ज्याप्रमाणे आपण वस्तूंची देवाणघेवाण करतो, अगदी तशाच पद्धतीने प्रत्येक देश हा एकमेकांकडून विविध गोष्टी घेत पुढे जात असतो. ग्लोबलाइज होत असतो. भारताने जगाला भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत अनेक गोष्टी दिल्या, हे तर आपल्याला माहितीच आहे.अश्या प्रत्येक संस्कृतीने, प्रत्येक देशाने जगाला काही गोष्टी देऊ केल्यात. आर्किटेक्चरपासून कायदा आणि शासनापर्यंत अनेक क्षेत्रात प्राचीन रोमन अग्रगण्य होते, हे आपण ऐकून असाल. त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकलो, आत्मसात करत गेलो. पण याच रोमन साम्राज्यातील एक अशी गोष्ट जी खरं तर ऐकून तुम्हाला किळस येईल, पण त्याकाळी स्वच्छतेचा एक भाग म्हणून ती गोष्टी महत्वाची होती. कोणती होती ती गोष्ट ? जाणून घ्या. (Roman People)
तर हि गोष्ट म्हणजे रोमन लोक दात स्वच्छ ठेवण्यासाठी चक्क लघवीचा वापर करायचे. हो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. रोमन लोक कपडे स्वच्छ करण्यासाठी, दात घासण्यासाठी लघवीचा वापर करत असत. आजच्या काळात दात चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या पेस्ट, ब्रशचे वेगवेगळे प्रकार, तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून दात घासल्यावर पुदीना, मिंट वगैरे असलेले माऊथवॉश हे सगळं आपण पाहतो, वापरतो. पण चक्क माऊथ वॉश म्हणून लघवी? आज आपल्यासाठी हे विचित्र वाटत असंल तरी, रोमन स्वच्छता पद्धतींमध्ये, विशेषत: कपडे धुण्याच्या कामात युरीनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्राचीन रोममध्ये, स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जात असे, आणि लोक स्वतःला आणि त्यांचं सामान स्वच्छ ठेवण्यासाठी विविध पद्धती वापरत. (Social News)
यात मानवी आणि प्राण्यांचे मूत्र सामान्यतः कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरले जात असे. आज आपण वॉशरूमला जातो आणि कुठलाही विचार न करता फ्लश करतो, परंतु प्राचीन काळी ती एक मौल्यवान वस्तू मानली जात होती. आता याचं साम्य दर्शवणारी एक पद्धत म्हणजे शिवाम्बू चिकीत्सा! असं बोललं जातं की, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे शिवाम्बू प्राशन करीत, त्याआधारे ते ९९ वर्ष आरोग्यदायी आयुष्य जगले. हि शिवाम्बू चिकीत्सा म्हणजेच मूत्र चिकित्सा. स्वमूत्राचा वापर शरीरांतर्गत स्वच्छतेसाठी व बाह्य रोगांवरील उपचार करणं म्हणजे शिवाम्बू चिकीत्सा. या उपचार पध्दतीबाबत असंही म्हणतात, साठवलेलं शिवाम्बू जर त्वचेवर चोळलं, तर त्वचाविकार बरे झाले आहेत. या उपचार पध्दतीची मुळे रोममध्ये सापडतात. (Roman People)
खर तर प्राचीन काळी, जेव्हा ब्रश, टूथपेस्ट, Cleanser हे सगळे शोध लागले नव्हते तेव्हा रोमन लोक मानवी आणि प्राण्यांच्या मूत्राचा वापर माऊथवॉश म्हणून आणि दात चमकवण्यासाठी करत होते. एकंदरीत, प्राचीन रोमच्या लाँड्री पद्धतींमध्ये मानवी आणि प्राण्यांच्या मूत्र दोघांची भूमिका होती. यामागचं कारण म्हणजे मूत्रात असलेले रासायनिक घटक जसे अमोनिया, नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची संयुगे, तसंच फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे आणि रसायने ज्यामुळे स्वच्छता होते. आजकाल स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची, काचेच्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी