अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा नेत्रदीपक विजय झाला आहे. या विजयामुळे 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी होतील. मेलानियासोबत आणखी एका महिलेची भूमिका आता अमेरिकेच्या राजकारणात महत्वाची राहणार आहे, ती म्हणजे, सेकंड लेडीची. आणि ही सेकंड लेडी आहे उषा वन्स. अर्थातच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेडी वन्स यांच्या पत्नी असलेल्या उषा वन्स या सेकंड लेडी हे पद भूषवणार आहेत. उषा मुळच्या भारतीय असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाह मोहीमेची सर्व सूत्र त्यांच्याकडे होती. त्यांच्या या नियोजनामुळेच ट्रम्प यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते पडली आहेत. त्यांच्या या रणनितीचे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनीही आभार व्यक्त केले आहेत. फ्लोरिडामध्ये विजयाची घोषणा करताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे पुढील उपराष्ट्रपती जेडी वन्स आणि त्यांच्या असामान्य आणि सुंदर पत्नी उषा वन्स यांचे आभार आहेत, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. यासोबत या उषा वन्स नेमक्या कोण आहेत,आणि भारताबरोबर त्यांचे काय नाते आहे, याची चर्चा सुरु झाली. (Usha Vance)
अमेरिकेचे अध्यक्षांची पत्नी ही अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून संबोधली जाते. तर उपाध्यक्षांच्या पत्नीला सेकंड लेडीचा बहुमान मिळतो. हा बहुमान मिळाला आहे, उषा वन्स या भारतीय वंशीय महिलेला. उषा वन्स या जेडी वन्स यांच्या पत्नी आहेत. जेडी वन्स हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू साथी म्हणून ओळखले जातात. तेही 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यासोबत उषा या अमेरिकेच्या सेकंड लेडी होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सर्व प्रचार मोहीमेत या वन्स दाम्पत्याची भूमिका महत्त्वाची होती. विशेषतः उषा यांनी जी रणनिती आखली त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सहजसाध्य झाला असे सांगितले जाते. त्यामुळेच स्वतः डोनाल्ड ट्रम्पही उषा यांचा उल्लेख करतांना असमान्य महिला असाच करतात. उषा वन्सचे खरे नाव उषा चिलकुरी आहे. उषा यांचे आईवडिल भारतीय असून त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. (International News)
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वडालुरू हे उषा वन्सच्या पालकांचे वडिलोपार्जित गाव आहे. उषा यांचे बालपण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेले. शालेय जीवनात त्या प्रचंड हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी येल विद्यापीठातून इतिहासात पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या कायदेशीर कारकिर्द सुरु केली. त्यात त्यांचे अनेक खटले गाजले आहेत. यूएस सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स आणि न्यायाधीश ब्रेट कॅव्हानो यांच्यासोबत क्लर्कशिपही केली आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्यासोबत उषा यांनी काम केले आहे. या प्रतिष्ठित पदांनी उषाला कायदेशीर क्षेत्रात एक विशेष ओळख मिळवून दिली आहे. दरम्यान जेडी वन्स आणि उषा वन्स यांची भेट येल विद्यापीठात झाली. या भेटीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. त्यांना इव्हान, विवेक आणि मीराबेल अशी तीन मुले आहेत. उषा या जेवढ्या चांगल्या वकिल आहेत, तेवढ्याच चांगल्या गृहिणी म्हणून ओळखल्या जातात. (Usha Vance)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी हे वन्स कुटुंब ओळखले जाते. स्वतः जेडी वन्सही हिंदू धर्मातील सर्व सण समारंभ साजरे करतात. सर्वसामान्य जनतेबरोबर त्यांची नाळ चांगली जुळली आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची आखणी करतांना त्यांनी अमेरिकेतील ग्रामीण विभागाला अधिक प्राधान्य दिले. सामान्य जनतेच्या समस्या समजून त्यांच्यावर प्रचार मोहिमेदरम्यान प्रकाश टाकायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून ट्रम्प यांना स्विंग राज्यात अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला या प्रचार मोहीमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र उषा यांनी अश्वस्त केल्यावर डोनाल्ड यांनीही उषा यांच्या सल्यानुसारच प्रचार केला. त्यामुळे विजयी सभेत त्यांनी उषा यांचे आभार व्यक्त करतांना, उषा ही माझ्यापेक्षा अधिक कुशल आणि प्रतिभावान आहे, असे खुल्यादिलाने उषा वन्स यांचे कौतुक केले. अमेरिकन राजकारणातील एक संतुलित, बुद्धिमान महिला म्हणून उषा यांच्याकडे पाहिले जाते. भविष्यात उषा वन्स यांचे नाव अधिक उज्ज्व होणार हे निश्चित आहे. (International News)
सई बने