मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी उत्पन्ना एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहते. चातुर्मास संपल्यानंतर उत्पन्ना एकादशी येत असल्याने या एकादशीचे महत्त्व अधिक आहे. हिंदू वर्षातील १७ व्या शुभ एकादशीला उत्पना एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत दरवर्षी मार्गशीर्ष म्हणजेच अगहन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. याच दिवशी मूर राक्षसाचा वध करणाऱ्या एकादशी मातेचा जन्म देखील मानला जातो. यंदा १५ नोव्हेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. एकादशीच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा करा आणि तुळशीची देखील पूजा केली जाते. या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर न्नकीच त्याचा तुम्हाला लाभ होईल. जीवनात सुख आणि समृद्धी लाभेल, उत्तम आरोग्य, संपत्ती देखील लाभते. (Marathi News)

* उत्त्पन्ना एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर या एकादशीला तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा केल्यास लाभ होईल. तुळशी मातेसमोर पाच दिवे लावा. ७ वेळा प्रदक्षिणा घाला. १०८ वेळा विष्णू नामांचा जप केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. (Top Stories)
* उत्पन्ना एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे, म्हणून या दिवशी त्यांच्या दिव्य रूप शालिग्रामची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शालिग्राम एका भांड्यात ठेवा, गंगाजलाने धुवा, पिवळ्या पिठावर ठेवा आणि चंदन लावा. त्यानंतर तुळशीची पाने व नैवेद्य अर्पण करून आरती करावी. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. (Top Marathi News)
* या एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून स्नान करावे. आंघोळीनंतर पिवळे कपडे परिधान करावे, असे केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा कायम राहील, असे मानले जाते. करिअर किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर उत्पन्ना एकादशीच्या दिवशी दुधात केसर घालून भगवान विष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
* एकादशीच्या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. यानंतर संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. (Latest Marathi Headline)
========
Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा
========
* उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही विष्णूजींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर दिवा लावून फुले अर्पण करा. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. तुळस अत्यंत पवित्र मानली जाते. उत्पन्ना एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी तुळशीला फुले आणि गोडाचा नैवैद्य देखील अर्पण करू शकता. (Top Trending News)
* या एकादशीच्या दिवशी तुळशीच्या मंजुळा लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
* उत्पन्ना एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालवावी. यानंतर तुळशीच्या देठावर कळवा बांधावा. हा उपाय केल्याने सर्व त्रास दूर होतात. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
