अनेक वर्षांनी, जेव्हा गंगेच्या पाण्याची पातळी कमी झाली, तेव्हा तिथे रामभक्त बाबा बालागिरी महाराज यांना ही मूर्ती सापडली. तेव्हा इथेच हनुमानजींचे मंदिर बांधण्यात आले. अकबरानंही किल्ला बांधण्यासाठी हे मंदिर पाडून मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सर्व प्रयत्न करुनही ही मूर्ती थोडीही हलली नाही. त्यामुळे अकबरानं आपला पराभव मान्य करत मंदिराच्या मागून किल्ल्याची भिंत बांधली. आता हा संपूर्ण भाग गंगा, यमुना नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पूर ओसरल्यावर या लेटे हुए हनुमानजी मंदिरात मोठी पूजा करण्यात येईल, आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. (Uttar Pradesh)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
