UTI Infection Symptoms : उन्हाळ्याच्या दिवसात युरिनरीट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढला जातो. यामागे काही कारणे असू शकतात. पण सर्वाधिक प्रमुख कारण म्हणजे डिहाइड्रेशन. उन्हाळ्यात युरिन कमी होते आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय उन्हाळ्यात युटीआय होण्यामागे काही कारणे असू शकतात. पण युटीआयच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देत उपचार करावेत. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
युटीआय म्हणजे मूत्राशयाच्या मार्गावर होणारे इन्फेक्शन. यामुळे युरिन करताना जळजळ होणे किंवा दुखणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे युटीआयची समस्या उद्भवल्यास किडनीचे कार्यही प्रभावित होते.

UTI Infection Symptoms
हे आहे कारण
युटीआय होण्यामागील मुख्य कारणे म्हणजे, डिहाइड्रेशन, अस्वच्छ टॉयलेट अथवा लघवी रोखून ठेवणे. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यानंतर डिहाइड्रेशनची समस्या उद्भवल्यासही युटीआय होऊ शकतो. यामुळे वेळीच युटीआयच्या समस्येकडे लक्ष द्यावे. टॉयलेटच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ युरिन थांबवून ठेवू नका. (UTI Infection Symptoms)
======================================================================================================
हेही वाचा :
उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे
उन्हाळ्यात दररोज दही खाताय? करू नका या चुका, बिघडेल आरोग्य
=======================================================================================================
सुरुवातीची लक्षणे
युटीआय झाल्यास सुरुवातीला युरिनजवळ जळजळ होण्याची समस्या सुरू होते. याशिवाय युरिनचा रंग देखील बदलला जातो. युरिनमधून दुर्गंधी येणे, तापही येऊ शकतो. स्थिती गंभीर झाल्यास पोटाखालील भागात आणि कंबरेमध्ये दुखण्यास सुरुवात होणे. जर ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. उपचारामध्ये वेळ घालवल्यास अन्य गंभीर समस्या होऊ शकतात.