जे साबण, लिक्विड सोप वापरले जातात त्यात अमोनिया असतो त्यामुळे भांड्यांचा चिकटपणा जाऊन भांडी स्वच्छ चमकदार होतात. रोममध्ये अशी लघवी वापरुन कपडे, दात स्वच्छ केले जात. रोमन लोकांचा असा विश्वास होता की मानवी आणि प्राणी दोघांचंही मूत्र हे दात पांढरे करतात आणि त्यांना किडण्यापासून वाचवतात, म्हणून त्यांनी ते माउथवॉश म्हणून वापरले आणि टूथपेस्ट बनवण्यासाठी ते प्युमिसमध्ये मिसळले. खरं तर, मूत्र इतके प्रभावी होते की ते 1700 च्या दशकापर्यंत टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये वापरले जात होते. (Social News)
आज संशोधन केल्यानंतर हे सिद्ध झाल आहे की लघवीत असलेले अमोनिया वगैरे घटक हे खरोखरच स्वच्छता करण्यासाठी उपयुक्त आहेत. आता हे वापरण्याचीसुद्धा एक पद्धत होती. या प्रॅक्टिसमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक मूत्रालये आणि तबेले किंवा इतर प्राणी बांधून ठेवलेल्या ठिकाणावरून मूत्र गोळा करणे समाविष्ट होते. तर यामध्ये रोमन लोक स्वच्छतेसाठी ही लघवी साठवून ठेवत. अशी लघवी साठवण्यासाठी विशिष्ट भांडी वापरली जात. ही भांडी खुल्यावर ठेवलेली असत. लोक त्यात मूत्र विसर्जन करायचे. ते निर्जंतुक होईपर्यंत लोक थांबत. अगदी ते अमोनियामध्ये एकजीव झाले की मग ती भांडी उचलून नेत आणि पाण्यात मिसळून घाण झालेल्या कपड्यांवर ओतून ठेवत. मूत्राची भांडी गोळा करुन आणून देणाऱ्या माणसाला पैसे द्यावे लागत कारण त्यांचा घाणेरडा वास सहन करत तो माणूस ते भांडं वाहून आणायचा. (Roman People)
मग कुणीतरी त्या घाणेरड्या कपड्यांवर पाण्यात लघवी मिसळून तुडवायचा त्यालाही पैसे द्यावे लागत. या लॉन्ड्रिंग प्रक्रियेच्या मध्यभागी “फुलर्स” होते. “फुलर्स” म्हणजे लाँडरिंग करणारे. ह्यांनी रोमन समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. फुलर्सवर कापडाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी होती. ते सार्वजनिक मूत्रालयांमधून मूत्र गोळा करायचे, जे संपूर्ण शहरात होते आणि ते त्याचा साफसफाईच्या प्रक्रियेत वापर करत असत. खरतर, प्राचीन रोममध्ये मूत्र इतके लोकप्रिय होते की रोमन सम्राट नीरो आणि वेस्पाशियन यांनी यावर कर लादला होता. त्याकाळी व्हेक्टिगल युरीन म्हणजेच ‘लघवी कर’ सार्वजनिक मूत्रालयात मूत्र संकलनावर ठेवला जात असे. (Social News)
======
हे देखील वाचा : क्रूर लष्करी हुकूमशहा, खुनी ते राष्ट्रपती !
======
जोपर्यंत रोमन लोकांचा संबंध होता, बाजारात सर्वोत्तम आणि म्हणून सर्वात महाग मूत्र पोर्तुगाल देशातून आले. स्वच्छता एजंट म्हणून मूत्राचा वापर हे प्राचीन रोममधील जीवनाचे वैशिष्ट्य होतं. आज आपल्यासाठी हे विचित्र वाटत असल तरी, रोमन लोकांसाठी ही एक सामान्य आणि स्वीकारलेली स्वच्छता पद्धत होती, तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. या प्राचीन गोष्टी ऐकायला घाण वाटते. पण ती त्या काळातील एक गरज होती. अजून काही दशकांनी कदाचित आपल्या राहणीमानावर पण आपल्या भावी पिढ्या हसू शकतील. पण त्या त्या काळाची ती ती गरज असते आणि माणूस त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून आपलं आयुष्य सुखी करायचा प्रयत्न करत असतो, त्यावर चूक बरोबर सांगणारे आपण कोण नाही का? (Roman People)