आपण प्रत्येक जणं वर्षातून एकदा तरी देवदर्शनाला जातात. विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन देवाचे दर्शन घेण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. यासाठी सगळेच विविध प्लॅन्स करतात आणि आपल्या सुट्ट्यांनुसार यात्रेला जाण्याचे ठरवतात. असे असले तरी प्रत्येकाचीच आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करण्याची इच्छा असते. अनेकांना वाटते भविष्यात जाऊ, तर काहींची इच्छा असते आता तरुणपणात जाऊन येऊ, मात्र काही कारणास्तव जर तुमची चारधाम यात्रा झाली नसेल तर तुम्हाला यंदा ही चारधाम यात्रा करण्याची संधी उपलब्ध होत आहे. (Chardham)
हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. या चार धाम यात्रेमध्ये बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम या चार पवित्र स्थळांचा समावेश आहे. ही यात्रा दरवर्षी यमुनोत्री येथून सुरू होते, दुसरा मुक्काम गंगोत्री, तिसरा मुक्काम केदारनाथ आहे, इथे महादेवांची पूजा केली जाते आणि चौथा शेवटचे ठिकाण आहे बद्रीनाथ येथे भगवान विष्णूची पूजा करतात. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार चार धामची यात्रा केल्यानंतर सर्व पापांचा नाश होऊन मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. (Top Marathi News)
आपल्याकडे दोन चारधाम आहेत. यातल्या मुख्य चारधाममध्ये बद्रीनाथ, द्वारका, जग्गनाथ पुरी आणि रामेश्वरम या ठिकाणचा समावेश होतो तर. छोटी चारधाम यात्रा असलेल्या यात्रेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या ठिकाणांचा समावेश होतो. बद्रीनाथला तर विश्वाचे आठवे वैकुंठ म्हटले जाते. जिथे भगवान विष्णू सहा महिने झोपतात आणि सहा महिने जागृत राहतात. तसेच केदारनाथ हे भगवान शंकराचे स्थान आहे. केदारनाथमध्ये नर आणि नारायण असे दोन पर्वत आहेत. ही नर आणि नारायण ऋषींची तपोभूमी देखील आहे. (Marathi Trending News)
पवित्र अशा छोट्या धाम यात्रेला लवकरच सुरुवात होत आहे. पवित्र चारधाम यात्रा येत्या ३० एप्रिल २०२५ रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी सुरु होणार आहे. या दिवशी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे सकाळी १०:३० वाजता उघडले जातील. तर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने जाहीर केल्याप्रमाणे, केदारनाथ धामचे दरवाजे २ मे रोजी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी उघडले जातील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडले जातील. ज्यांना या धार्मिक स्थळांची यात्रा करायची आहे, त्यांनी या यात्रेला कसे जावे चला जाणून घेऊया. (Marathi Latest News)
ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया
– चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
– नोंदणीसाठी अधिकृत सरकारी वेबसाइट: https://registrationandtouristcare.uk.gov.in/signin.php
– ६० टक्के नोंदणी ऑनलाइन आणि ४० टक्के नोंदणी ऑफलाइन केली जाईल.
– पहिल्या १५ दिवसांसाठी २४ तास ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध राहील.
– हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये २० ते २० नोंदणी केंद्रे तसेच विकासनगरमध्ये १५ केंद्रे उभारली जातील.
=======
हे देखील वाचा : Sugarcane Juice : उन्हाळ्यात वरदान असलेल्या उसाच्या रसाचे फायदे
Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?
=======
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यासारख्या वैध ओळख पुराव्याद्वारे चार धाम यात्रेसाठी नोंदणी करता येते. याशिवाय ऑनलाइन नोंदणीसाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी आवश्यक आहे. यावर्षीचा चारधाम यात्रेबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे चारधाम यात्रेमध्ये पहिल्या एक महिन्यासाठी VIP दर्शन बंद राहणार आहे. ट्रिपचे नियोजन करताना, हवामानाची परिस्थिती समजून घ्या आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. (Marathi News)