Home » Healthy Nails नखांचे सौंदर्य जपण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Healthy Nails नखांचे सौंदर्य जपण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Healthy Nails
Share

प्रत्येक मुलीसाठी, महिलांसाठी तिचे सौंदर्य खूपच आवश्यक आणि महत्वाचे असते. ती नेहमीच आपल्या चेहऱ्याची, सौंदर्याची विविध पद्धतीने काळजी घेत असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? महिलांसाठी त्यांच्या चाऱ्यासोबतच अजून एक गोष्ट खूपच जवळची आणि जिव्हाळ्याची आहे. आणि ती म्हणजे त्यांची नखे. अनेकांना हे वाचून हसायला आले असेल. मात्र हे खरे आहे. प्रत्येक मुलगी आणि स्त्रियांसाठी त्यांची नखे (Nails) खूपच जवळचे असतात. काही महिलांसाठी तर चेहऱ्यापेक्षा जास्त नखेच महत्वाची असतात. (Healthy Nails)

आजकाल तर नखांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी अतिशय सुंदर आणि हटके असे नेल आर्ट देखील केले जाते. अनेकांना हे नेल आर्ट करण्याची इच्छा असते, मात्र नखेच सुंदर किंवा आकर्षक नसतात. असे देखील अनेकदा घडते की, आपण नखांची आपापल्या परीने काळजी घेत असतात, मात्र असे असूनही अनेकदा आपली नखे छोटी असली तरी तुटतात. त्यांची चमक कमी होते. (Tips For Healthy Nails)

काहींची नखे पिवळसर दिसतात. अशावेळेस आपण आपल्या चेहऱ्यासोबतच नखांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. केवळ मॅनिक्यूर करून चालत नाही. यासोबतच आपले खाणेपिणे देखील सकस आणि चांगले असावे लागते. नखाच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या सौंदर्यासाठी देखील अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आवश्यक असतात. शिवाय काही घरगुती छोटे उपाय करणे देखील लाभदायक ठरते. मग नखांची काळजी कशी घ्यावी चला जाणून घेऊया. (Fashion Tips)

Healthy Nails

* नखं मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या. यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन असेल याची काळजी घ्या. फळांचं प्रमाणही योग्य ठेवा.
* पाणी आणि इतर द्रवपदार्थांचं प्रमाण योग्य ठेवा. (Marathi Top NEws)
* नखं खूप लांब वाढवू नका. लांब नखांमध्ये मळ साठू शकतो. यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.
* नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ धुवा आणि फार टोकदार नसणाऱ्या फायलरने नीट शेप द्या.
* नियमित गाजराचा रस प्यायल्यामुळे नखांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळेल. यामुळे नखं मजबूत होण्यास मदत होते.
* रोज रात्री एक चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस टाकून नखांना मसाज करावा यामुळे नखे मजबूत होतात.
* क्युटिक्लस काढण्यासाठी / कापण्यासाठी मेटल इन्स्ट्रूमेण्टचा वापर करू नका.
* नखं लांबच लांब वाढवण्यापेक्षा त्यांना शेप द्या.
* नारळाच्या तेलाने दररोज नखांना थोडा वेळ मसाज करा.
* नखांना सतत नेलपेंट लावून ठेऊ नका. एक नेलपेंट काढल्यानंतर थोडा वेळ नखे मोकळी ठेवा.
* नखांना नेलपेंट लावताना कोणतीही लावू नका. चांगल्या ब्रँडची लावा. सध्या नेलमेंटमध्ये अनेक हानिकारक पदार्थ मिसळलेलं असतात.
* आंघोळ केल्यानंतर मॅनिक्युअर करणं उत्तम. अशा वेळी नखांमधला मळ निघालेला असतो आणि नखंही नरम झालेली असतात.
* नखांना शेप देण्यासाठी फायलरचा वापर करा.
* नियमितपणे मॅनिक्युअर करा.
* नखं कापण्यापेक्षा फायलरने शेप करणं अधिक योग्य.
* नखांना नेलपेन्ट लावून नखांचं सौंदर्य आणखी वाढवता येईल.

====================

हे देखील वाचा : Salt : 30 हजार किलो दर असणारे मीठ असते का ?

Maghi Ganesh जाणून घ्या माघी गणेशोत्सव पूजा विधी आणि मुहूर्त वेळ

===================

* नखांच्या टोकांचं रक्षण करण्यासाठी नेहमी टॉप कोट लावा.
* नेलपेन्ट काढण्यासाठी रिमूव्हरचा वापर आठवड्यातून एकदाच करणं अधिक फायदेशीर. अधिक प्रमाणात रिमूव्हरचा वापर केल्यास नखं कोरडी होऊ शकतात.
* नेलपेन्ट खरवडून काढू नका. यामुळे नखावरील संरक्षणात्मक पेशी (प्रोटेक्टिव सेल्स) निघू शकतात.
* नखं चावू नका.
* चार ते सहा आठवड्याने एकदा प्रोफेशनल्सकडून मॅनिक्युअर करून घ्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.